SSC Exam : दहावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

| Updated on: Nov 17, 2021 | 5:18 PM

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं सादर करावेत, असं आवाहन केलं आहे.

SSC Exam : दहावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा
varsha gaikwad
Follow us on

मुंबई: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं सादर करावेत, असं आवाहन केलं आहे. 18 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध असेल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इ.10 वीच्या परीक्षांसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्र 18 नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर घेतले जातील.

मंडळाकडून परिपत्रक जारी

2022 मध्ये होणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा परिपत्रक काढत माहिती दिली आहे.

परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी माध्यमिक शाळांना दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल करुन घेण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये परीक्षांच्या तारखांची घोषणा केली जाईल, असं भोसले म्हणाले. 18 नोव्हेंबर म्हणजेच उद्यापासून नियमित शुल्कासह अर्ज भरायला सुरुवात होणार असल्याची माहिती भोसले यांनी दिली.

दहावीची परीक्षा कशी होणार?

2022 ची परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायची या संदर्भात म्हणणं माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं राज्य सरकारला कळवलं असल्याची माहिती अशोक भोसले यांनी दिली. राज्य सरकारकडून या संदर्भातही निर्णय घेतला जाईल, असं अशोक भोसले यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या:

MHT CET: सीईटी कक्षाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नोंदणीला मुदतवाढ, नेमकं कारण काय?

Maharashtra School Reopen: कोरोना रुग्ण घटले, दिवाळी संपली, पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता

Varsha Gaikwad declared SSC exam 2022 application form submission schedule appeal students to apply online