केंद्रीय लोकसेवा आयोगाने एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा २०२४ चा (combined medical services exam) निकाल जाहीर केला आहे. हा निकाल तपासण्याठी तुम्ही upsc.gov.in.या UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता. तसेच निकाल तपासण्याची थेट लिंकही खाली दिली आहे. तुम्ही तेथूनही निकाल डाउनलोड करू शकता. निवड झालेल्या उमेदवारांना आता पुढील टप्प्यासाठी तयारी करावी लागणार आहे. ही परीक्षा 14 जुलै रोजी घेण्यात आली आणि 30 जुलै रोजी निकाल जाहीर झाला.
स्टेप बाय स्टेप जाणून घ्या प्रोसेस
इंटरव्ह्यूची तयारी
UPSC CMS च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आता निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखत द्यावी लागेल आणि त्यासाठी त्यांना फॉर्म भरावा लागेल. या सविस्तर अर्जाची माहिती लवकरच संकेतस्थळावर देण्यात येईल. नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन चेक करत रहावे. तेथे सर्व अचूक माहिती मिळेल.
दोन स्टेप्स बाकी
मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि वैद्यकीय तपासणीसाठी जावे लागेल. हे दोन्ही टप्पे यशस्वीपणे पार केल्यानंतरच त्यांची अंतिम निवड होईल.
UPSC ने या संदर्भात जारी केलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, आता जाहीर झालेले निकाल तात्पुरते आहेत आणि येथील निवडीचा अर्थ असा नाही की उमेदवारांची अंतिम निवड झाली आहे. या परीक्षेतील उर्वरित टप्पे पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतरच निवड अंतिम होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.