देशात इतक्या बोगस युनिव्हर्सिटी, कोणत्या राज्यात किती विद्यापीठे बोगस पाहा यादी

| Updated on: Oct 05, 2023 | 12:58 PM

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील बोगस विद्यापीठांची एक यादी जाहीर केली आहे. या यादीत देशाची राजधानी दिल्लीत सर्वाधिक बोगस विद्यापीठे असल्याचे उघडकीस आले आहे. कोणत्या राज्यात किती बोगस विद्यापीठे पाहा..

देशात इतक्या बोगस युनिव्हर्सिटी, कोणत्या राज्यात किती विद्यापीठे बोगस पाहा यादी
UGC
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर : देशातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशभरात तब्बल 20 विद्यापीठे बोगस असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने ( UGC ) म्हटले आहे. देशाची राजधानी दिल्ली ही तर बोगस विद्यापीठाची राजधानी ठरली आहे. देशातील 20 बोगस विद्यापीठांच्या यादीत दिल्लीत सर्वाधिक बोगस विद्यापीठे असल्याचे उघडकीस आले आहे. या 20 बोगस विद्यापीठाच्या यादीत महाराष्ट्रातील विद्यापीठाचाही समावेश आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील बोगस विद्यापीठांची एक यादी जाहीर केली आहे. या यादीत दिल्लीत सर्वाधिक आठ बोगस विद्यापीठांचा समावेश आहे. तसेच देशातील आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पद्दुचेरी, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल येथील विद्यापीठांचा देखील या यादीत समावेश आहेत. या विद्यापीठांच्या कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात विद्यापीठ आयोगाने म्हटले आहे की विद्यापीठाच्या व्याख्येनूसार युजीसी एक्ट 1956 सेक्शन 2 ( फ ) अथवा सेक्शन 3 नूसार ही विद्यापीठे कायदेशीर नाहीत. त्यामुळे त्यांनी पदवी देणे किंवा युनिव्हर्सिटी नाव धारण करणे हे निष्पाप विद्यार्थ्यांची घोर फसवणूक असल्याचे विद्यापीठ अनुदान आयागाने म्हटले आहे.

या विद्यापीठांच्या कुलगुरुंना विद्यापीठ अनुदान आयोगाने पाठविलेल्या पत्रात आपल्या संस्थेच्या भोंगळ कारभाराचा अनेक विद्यार्थी बळी ठरत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे, येत्या पंधरा दिवसात याबाबतचा खुलासा करावा असेही आयोगाने या पत्रात म्हटले आहे. जर तुमचा काहीही प्रतिसाद न मिळाल्यास युजीसी तुमच्या विरोधात कठोर पावले उचलेल त्यात कायदेशीर कारवाईही करण्यात येईल असे आयोगाने म्हटले आहे.

दिल्लीत आठ बोगस विद्यापीठे

युजीसीने देशात एकूण 20 विद्यापीठे बोगस असल्याचे म्हटले आहे. यात देशाची राजधानी दिल्लीत सर्वाधिक 8 विद्यापीठे बोगस आहेत. यात ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ पब्लिक एण्ड फिजिकल हेल्थ सायन्स स्टेट गर्व्हमेंट युनिव्हर्सिटी ( अलिपूर ), कमर्शियल युनिव्हर्सिटी लि.( दर्या गंज), युनायटेड नेशन युनिव्हर्सिटी , व्होकेशनल युनिव्हर्सिटी( दर्यागंज ), एडीआर-सेंट्रिक ज्युरीडिकल युनिव्हर्सिटी ( राजेंद्र पॅलेस ), इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एण्ड इंजिनिअरींग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्पलॉयमेंट आणि अध्यात्मिक विश्वविद्यालय ( रोहिणी ) या बोगस विद्यापीठांचा समावेश आहे.