Baharampur Lok Sabha constituency Election Leading Result 2024: क्रिकेटर Yusuf Pathan विजयाच्या दिशेने, काँग्रेसच्या दिग्गजाला धोबीपछाड देत संसदेत जाणार?

| Updated on: Jun 04, 2024 | 3:28 PM

Baharampur Lok Sabha Election Leading Result 2024: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू यूसुफ पठाण हा पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होता. यूसफ पठानने 29 हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

Baharampur Lok Sabha constituency Election Leading Result 2024: क्रिकेटर Yusuf Pathan विजयाच्या दिशेने, काँग्रेसच्या दिग्गजाला धोबीपछाड देत संसदेत जाणार?
yusuf pathan lok sabha election 2024
Image Credit source: PTI
Follow us on

लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडलं. मतदान पार पडल्यानंतर लगेचच विविध एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा भाजपप्रणित सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र आज 4 जून रोजी मतमोजणीच्या दिवशी एक्झिट पोलच्या विपरीत चित्र पाहायला मिळत आहेत.एकूण 543 लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात अनेक दिग्गजांसह विविध क्षेत्रातील व्यक्तीही आहेत. टीम इंडियाचा माजी अष्टपैलू युसूफ पठाण हा देखील पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. आता मतमोजणी सुरु आहे. त्यानुसार युसूफ पठाणने काँग्रेस आणि भाजप उमेदवारांना पिछाडीवर टाकत आघाडी घेतली आहे.

बहरामपूरमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे. काँग्रेसकडून अधीर रंजन चौधरी आणि भाजपकडून निर्मल कुमार साहा मैदानात आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दुपारी 3 वाजताच्या आकडेवारीनुसार, यूसुफ पठाण याला 2 लाख 94 हजार 140 मतं मिळाली आहेत. यूसुफ पठाणने काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांना 29 हजार 781 हजार मतांनी मागे टाकलं आहे. अधीर रंजन चौधरी यांना 2 लाख 64 हजार 359 मतं मिळाली आहेत. तर भाजप उमेदवार डॉक्टर निर्मल कुमार साहा 2 लाख 29 हजार 267 मतांसह तिसऱ्या स्थानी आहेत.

भाजप 250 पार

लोकसभा निवडणूक 2024 चे आतापर्यंतचे कळ पाहिले तर भाजपने 250 पार मजल मारली आहे. भाजपची सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. भाजपच्या नेतृत्वात एनडीए बहुमताजवळ आहे. तर काँग्रेसकडूनही भाजपला जोरदार टक्कर पाहायला मिळत आहेत.

क्रिकेटर ते खासदार

दरम्यान आतापर्यंत टीम इंडियाचे अनेक माजी दिग्गज हे खासदार झाले आहेत. यामध्ये गौतम गंभीर, नवज्योत सिंह सिद्धू, मोहम्मद अजहरुद्दीन, कीर्ती आझाद आणि चेतन चौहान यांचा समावेश आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचं

काँग्रेसचे दिग्गज नेता अधीर रंजन चौधरी बहरामपूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. चौधरी गेल्या 5 टर्मपासून या मतदारसंघातून खासदार आहेत. बहरामपूरमध्ये लोकसभा मतदारसंघात एकूण 7 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये कांदी, बरवा, भरतपूर, रेजीनगर, बेलडांगा, बहरमपूर आणि नऊदा हे विधानसभा मतदारसंघ आहेत. अधीर रंजन चौधरी यांनी 2014 आणि 2019 मोदी लाटेतही काँग्रेसकडून विजय मिळवला होता. चौधरी 1999 पासून या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत.