नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : युपीएसएसी सिव्हील परीक्षा एकाच प्रयत्नात क्रॅक करणे खूपच अवघड शिवधनुष्य असते. अनेक उमेदवारांना युपीएससीची परीक्षेत यश मिळविण्यासाठी खूपच वेळ आणि मेहनत लागते. त्या थकून काही जण हताश होत प्रयत्न सोडूनही देतात. परंतू एका तरुणीला युपीएससीत दोनदा प्रथम परीक्षेतच अपयश आले तरी तिने हार मानली नाही. परंतू तिसऱ्या प्रयत्नात तिने कमाल करीत केवळ यशस्वीच झाली नाही तर देशात सहावा क्रमांक मिळविला. आयएएस विशाखा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास पाहूयात..
दिल्लीतील द्वारका परिसरात राहणाऱ्या विशाखा यादव यांचे शालेय शिक्षण दिल्लीत येथेच झाले. बारावीनंतर विशाखा यादव यांनी जेईई मुख्य परीक्षा पास करीत दिल्लीतील टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीत ( डीटीयू ) प्रवेश घेतला. तेथून ग्रॅज्यूशन पूर्ण केले. आणि आयएएस होण्यासाठी विशाखा यादव तयारी करु लागल्या, परंतू मार्ग कठीण होता.
डीटीयूमधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केल्यानंतर विशाखा यादव यांना चांगली नोकरी चालून आली. त्यामुळे तिने जॉब स्वीकारला. दोन वर्षे नोकरी केली. परंतू तिला सिव्हील सर्व्हीसमध्येच जाण्याचे स्वप्न खुणावत होते. मग तिने चांगला पगार असलेली नोकरी सोडली. आणि युपीएससीची तयारी सुरु केली.
आयएएस विशाखा यादव यांनी चांगली नोकरी सोडून संपूर्ण लक्ष केंद्रीत करीत युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. परंतू हा प्रवास कठीण होता. मेहनत घेऊनही दोन वेळा युपीएससीची प्रिलियम परीक्षेतच अपयश आले. दोन्ही वेळा पहिल्या पायरीवरच अपयश आले. परंतू विशाखा यादव यांनी हिंमत हारली नाही. नव्या उमेदीने अभ्यास सुरु केला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले आणि विशाखा यादव देशभरातून सहाव्या रॅंकने युपीएससी उत्तीर्ण झाल्याने त्यांचे आयएएस बनण्याचे स्वप्न अखेर साकार झाले.