थिरुअनंतपुरम : केरळ विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पिनारई विजयन यांच्या नेतृत्वात डाव्या लोकशाही आघाडीने (Left Democratic Front) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 140 जागांच्या विधानसभेत एलडीएफला (LDF) तब्बल 99 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे डाव्यांचा गड मानल्या जाणाऱ्या केरळात लाल झेंडा फडकत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे या निकालानंतर पिनारई विजयन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. त्यात पिनारई मागील पंचवार्षिकला भाजपने केरळमध्ये आपलं खातं उघडल्याचं सांगत आहेत. तसेच यंदा आम्ही भाजपचं केरळमधील खातं बंद करु असाही विश्वास व्यक्त करत आहेत. निकालानंतर पिनारई यांनी आपला शब्द खरा करुन दाखवल्याची जोरदार चर्चा आहे (Big victory of Left democratic front in Kerala Assembly election 2021 BJP account closed).
VIDEO: “मागच्या वेळी भाजपने आपलं खातं उघडलं, यंदा आम्ही खातं बंद करु”, विजयन यांनी केरळमधून भाजपला हद्दपार करण्याचा शब्द पूर्ण केला#Keral #KeralElections #KeralElections2021 #PinarayiVijayan @vijayanpinarayi pic.twitter.com/M9B2i93C8X
— Pravin Sindhu (@PravinSindhu) May 2, 2021
पंतप्रधान मोदींपासून दिग्गजांकडून प्रचार, मात्र मुख्यंत्री पदाचा दावेदारही पराभूत, भाजपचं ‘खातं बंद’
केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्लाय. केरमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री तर दूरच साधा एक आमदारही जिंकून आणता आलेला नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी निवडणुकीत म्हटल्याप्रमाणे भाजपचं केरळ विधानसभेतील खातं बंद केल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे भाजपने या निवडणुकीत केरळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरवलं होतं. केरळमधील प्रसिद्ध चेहरा असलेल्या मेट्रो मॅन ई श्रीधरन यांनाही पराभव चाखावा लागलाय.
मुख्यमंत्री पदावर दावा करणाऱ्या काँग्रेसच्या आघाडीचाही पराभव, 41 जागांवर विजय
दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचेही अनेक दावे फोल ठरलेय. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार असा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त लोकशाही आघाडीला (UDF) 41 जागांवर विजय मिळालाय. तर भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) आपलं खातंही खोलता आलेलं नाही. भाजपच्या या दारुण पराभवानंतर देशपातळीवर भाजपची नाचक्की झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पंतप्रधान मोदींपासून अनेक दिग्गज प्रचारासाठी आणूनही एकही जागेवर विजय न मिळाल्याने भाजपवर जोरदार टीका होतेय.
“ही वेळ विजय साजरा करण्याची नाही, कोविड विरोधातील लढा सुरुच राहिल”
या विजयावर बोलताना मुख्यमंत्री पिनारई विजयन म्हणाले, “केरळ विधानसभा निवडणुकीतील हा विजय मागील 5 वर्षात डाव्या लोकशाही आघाडीने केलेल्या कामाची पोचपावती आहे. हा लोकांचा विजय आहे. जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही जनेतवर विश्वास ठेवलाय. ही निवडणूक आमच्यासाठी मोठी राजकीय लढाई होती. राज्यात धर्मांधतेला अजिबात स्थान नाही. ही वेळ आमचा दणदणीत विजय साजरा करण्याची नाही. अनेकांना हा विजय साजरा करायचा आहे, पण ते थांबले आहेत. आत्ता आपल्या सर्वांना कोविड विरोधातील लढा लढत राहायचा आहे.”
केरळमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
हेही वाचा :
केरळमध्ये CPIM चा मोठा निर्णय, तरुणांना संधी देण्यासाठी 5 मंत्र्यांसह 25 आमदारांचं तिकिट कापलं
भाजपकडून 4 राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर, केरळमध्ये मेट्रो मॅन ‘या’ मतदारसंघातून निवडणूक रिंगणात
व्हिडीओ पाहा :