वर्धा: महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी वर्धा येथे राज्यातील महाविद्यालयं कधी सुरु केली जाणार या संदर्भात माहिती दिली. महाविद्यालय सुरु करणं म्हणजे एक मोठा समूह हा एकत्र वर्गामध्ये येणे, तो जर एका जागी आला तर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते,अशी भीती आहे, असंही उदय सामंत म्हणाले. महाविद्यालय कधी सुरु करावीत याबाबत जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी शासनाला प्रस्ताव पाठवल्यास त्याबाबत विचार करु, असंही ते म्हणाले. तर, नारायण राणे यांच्या मंत्रिपदामुळे राज्यात आणि कोकणात शिवसेनेला कोणताही धोका नाही, असंही ते म्हणाले. (Uday Samant said next one month colleges will not started due to fear of corona third wave)
कोरोनाची तिसरी लाट आली तर विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो त्यांच्यामुळे त्यांच्या पालकांना आणि इतरांना त्रास होऊ शकतो. सध्या तरी कॉलेज सुरू करण्याची कुठलाही प्रस्ताव पुढील पंधरा वीस दिवस किंवा महिनाभरात नाही, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.
वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात व्हेंटिलेटर आरोग्य यंत्रणेला सोपविण्यात आले. उदय सामंत यांनीमहाराष्ट्राचे डिजास्टर मॅनेजमेंटचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असून ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचा आढावा घेत आहेत. मागील वर्षी कॉलेज चालू करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्या पुढच्या आठवड्यात कोरोनाची लाट आली होती. यामुळे हे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी, आयुक्तांनी आपला परिसर कॉलेज सुरू होण्याच्या पध्द्तीने तयार झाला आहे, असा प्रस्ताव पाठवला तर शासन म्हणून त्यावर विचार करू, असं सावंत यांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना उदय सामंत यांनी पंकजा मुंडे आणि इतर जुन्या लोकांना डावलण्यात आलं आहे हे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातुन लक्षात आले आहे, असं उदय सांमंत म्हणाले. सोबतच नारायण राणे यांच्यामुळे कोकणच्या शिवसेनेनला कोणताही नुकसान होणार नाही. कोकणातील शिवसेना ही शिवसैनिकांची आहे , बाळासाहेबांवर प्रेम करणारी आहे आणि उद्धव ठाकरे यांच नेतृत्व मानणारी आहे. महाराष्ट्रात कोणी कितीही मंत्री केले तर शिववसेनेला शह देऊ शकतात हे फार मोठं आणि दिवसा बघितलेले स्वप्न आहे. शिवसेना आहे त्यापेक्षा जोरदारपणे या दोन वर्षात झेपावलेली आपल्याला महाराष्ट्रात दिसेल असंही ते म्हणाले.
इतर बातम्या:
(Uday Samant said next one month colleges will not started due to fear of corona third wave)