Exit Polls 2022 : आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे ते पाच राज्याच्या निवडणुकांकडे (Five State Elections 2022) आणि एक्झिट पोलकडे (Exit Polls). पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यानुसार उत्तर प्रदेशात भाजपला (UP elections Exit Polls 2022) पुन्हा बहुमत मिळताना दिसतंय. तर पंजाबने आपला कौल दिल्याचा अंदाज समोर आला आहे. या पाच राज्यातल्या सध्या चार राज्यात भाजपची सत्ता आहे. मात्र निवडणुकीच्या निकालनंतर दोन राज्यं भाजप गमावणार असल्याचा धोकादायक अंदाज आजच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये भाजपची पुन्हा सत्ता येईल असा अंदाज आहे. तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजपसाठी धोक्याची घंटा वाजण्याची शक्याता आहे. गोव्यात कुठल्याचा राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत नाहीये. तर दुसरीकडे उत्तराखंडमध्येही अशीच स्थिती तयार होण्याची शक्यात या एक्झिट पोलने वर्तवली आहे. त्यामुळे निकालानंतर भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
गोवा भाजप गमावण्याची शक्यता
गोव्यासरखं छोटं मात्र महत्वाचे राज्य भाजप गमावण्याची शक्यता आहे. कारण उत्पल पर्रीकराना तिकीट न देण्यापासून ते अनेक बंडखोरांची आव्हानं थोपवण्याचा प्रश्न भाजपला गोव्यात सोडवावा लागला होता. अखेर आता मतदान पूर्ण झाल्यानं गोव्याचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार गोव्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचं समोर आलं आहे. मात्र सर्वाधिक जागा या सत्ताधारी भाजपलाच मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस दुसऱ्या नंबरचा पक्ष असेल, तर आपनंही गोव्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आपचा किमान चार जागी विजय होऊ शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे इतरांनी एकत्र येत भाजला धक्का देत महाराष्ट्रासारखी आघाडी झाल्यास भाजपसाठी धोकादायक ठरू शकते
उत्तराखंडचा कौल कुणाला?
उत्तराखंडमध्ये सत्ताधारी पक्षाला म्हणजे भाजपला 26-32 जागा मिळतील. तर दुसरीकडे काँग्रेसला 32-38 जागा मिळताना दिसत आहेत. तर आम आदमी पक्षाला 2 जागा आणि इतरांना 3-7 जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार राज्यात काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळू शकते. मात्र भाजपही बहुमतापासून दूर नसल्याने येथेही अन्य उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र पाथमिक अंदाजात तर काँग्रेसचे पारडं जड दिसतंय. त्यामुळे ही दोन राज्य भाजप गमावण्याची दाट शक्यता आहे.