मुंबई : देशात सध्या एकच मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुका…(Five State Election result) पाचही राज्यात निवडणुकांचे मतदान पार पडले आहे. एक्झिट पोलही आले (Election Exit Poll) आहेत. आता प्रतीक्षा आहे फक्त निवडणूक निकालाची. येत्या 10 मार्चला सकाळी 10 वाजल्यापासून (10 March Election result) या निवडणुकांच्या निकालाला सुरूवात होणार आहे. याच्या वेगवान अपडेट आम्ही तुम्हाला टीव्ही 9 मराठी वर दाखवणार आहोत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा यात समावेश आहे. पाच पैकी चार राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र काल समोर आलेल्या एक्झिट बोलमधून भाजपला मोठा झटका बसणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या निकालाची उत्सुक्ता आणखी वाढली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये पुन्हा सत्ता मिळताना दिसतेय. तर गोवा आणि उत्तराखंड भाजप गमावण्याची शक्यता एक्झिट पोलने वर्तवली आहे. त्यामुळे या निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. या पाच राज्यांना मिनी लोकसभा म्हटले जाते. त्यामुळे निकालाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
2017-पाचही राज्यांमधील पक्षीय बलाबल काय?
उत्तर प्रदेश – एकूण जागा 403
भाजप-325
समाजवादी पक्ष-47
बसपा-19
काँग्रेस-7
पंजाब– एकूण जागा-117
भाजप-3
काँग्रेस-77
आप-20
अकाली दल-15
गोवा– एकूण जागा 40
भाजपा-17
कॉंग्रेस-13
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष-3
गोवा फॉरवर्ड – 3
मणिपूर – एकूण जागा 60
भाजपा-21
काँग्रेस – 28
स्थानिक पक्ष-11
उत्तराखंड – एकूण जागा-70
भाजपा-57
काँग्रेस-11
स्थानिक पक्ष-2
गोव्यात काँग्रेस अलर्ट मोडवर
मागच्यावेळी एक नंबरचा पक्ष असूनही गोव्यात सत्ता स्थापन करण्यात अयशस्वी ठरलेल्या काँग्रेसला भाजपाची धास्ती असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांनी आत्तापासून प्रत्येक आमदाराच्या हालचालीवरती लक्ष ठेवलं असून मोर्चेबांधणीला सुरूवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते-मंत्री सतेज पाटील यांच्याकडे निकालाच्या दिवसापासून ही जबाबदारी देण्यात आली असून ते निकालानंतर नेमकी काय भूमिका घेतात याकडे देशाचं लक्ष असेल.
पंजाबमध्ये आपचा बोलबाला
पंजाबमध्ये केजरीवालांच्या आम आदमी पार्टीची सत्ता पंजाबमध्ये येईल, असं बोललं जातंय. टुडेज चाणक्यने निवडणुकीबाबत आपला अंदाज वर्तवला आहे. चाणक्यने वर्तवलेल्या अंदाजानुसार सर्वाधिक जागा मिळणारा पक्ष म्हणून पंजाबमध्ये आप समोर येईल, असं सांगण्यात आलं आहे.
भाजपची डोकेदुखी वाढणार?
उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये भाजपची पुन्हा सत्ता येईल असा अंदाज आहे. तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजपसाठी धोक्याची घंटा वाजण्याची शक्याता आहे. गोव्यात कुठल्याचा राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत नाहीये. तर दुसरीकडे उत्तराखंडमध्येही अशीच स्थिती तयार होण्याची शक्यात या एक्झिट पोलने वर्तवली आहे. त्यामुळे निकालानंतर भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
Manipur Exit Poll Result 2022 : मणिपूरमध्ये भाजपचाच बोलबाला, काँग्रेसला एक आकडी संख्येवरच अडकणार!