Interview | जेईई मेन 2021 मध्ये 300 पैकी 300 गुण मिळवणारा टॉपर, मृदुल अग्रवालने शेअर केली स्ट्रॅटेजी

| Updated on: Mar 25, 2021 | 10:34 PM

दुसऱ्या परीक्षेत 300 पैकी 300 गुण मिळवून संपूर्ण भारतात अव्वल स्थान मिळवले आहे. टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या तयारीपासून पुढील योजनेबाबत शेअर केले आहे. (Top scorer of 300 out of 300 in JEE Main 2021, Mridul Agarwal shared Strategy)

Interview | जेईई मेन 2021 मध्ये 300 पैकी 300 गुण मिळवणारा टॉपर, मृदुल अग्रवालने शेअर केली स्ट्रॅटेजी
जेईई मेन 2021 मध्ये 300 पैकी 300 गुण मिळवणारा टॉपर
Follow us on

नवी दिल्ली : जेईई मेन 2021 मार्च (JEE Main 2021) सत्रामध्ये 13 विद्यार्थ्यांनी 100 परफेक्ट स्कोअर मिळवले आहेत, त्यापैकी 2 विद्यार्थी असे आहेत ज्यांना 300 पैकी 300 गुण मिळाले आहेत. राजस्थानच्या मृदुल अग्रवाल आणि दिल्लीच्या काव्या चोप्रा यांनी 300 पैकी 300 गुण मिळवले आहेत. राजस्थानच्या मृदुल अग्रवालला आयआयटी बॉम्बेकडून संगणक शास्त्राचा अभ्यास करायचा आहे. मृदुल (JEE Main 2021 Topper Mridul Agarwal) याने यंदा दुसर्‍या वेळी परीक्षा दिली होती, पहिल्या परीक्षेत त्याला 295 गुण मिळाले होते आणि दुसऱ्या परीक्षेत 300 पैकी 300 गुण मिळवून संपूर्ण भारतात अव्वल स्थान मिळवले आहे. टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या तयारीपासून पुढील योजनेबाबत शेअर केले आहे. (Top scorer of 300 out of 300 in JEE Main 2021, Mridul Agarwal shared Strategy)

1. 300 पैकी 300 गुण मिळण्याची अपेक्षा होती?

उत्तर : जेईई मेनचा हा माझा दुसरा प्रयत्न होता. यापूर्वी मी फेब्रुवारीची परीक्षा दिली होती, त्यात मला 295 गुण आणि 99.99 टक्के मिळाली होते. मी पहिल्या परीक्षेसाठी संपूर्ण डेडिकेशनने तयारी केली होती. पहिली परीक्षा क्लिअर केल्यानंतर मी JEE Advanced तयारीसाठी सराव म्हणून जेईई मेन मार्चची परीक्षा दिली. या परीक्षेत 300 पैकी 300 गुण मिळतील अशी मला अपेक्षा नव्हती. मी खूप कूल राहून ही परीक्षा दिली होती.

2. निकालावर पालकांची प्रतिक्रिया काय होती?

उत्तर : माझे पालक पहिल्या परीक्षेतील गुणांवर समाधानी होते. पण जेव्हा मला 300 पैकी 300 गुण आणि 100 टक्के मिळाले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. पालक खूप उत्साही होते. त्यांनी मला समजावून सांगितले की, अंतिम लक्ष्य हे नसून JEE Advanced आहे. माझे पालक नेहमीच सपोर्ट करतात, त्यांनी माझ्यावर कधीही दबाव आणला नाही. त्यांनी मला नेहमी सांगितले की जे काही करशील त्यात कठोर परिश्रम कर आणि निकालाची चिंता करू नको. परीक्षेला अव्वल ठरवून जीवनात यश मिळवणे आवश्यक नसते.

3. पुढे काय करायचे आहे?

उत्तर : मी फेब्रुवारीपासून JEE Advanced परीक्षेची तयारी करत आहे. मला JEE Advanced परीक्षा देऊन आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. मला कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास करायचा आहे. कॉम्प्युटर सायन्स हे विकसनशील क्षेत्र आहे. यामध्ये आणखी नवीन गोष्टी विकसित केल्या जातील. मला हे फील्ड एक्सप्लोर करायचे आहे.

4. आपण परीक्षेची तयारी कशी केली?

उत्तर : मी 11 वी पासून जेईई मेनची तयारी सुरू केली. मी अॅलेन कोचिंगमधून तयारी केली. लॉकडाऊनचा मला खूप फायदा झाला. शाळेत जाण्याचा वेळ वाचला आणि मी घरी ऑनलाईन तयारीसाठी जास्तीत जास्त वेळ देऊ शकलो. माझ्या तयारीसाठी मी विशेष वेळ ठरवला नाही, परंतु झोपायच्या आधी मी उद्या हा विषय वाचला पाहिजे असा विचार करून दररोज झोपायचा. दररोज विषय सेट करायचो आणि तो पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

5. परीक्षेचा ताण टाळण्यासाठी काय केले?

उत्तर : परीक्षेच्या वेळी ताणतणाव येणे सामान्य आहे. मी तणाव टाळण्यासाठी अभ्यासामध्ये ब्रेक घेत असे. एक तास वाचल्यानंतर 10 मिनिटे छोट्या भावासोबत खेळत असे. मित्रांशी बोलायचो आणि आठवड्यातून एकदा कुटुंबासमवेत 1-2 तास बाहेर फिरायला जायचो.

6. असे वाटते की जेईई मेन 4 वेळा झाल्याने विद्यार्थ्यांना फायदा होईल?

उत्तर : जेईई मेन 4 वेळा आयोजित केल्याने विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल. यावेळी 4 वेळा परीक्षा असल्याने आम्हाला आमच्या चुका सुधारण्याची संधी मिळत आहे. जर एका सत्रात चांगला स्कोअर नाही झाला तर विद्यार्थी दुसर्‍या सत्रात प्रयत्न करु शकतात.

7. विद्यार्थ्यांना कोणता सल्ला देऊ इच्छिता?

उत्तर : सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तयारीच्या वेळी ताणतणाव असू नये आणि आपल्या लक्ष्यापासून दूर जाऊ नका. कठीण गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. चुका करू नका तर शिकण्याची मानसिकता ठेवा. विचार करा की ही फक्त प्रॅक्टिस आहे, अंतिम परीक्षा अजून बाकी आहे.(Top scorer of 300 out of 300 in JEE Main 2021, Mridul Agarwal shared Strategy)

इतर बातम्या

ICSI CS Exam 2021 : सीएस परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली, अंतिम तारीख 9 एप्रिलपर्यंत

Video | सोन्याची ‘अशी’ तस्करी कधी पाहिलीये का?, सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया