असिस्टंट प्रोफेसर पदाच्या भरती प्रक्रियेत बदल, UGC ची नवीन गाईडलाईन

| Updated on: Jul 05, 2023 | 5:48 PM

विद्यापीठ अनुदान आयोगाने आता सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी किमान पात्रतेत येत्या एक जुलैपासून नवा बदल केला आहे.

असिस्टंट प्रोफेसर पदाच्या भरती प्रक्रियेत बदल, UGC ची नवीन गाईडलाईन
ugc (1)
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने आता असिस्टंट प्रोफेसर ( Assistant Professor ) भरतीच्या प्रक्रीयेत आमुलाग्र बदल केला आहे. हा नवा बदल येत्या एक जुलैपासून लागू करण्यात आला आहे.  या नव्या निर्णयानूसार विद्यापीठ आयोगाने असिस्टंट प्रोफेसर बनण्यासाठी मिनियम क्रायटेरिया ( Minimum Criteria ) निश्चित केला आहे. त्यानूसार आता असिस्टंट प्रोफेसर पदाच्या भरतीसाठी आता पीएचडी ( PHD ) करणे ही ऐच्छीक स्वरुपाची बाब असणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने काय केला आहे नेमका बदल पाहा…

यूजीसीने निश्चित केली किमान पात्रता

विद्यापीठ अनुदान आयोगाने आता सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी किमान पात्रता म्हणून NET परीक्षा किंवा SET परीक्षा वा SLET उत्तीर्ण होणे गरजेचे रहाणार आहे. या परीक्षा पास करणाऱ्यांना कॉलेजात सरळ असिस्टंट प्रोफेसर पदाच्या नोकरीसाठी पात्र मानले जाईल.

1 जूलैपासून नवे नियम लागू

विद्यापीठ आयोगाने स्पष्ट केले आहे की नवा नियम 1 जुलै 2023 पासून देशातील सर्व केंद्रीय युनिव्हर्सिटी, राज्य युनिव्हर्सिटी, स्वायत्त युनिव्हर्सिटी आणि खाजगी युनिव्हर्सिटीमध्ये लागू करण्यात आले आहेत.

सहायक प्रोफेसर बनण्यासाठी काय होती अट

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानूसार युनिव्हर्सिटीत आणि पदवी महाविद्यालयात सहायक प्रोफेसर बनण्यासाठी उमेदवाराला संबंधित विषयात किमान 55 टक्के गुणांसह पीजी आणि यूजीसी-सीएसआयआर नेट किंवा सेट वा स्लेट परीक्षा पास करावी लागायची. त्याशिवाय संबंधित विषयात पीएचडी करणे देखील गरजेचे होते.

UGC अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी ट्वीट केले

असिस्टंट प्रोफेसर पदाच्या भरतीसाठी नव्या नियमांना लागू केल्यानंतर युजीसीचे अध्यक्ष एम.जगदीश कुमार यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी 1 जुलैपासून असिस्टंट प्रोफेसर बनण्यासाठी पीएचडी करणे अनिर्वाय असणार नाही. ते ऑप्शनल असणार आहे. आता असिस्टंट प्रोफेसर पदासाठी NET या SET या SLET या परीक्षेत 55 टक्के गुण मिळविणे आता किमान आवश्यक पात्रता असेल