Goa Assembly Election 2022 Result LIVE : गोवा विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 33.3 टक्के मतदान झालं असून भाजपच्या एकूण 9 जागा वाढल्यात. आता डॉ. प्रमोद सावंत हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.
शिवसेनेला गोव्यात भोपळाही फोडता आलेला नसल्यानं भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे
Follow us on
2022च्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमतासाठी अवघी एक जागा कमी पडली आहे. 20 जागांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे. त्याखालोखाल काँग्रेस (11), आप (2), एमजीपी (2), गोवा फॉरवर्ड (1) आणि चार अपक्ष निवडणून आले आहेत.
मनोहर पर्रिकरांचे सुपुत्र उत्पल पर्रिकरांचा भाजप उमेदवार बाबुश मॉन्सेरात यांनी पराभव केला आहे. भाजपनं तिकीट नाकारल्यामुळे उत्पल पर्रिकर हे पणजीतून अपक्ष निवडणुकीला उभे राहिले होते.
मुख्ममंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा साखळीतून जरी विजय झाला असला, तरी गोव्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे पराभूत झाले आहेत. काँग्रेसमधून 2019 साली भाजपात प्रवेश केलेले चंद्रकांत उर्फ बाबू कळळेकर परभूत झालेत तर मगोपमधून भाजपता आलेले मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांचाही पराभव झाला आहे.
आपनं गोव्यात आपलं खात उघडलं असून गोव्यात आपचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
शिवसेनेला गोव्यात भोपळाही फोडता आलेला नसल्यानं भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचीही अवस्था शिवसेनेसारखीच झाली आहे.
2012 मध्ये पर्रिकरांच्या नेतृत्त्वात भाजपला बहुमत मिळालं होतं. 2012 मध्ये भाजपला 21 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर आता बरोबर दहा वर्षांनी म्हणजे 2022मध्ये डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वात भाजपनं पुन्हा घवघवीत यश मिळवत 20 जागांवर बाजी मारली आहे.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक प्रभारी म्हणून भाजपनं नेमणूक केली होती. त्यांच्या नेतृत्त्वात भाजपला मिळालेल्या यशामुळे आता महाराष्ट्रातील पालिकांच्या निवडणुकांमध्येही फडणवीसांची पक्षातली ताकद वाढण्याचीही शक्यता आहे.
गोव्यातीन तीन दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. यातील तिघांचाही विजय झाला आहे. विश्वजीत राणे आणि दिव्या राणे यांचा सत्तरीत विजय झाला आहे. मायकल आणि डिलायला लोबो यांचा कळंगुट आणि शिवोलीत विजय झाला आहे. तर इकडे पणजीत उत्पल पर्रिकरांना धूळ चारलेल्या बाबुश मॉन्सेरात आणि त्यांची पत्नी जनेफिर यांचाही विजय झाला आहे. गोव्याच्या निवडणुकीत नवरा-बायकोला तिकीट देण्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. तीन दाम्पत्यांपैकी लोबो दाम्पत्यानं निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 33.3 टक्के मतदान झालं असून भाजपच्या एकूण 9 जागा वाढल्यात. आता डॉ. प्रमोद सावंत हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.
काँग्रेसच्या एकूण 6 जागा गोव्यात घटल्या असून त्यांच्या मतांची टक्केवारीही कमी झाली आहे. गोव्यात काँग्रेसला 23.46 टक्के इतकी मतं मिळाली असून एकूण 11 जागांवरच त्यांना समाधान मानावं लागलं आहे.