छत्रपती संभाजीनगरातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा मोठा पराभव झाला आहे. या ठिकाणी मंत्री संदीपान भुमरे यांचा मोठा विजय झाला आहे. या ठिकाणी आपल्या पराभवाला पक्षातील काही लोक जबाबदार असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अंबादार दानवे यांना तिकीट मिळेल अशी आशा होती. परंतू त्यांना तिकीट न देता पक्षाने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिले. त्यामुळे दोन्ही नेत्यातील वाद मातोश्रीपर्यंत पोहचला होता. आता पुन्हा पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर नाव न घेता टीका करीत मातोश्रीला तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.
चंद्रकांत खैरे यांनी आपला पराभव मनाला लागणारा असल्याचे म्हटले आहे. आपण कधी भ्रष्टाचार केला नाही. निर्व्यसनी माणसाला नागरिकांनी मत दिली नसल्याने आपण दुखी झालोय, मला रस्त्याने जाताना नागरिक सांगायचे मी निवडून येणार असे सांगायचे असे ते म्हणाले. येथे मुख्यमंत्री चार दिवस मुक्कामाला होते. संदीपान भूमरे यांनी 80 कोटी रुपये वाटल्याचा आरोपच खैरे यांनी केला आहे. तरीही आपण शिवसेना पक्ष सोडणार नाही. माझे कार्यकर्ते पारेषण झाले आहे. काही लोकांनी बदमाशी केली आहे. मतदार संघामध्ये काही घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्री चार दिवस शहरात होते. Evm मध्ये काही तरी झाले असेल असेही खैरे यांनी म्हटले आहे.
हा पैशाचा विजय आहे, हा धन शक्तीचा विजय असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी आरोप केला आहे. माझ्या पक्षातील काहींनी काम केले नाही असा संशय आहे. मी पक्ष प्रमुखाकडे तक्रार करणार आहे. विधानसभेत पुढे धोका होऊ नये या साठी आपण पक्ष प्रमुखांना भेटून तक्रार करणार आहे. मी एकटा पडलो, ते फक्त यायचे बसायचे. तो मोठा माणूस झाला, तो जिल्हा प्रमुख आहे. त्याने काम केलं पाहिजे होते. या वेळेस तरी अंबादास दानवे यांनी काम केले पाहिजे होते. त्यानी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे होती असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.
काल मतमोजणीचा कल लक्षात आल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी दुपारी 1.40 नंतर मतमोजणी केंद्रच सोडले. मी थोड्या वेळाने परत येतो, असे म्हणत खैरेंनी माघार घेतली ते पुन्हा आलेच नाही. त्यांना कौल लक्षात आला असावा त्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला. पहिल्या फेरीत इम्तियाज जलील यांना 3,338 मतांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत जलील यांना 2,277 मतांची आघाडी होती. त्यानंतर मात्र भुमरे यांनी आघाडी घ्यायला सुरूवात केली आणि नंतरच्या फेरीत ते पुढेच राहीले. .