VIDEO: गोव्यातील उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार?; संजय राऊतांनी सांगितली तारीख

| Updated on: Jan 16, 2022 | 11:25 AM

येत्या 18 किंवा 19 तारखेला मी गोव्यात जाणार आहे. त्यावेळी आम्ही गोव्यातील आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

VIDEO: गोव्यातील उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार?; संजय राऊतांनी सांगितली तारीख
मोदी-शहांचा उदय होताच शिवसेना नकोशी का झाली?, तेव्हा पूनम महाजन निर्भयपणे का बोलल्या नाहीत?: राऊत
Follow us on

मुंबई: येत्या 18 किंवा 19 तारखेला मी गोव्यात जाणार आहे. त्यावेळी आम्ही गोव्यातील आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. काँग्रेस सोबत जागा वाटप नीट होऊ शकलं नाही. त्यांची काही मजबुरी असेल, आमची काही मजबुरी आहे. एनसीपीची काही मजबुरी आहे. आमची चांगली चर्चा झाली होती. पण पुढे गेली नाही. राजकारणात असं होत असतं निवडणुकीच्या काळात. याचा अर्थ कुणी निवडणुका लढवू नयेत असं नाही. आम्ही निवडणुका लढू. उमेदवारांची यादी तयार होतेय. 18 आणि 19 तारखेला आमची यादी जाहीर करू, असं राऊत म्हणाले.

तेच गोव्यात घडायला हवं

आम्ही गोव्यात सामान्य लोकांना प्रस्थापितांच्या विरोधात उभं करू. गोव्यातील राजकारण प्रस्थापितांच्या हाती गेलं आहे. लँड माफिया, ड्रग्स माफियांच्या हाती गोव्याचं राजकारण आहे. ते गोव्याचं सूत्रं ठरवतात. हे मोडायचं असेल तर गोवेकरांनी सामान्य लोकांना मतदान करून सामान्य लोकांना निवडून आणावं. जे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं. बाळासाहेबांनी सामान्य माणसाला आमदार, खासदार आणि मंत्री केलं. तेच गोव्यात घडलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

दहा बारा लोक सत्तेची सूत्रे फिरवतात

दरम्यान, संजय राऊत यांनी कालही गोव्यातील निवडणुकीवर भाष्य केलं होतं. गोव्यातील दहा-बारा लोकं सत्तेची सूत्रं फिरवत असतात. ते इकडे तिकडे फिरत असतात. गोव्यात कोणत्याही नेत्याला पक्ष नाही. ते आज एका पक्षात असतील तर उद्या दुसऱ्या पक्षात असतील. गोव्यात जे चाललंय ते बंड नाही. त्याला माकड उड्या म्हणतात. जिथे पिक येईल त्या शेतात काही दहाबारा लोक घुसत असतात. त्यांच्याकडे कोणताही विचार नाही. शिवसेनेकडे हिंदुत्वाचा विचार आहे, असं ते म्हणाले होते.

म्हणून गोव्यात बिनसलं

ज्या जागा राष्ट्रवादीला हव्या होत्या त्या सोडायला काँग्रेस तयार नाही. काँग्रेस गोव्यातील मोठा पक्ष आहे. काँग्रेस अनेक वर्ष सत्ताधारी पक्ष होता. मागच्यावेळी त्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या. 17 आमदार त्यांचे निवडून आले होते. आता त्यांच्याकडे दोन तीन आमदार राहिले आहेत. त्यांना वाटतं लोकांचा पाठिंबा अजून त्यांना आहे. असेल तर दिसेल. आम्हाला वाटत होतं की, काँग्रेसने 40 पैकी 30 जागा लढाव्यात. उरलेल्या दहा जागा शिवसेना, राष्ट्रवादी आणि त्यांचा मित्र पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डला द्याव्यात असं आम्हाला वाटत होतं. या दहा जागांवर आमचं समाधान झालं होतं. पण त्यांना त्याही जागा द्यायच्या नसतील तर त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त उमेदवार एका मतदारसंघात असतील तर त्यांची अडचण समजू शकतो, असंही त्यांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या:

VIDEO: फडणवीसांना गोव्याची हवा लागली, त्यांचं अध:पतन झालंय; संजय राऊतांची खोचक टीका

UP ELECTION 2022 : उत्तर प्रदेशाच्या रणसंग्रामासाठी भाजप तयार, 44 ओबीसी, 19 एससी उमेदवारांना तिकीट; सोशल इंजीनियरिंगवर भर

UP Assembly Election 2022: योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढणार नाही, सेफ मतदारसंघातून लढणार; उपमुख्यमंत्री मोर्य सिराथूमधून मैदानात