Uttar Pradesh Elections: महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिवसेनेने (Shiv Sena) महाराष्ट्राबाहेरही विस्तार करण्याचे ध्येय ठेवले होते. उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेनेने उमेदवार उभे करत अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी जुंपले होते. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तर गोव्यात तळ टोकून होते. मात्र गोव्यात शिवसेना सपशेल आपटी खावी लागली. तर उत्तर प्रदेशातही शिवसेनाचा फ्लॉप शो होताना दिसतोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Elections) एकमेव उमेदवारही पराभवाच्या छायेत आहे. लवकरच पूर्ण निकाल हाती येतील आणि उत्तर प्रदेशात नशीब आजमावणाऱ्या या पक्षांची स्थिती स्पष्ट होईल. देशातील पाच राज्यांत शिवसेनेला मिळालेल्या यश-अपयशाचा परिणाम महाराष्ट्रातील आगामी महापालिका निकालांवरही होणार हे निश्चित!
उत्तर प्रदेशात शिवसेनेने पक्ष विस्ताराची महत्त्वाकांक्षा ठेवत तब्बल 51 जागांवर निवडणूक लढवली होती. उत्तर प्रदेशातील चारशे जागांपैकी 51 जागांवर शिवसेनेनं उमेदवार उभे केले होते. स्वतः संजय राऊत महाराष्ट्राबाहेर शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी उतरले होते. मात्र आज उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालाचा पहिला कौल हाती येत आहे. यात भाजपाला आघाडी मिळत असून शिवसेनेचा फ्लॉप शो झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव उमेदवार पराभवाच्या छायेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनुपशहर मतदार संघातून ज्येष्ठ नेते के.के. शर्मा यांना उतरवलं होतं. मात्र सुरुवातीचे जे कौल हाती येत आहेत, तेथे शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या या मतदार संघात भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
निवडणूक निकालाविषयीचे ANI चे ट्वीट
People of Goa have given us a clear majority. We will get 20 seats or even 1-2 seats more. People have shown faith in PM Modi. Independent candidates are coming with us. MGP is also coming with us and taking all together, we will form our govt: BJP leader Devendra Fadnavis pic.twitter.com/s1lvXrL6Zv
— ANI (@ANI) March 10, 2022
गोव्यातदेखील शिवसेनेने चांगलाच जोर लावला होता. खासदार संजय राऊत कित्येक दिवस गोव्यात तळ ठोकून होते. सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचा प्रस्ताव शिवसेनेने ठेवला होता. मात्र काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत शिवसेनेने 10 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र गोव्यातही शिवसेना सपशेल आपटल्याचे चित्र आहे.
इतर बातम्या-
सनफ्लॉवर हॉस्पिटलवर 1 लाख रुपयांचा दंड, नागपूर मनपाने का केली कारवाई?