अहमदनगरमध्ये विखे घराण्याला मोठा धक्का, डंके की चोट पर लंकेच, सुजय विखेंचा पराभव

| Updated on: Jun 04, 2024 | 7:39 PM

Ahmednagar Lok Sabha Election Final Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धक्कादायक निकालाची नोंद झाली. अनेक ठिकाणी विद्यमान खासदार पराभूत झाल्याचं चित्र आहे. अशाच प्रकारे सुजय विखे पाटील यांचाही पराभव झाला आहे.

अहमदनगरमध्ये विखे घराण्याला मोठा धक्का, डंके की चोट पर लंकेच, सुजय विखेंचा पराभव
निलेश लंके आणि सुजय विखे पाटील
Follow us on

लोकसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.  राज्यात अनेक जागांवर धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. अशातच अहमदनगर लोकसभा मतदार संघाचा निकाल समोर आलाय. भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या सुजय विखे-पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी विखेंचा पराभव करत विजयश्री मिळवला आहे.

शरद पवार गटाकडून उभे राहिलेल्या निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा 29 हजार 317 मतांनी पराभव केला आहे. सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यापासूनच निलेश लंके आणि सुजय विखे-पाटील यांच्याच अटीतटीची लढाई  सुरू होती. निलेश लंके आघाडीवर तर कधी सुजय विखे पाटील आघाडीवर जात होते अखेर लंके यांनी गुलाल उधळला.

कोरोनाकाळात निलेश लंके यांनी केलेल्या कामाचा त्यांना या निवडणुकीमध्ये फायदा झालेला दिसत आहे. निलेश लंके आणि सुजय विखेंमध्ये आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले होते. मात्र सुजय विखे पाटील यांच्या घरासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सुजय विखे पाटील यांचे वडील राधाकृष्ण विखे हे राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. 2019 साली सुजय विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला होता. विद्यमान खासदारच निवडणुकीला पडल्याने राज्यभरात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.