मुंबई: भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रिकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे गोव्यात बेईमानी आणि चारित्र्य अशी होणार आहे. भाजपने बलात्कार, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेल्या व्यक्तीला तिकीट दिलं आहे. अशा व्यक्तीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. उत्पल यांनी राजीनामा दिला ही चांगली गोष्ट आहे. भाजपने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं. पर्रिकरांनी देशात गोव्याचा लौकिक वाढवला. पण त्यांच्याच मुलाला अपमानित केलं जात आहे. गोव्याच्या जनतेला चांगलं वाटलं नाही. त्यांनी राजीनामा दिला. अपक्ष लढले. आता बेईमानी विरुद्ध चारित्र्य अशी लढाई होणार आहे. दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांनी ज्या पणजीचं नेतृत्व केलं, त्या पणजीतून भाजपने बलात्कार, ड्रग्ज, भ्रष्टाचार, भूखंड घोटाळ्याचे आरोप असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. ही व्यक्ती आज भाजपचा चेहरा बनली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या प्रचारला येणार आहेत. देवेंद्र फडणवीस तर येऊनच बसले आहेत, असा हल्ला राऊत यांनी चढवला.
ड्रग्स संदर्भात, लँड माफिया संदर्भात ज्याचं नाव गोव्यात अत्यंत संतापाने घेतलं जातं अशी व्यक्ती आणि उत्पल पर्रिकर अशी लढाई होईल. उत्पल पर्रिकर यांची संपूर्ण पत्रकार परिषद मी पाहिली. त्यांची वेदना समजू शकतो. ज्या पक्षात जन्म झाला. तो पक्ष सोडून जाताना कशा वेदना होतात हे मी त्यांच्या चेहऱ्यांवरून समजू शकतो. उत्पल आणि हे सर्व असा सामना होणार. आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहे, असं राऊत म्हणाले.
भाजपने 34 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्या सर्वांचं चारित्र्य शिवसेनेकडे आहे. गोव्यात जाऊन त्यांचा पर्दाफाश करेल. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजप वाढवला. पार्सेकर हे मांद्र्यातून पहिल्यांदा लढले तेव्हा त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. तरीही ते पुन्हा लढले आणि हरले. पण त्यांनी पक्ष वाढवला. आज तेही म्हणतात पैसे देऊ शकलो नाही म्हणून भाजपने उमेदवारी नाकारली, असं त्यांनी सांगितलं.
गोव्यात आघाडी व्हावी म्हणून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी चर्चा केली. पण राज्यातील नेत्यांच्या आघाडीचे फायदे लक्षात येत नाहीत. आम्ही त्यांना मदत करायला तयार होतो. पण तरीही ते वेगळे लढत आहेत. तुम्ही कोणत्या दुनियेत आहात? कुठून येतो हा कॉन्फिडन्स? आम्हाला हा कॉन्फिडन्स उधार घ्यावा लागेल, असा हल्ला त्यांनी चढवला.
Video | भाजपचं सरकार गोव्यामध्ये बदनाम झालंय, सामनाचे अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्रhttps://t.co/lnUda3VTl6#BJP | #Goa
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 22, 2022
संबंधित बातम्या:
Mumbai Fire : भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला आग, तिघांचा मृत्यू, 15 जखमी