लोकसभा निवडणूकीच्या निकालासाठी उत्सुकता ताणली गेली आहे. यापूर्वी शेवटच्या सातव्या टप्प्यानंतर 1 जूनला सायंकाळी साडे सहा वाजता निवडणूक कौल जाहीर झाले.जवळपास सर्व एग्झिट पोलनी भाजपा 300 च्या पुढे खासदार मिळतील आणि एनडीएला 400 च्या पार जाईल असा अंदाज वर्तविला आहे. अशात महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीला जवळपास समसमान जागा मिळतीस असा अंदाज वर्तविला आहे. त्यातही भाजपाने नुकतेच दोन पक्ष फोडून ज्यांची मदत घेतली त्या एकनाश शिंदे आणि अजित पवार यांच्या पारड्यात मात्र एग्झिट पोलनी दान टाकलेले नसल्याने उद्धव ठाकरे याचं नाणं खणखणीत असल्याचे स्पष्ट होत महायुती ठाकरे गटच किंग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपाने आपल्याशी दगाफटका केल्याचा बदला म्हणून उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडून त्यांना संपविण्याचा प्रयत्न केला आहे. तरी सहानुभूतीची लाट मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने असल्याचा निवडणूक कौल आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली चुणूक दाखवित लोकसभेत ताकद दाखवली आहे. उद्धव ठाकरे यांना संपविण्याचे एकनाथ शिंदे आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची इच्छा काही फळद्रुप होत नसल्याचे आकडे एग्झिट पोलने दर्शविले आहेत. जसा भाजपाला भारत कॉंग्रेस मुक्त करता आला नाही तसा आता महाराष्ट्र देखील उद्धव ठाकरे मुक्त करता येणार नाही याची चुणूक मिळाली आहे.
महाराष्ट्राच्या 48 लोकसभेच्या जागांपैकी उद्धव ठाकरे यांच्या गटाला 9 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज इंडिया टुडे एक्सिस माय इंडिआच्या एग्झिट पोलने दर्शविला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने मुख्यमंत्री पद आणि शिवसेना पक्ष असे दोन्ही गमाविण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली. परंतू या परिस्थिती देखील कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्याची आकडेवारी निवडणूक कौल सांगत आहे. ठाकरे घराण्याला धक्का देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आणखी डिवचण्यासाठी भाजपाने उद्धव ठाकरे चुलत भाऊ राज ठाकरे यांनाही गळाला लावल्याचे उद्योग केले. परंतू तरीही उद्धव ठाकरे नमलेले नाही. आणि त्यांनी आपली ताकद दाखविलेली आहे. भाजपाने संपूर्ण देशात चांगली कामगिरी केली असली तरी महाराष्ट्र आणि बिहारमध्ये तिला चांगली कामगिरी करता आली नसल्याचा अंदाज एग्झिट पोलने दर्शविला आहे.
लोकसभांच्या जागा आणि व्होट शेअरिंग पाहता महाराष्ट्रात देखील एनडीए इंडिया आघाडीवर भारी पडले आहे. परंतू दोघांच्या जागातील गॅप इतका कमी आहे की काही खास फरक राहीला नाही. एग्झिट पोलच्या आकड्यांनूसार महाराष्ट्रात एनडीएला 28 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. आणि मतांची टक्केवारी 46 टक्के आहे. इंडिया आघाडीच्या वाट्याला 16 ते 20 जागा येण्याची शक्यता आहे. या मतांची टक्केवारी 43 टक्के सांगितली जात आहे. साल 2019 मध्ये 23 जागांवर विजय मिळविणारी भाजपा यंदा 22 जागांवर विजय मिळवेल असे म्हटले जात आहे. एग्झिट पोलच्या आकडेवारीनूसार साल 2019 मध्ये भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी 27.8 टक्के मिळाली होती. ती आता 29 टक्के मिळाली आहे. परंतू भाजपाला जागांच्या बाबतीत नुकसान होऊ शकते असे पोल म्हणत आहेत.
महाराष्ट्रात आता सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. उद्धव ठाकरे आणि भाजपाची युती आता राहीलली नाही. ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसशी आघाडी केल्याने राजकारणातील मित्र आता शत्रू झाले आहेत. साल 2019 च्या विधानसभा निवडणूकीनंतर जेव्हा शिवेसना आणि भाजपाची युती तुटली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एनसीपी आणि कॉंग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. भाजपा त्यामुळे संतापली आणि घात लावून बसली. कोरोनाकाळात उद्धव ठाकरे गंभीर आजारी असताना एकनाथ शिंदे यांना हाताशी घेऊन भाजपाने शिवसेना फोडली. त्यापाठोपाठ शरद पवार यांचे कुंपणावर असलेले पुतणे अजित पवार देखील पुन्हा भाजपाच्या हातात लागले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला लगोलग निवडणूक आयोगाने त्या-त्या पक्षाचे नेते घोषीत केले. त्यानंतर महायुती भाजपा आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन आता मजबूतीने लोकसभा निवडणूकांत उतरण्याचे काम केले.
आता उरली सुरली शिवसेना आणि राष्ट्रवादी संपविण्यासाठी खेळलेली महायुतीची खेळी अंगाशी येणार अशी चिन्हं आहेत. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांचे 23.5 टक्के मते मिळाली होती. एग्झिट पोलमध्ये हा आकडा 20 टक्के आहे. म्हणजे त्यांना केवळ 3.5 टक्के नुकसान झाले आहे. निवडणूकीच्या आधी झालेल्या नुकसानाच्या तुलनेत काहीच नाही. एग्झिट पोलनूसार ठाकरे यांच्या शिवसेना 9 ते 11 जागा मिळतील. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 8 ते 10 जागा मिळतील अशी आशा आहे. अजित पवार यांच्या गटाने 4 टक्के तर शरद पवार गटाने 9 टक्के मते मिळविली आहेत. शरद पवार यांच्या गटाला 3 ते 5 जागा मिळतील तर अजित पवार गटाला 1 ते 2 जागा मिळल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत एक घटक पक्ष कॉंग्रेसला 14 टक्के मते मिळाली आहेत. त्यांच्या खात्यात 3 ते 4 जागा येतील असा अंदाज आहे. येत्या दिवाळीच्या आधी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी हाच जोश कायम ठेवला तर सत्तेत जरी शिवसेना आली नाही तरी मजबूत विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरे भाजपाला टक्कर देतील असे म्हटले जात आहे.