ऑनलाईनकडून ऑफलाईनकडं जावेच लागेल, उदय सामंत यांचं वक्तव्य

| Updated on: Feb 13, 2022 | 1:13 PM

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे पुण्यातील बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीमधील (Baramati) कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर उदय सामंत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.

ऑनलाईनकडून ऑफलाईनकडं जावेच लागेल, उदय सामंत यांचं वक्तव्य
उदय सामंत
Follow us on

पुणे: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे पुण्यातील बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीमधील (Baramati) कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर उदय सामंत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश, ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा आणि हिंदुस्थानी भाऊ, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द होण्यासंदर्भात त्यांनी भाष्य केलं. 12 वी आणि सीईटीचे मार्क्स ग्राह्य धरून जर विद्यार्थ्याना न्याय देता आला तर भविष्यात त्यावर काम करणार असल्याचं उदय सामंत म्हणाले. कोरोना काळात ऑनलाईन परीक्षांचा (Online Exam) पर्याय वापरला होता. मात्र आपल्याला ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जावं लागेल, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं आहे. बारामतीच्या कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शनात शेतकऱ्यांना तिखट मिरची बरोबरच गोड मिरची बरोबरच 100 हून अधिक पीक प्रात्याक्षिक पाहायला मिळणार आहे.

ऑफलाईन परीक्षांकडे जावेच लागेल

कोरोना संसर्गाच्या काळात आपण ऑनलाईन परीक्षांचा पर्याय स्वीकारला होता. मात्र, कोरोना संकट कमी होत आहे. राज्यातील भौगोलिक स्थिती आणि साधनांची उपलब्धता पाहता आता ऑनलाइनकडून ऑफलाईनकडे जावंच लागेल, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

हिंदुस्थानी भाऊला आपणचं मोठ करतो

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई, पुणे, नागपूर,औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर जिल्ह्यात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेससाठी आंदोलन केलं होतं. विद्यार्थ्यांनी ते आंदोलन हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर केल्याचं समोर आल्यानंतर मोठा गदरोळ झाला होता. उदय सामंत यांनी त्यासंदर्भात बोलताना हिंदुस्थानी भाऊला आपणच मोठं करत असतो, त्यांचं विकास फाटक हे नाव चांगलं आहे. कुणाच्या तरी नादाला आपलं करियर वाया घालू नका, कुठल्या भाऊचे ऐकू नये, असं उदय सामंत म्हणाले.

बारामतीत कृषी सप्ताहाचे आयोजन

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं आहे. बारामतीच्या कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शनात शेतकऱ्यांना तिखट मिरची बरोबरच गोड मिरची बरोबरच 100 हून अधिक पीक प्रात्याक्षिक पाहायला मिळणार आहेत. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील कृषी सप्ताहात मिरची बरोबरच गोड मिरची आणि रासायनिक शेती सेंद्रिय शेती, त्यानंतर आता होमिओपॅथिक शेती काय आहे हे शेतकऱ्यांना पाहता येणार आहे.

इतर बातम्या :

VIDEO: चंद्रकांतदादा निष्पाप, स्वच्छ हृदयाचे, सरकार पडत नसल्याने नैराश्यात, पण प्रयत्न सुरू ठेवा; राऊतांचे चंद्रकांत पाटलांना चिमटे

IPL Players Auction 2022 LIVE : लिलावाचा दुसरा दिवस फलंदाजांचा, परदेशी खेळाडूंसाठी बिडींग वॉर होणार