Goa Assembly Election Result : गोव्यातील भाजपच्या विजयात जी किशन रेड्डींचा मोठा वाटा, रणनिती आणि जनसंपर्कामुळे तिसऱ्यांदा सत्ता 

| Updated on: Mar 10, 2022 | 11:25 PM

गोव्यात भाजपल्या मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे जी किशन रेड्डी यांचं कौतुक होतं आहे. काही एक्झिट पोलमध्ये गोव्यात काँग्रेस सत्तेचा सोपान गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अशावेळी भाजपसमोरील अनेक अडचणी दूर करत भाजपला सत्तेत बसवण्यात जी किशन रेड्डी यांचा महत्वाचा वाटा आहे.

Goa Assembly Election Result : गोव्यातील भाजपच्या विजयात जी किशन रेड्डींचा मोठा वाटा, रणनिती आणि जनसंपर्कामुळे तिसऱ्यांदा सत्ता 
गोव्यातील विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी किशन रेड्डी
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपनं जोरदार विजय मिळवलाय. 2017 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षाही यंदा भाजपच्या जागांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. एक्झिट पोलचा (Exit Poll) अंदाज खोटा ठरवत भाजपने गोव्यात जोरदार विजय मिळवलाय. या विजयाचं श्रेय केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर क्षेत्राचे विकास मंत्री जी किशन रेड्डी (G Kishan Reddy) यांना दिला जातोय. गोव्यात भाजपल्या मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे जी किशन रेड्डी यांचं कौतुक होतं आहे. काही एक्झिट पोलमध्ये गोव्यात काँग्रेस सत्तेचा सोपान गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अशावेळी भाजपसमोरील अनेक अडचणी दूर करत भाजपला सत्तेत बसवण्यात जी किशन रेड्डी यांचा महत्वाचा वाटा आहे. गोव्यात भाजपला तीन अपक्षांनी तर एमजीपीनेही पाठिंबा दिल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे भाजप गोव्यात सत्तास्थापन करेल हे स्पष्ट आहे.

भाजपच्या विजयात जी किशन रेड्डींचा मोठा वाटा

एन्टी इन्कबन्सी फॅक्टर दूर करण्यासाठी आखलेली रणनिती आणि 33 टक्के वोट शेअर कायम राखल्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला. यासाठी भाजपचे गोवा सह प्रभारी जी किशन रेड्डी यांचं कौतुक होतंय. गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी किशन रेड्डी यांनी गोव्यात रणनिती आखण्यात मोठी भूमिका बजावली आहे. देवेंद्र फडणवीस आणि जी किशन रेड्डी यांची संपूर्ण रणनिती ही 67 टक्के विरोधी मतांवर आधारित होती. खरं तर गोव्यातील निवडणूक बहुरंगी बनली होती. कारण टीएमसी, आप यांच्यासह स्थानिक पक्ष आणि महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही गोव्याचा निवडणुकीत उडी घेतली होती.

फडणवीसांसोबत रणनिती आखण्यात रेड्डी अग्रभागी

विरोधी पक्षाचे नेते आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खिलाप यांच्या मतानुसार गोव्यात मतांची विभागणी, कमकुवत संघटन आणि उमेदवार निवडीतील चुका यामुळे काँग्रेस सत्तेपासून दूर गेली. दक्षिण गोव्यातील मतदारांनी काँग्रेसला पर्याय म्हणून टीएमसी आणि आपच्या बाजूनं कौल दिल्यास त्याचा फायदा भाजपला होईल, हे ओळखण्यात जी किशन रेड्डी यशस्वी ठरले. देवेंद्र फडणवीस आणि जी किशन रेड्डी हे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत एक एक जागेचं महत्व ओळखून उमेदवार निवड आणि निवडणूक प्रचारातील चुका टाळत भाजपला विजय मिळवून दिलाय.

भाजपकडून रेड्डींवर मोठा विश्वास

जी किशन रेड्डी हे तेलंगणाचे पहिले नेते आहेत जे तेलंगणाच्या निर्मितीनंतर कॅबिनेट मंत्री बनले आहेत. 2019 मध्ये त्यांना केंद्र सरकारमध्ये गृह राज्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडे केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्राचा विकास मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. रेड्डी यांनी आपल्या परिश्रमाच्या बळावर, तसंच लोकांचा विश्वास या बळावर सामान्य कार्यकर्त्यापासून मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. भाजपकडून रेड्डी यांची संघटन क्षमता आणि योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची हातोटी यामुळे गोव्यात सहप्रभारी म्हणून नेमणूक केली होती.

इतर बातम्या :

Goa Assembly Election | 4 बायका 4 नवरे, निवडणुकीत एकत्र उतरले! तिघे जिंकले, कोण हरले?

Goa Assembly Elections 2022 : मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं, गोव्यातल्या शिवसेनेच्या पराभवावर फडणवीसांनी मीठ चोळलं