चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होताना दिसत आहे. पहिल्या फेरीत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धक्का बसला आहे. कॉंग्रसच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मतमोजणीत मागे टाकले आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात (Chandrapur Lok Sabha Constituency) भाजपचे राज्यातील नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार (Candidate of BJP Sudhir Mungantiwar) आणि माजी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (Candidate of Congress Pratibha Dhanorkar) अशी तुल्यबळ लढत होत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर यांच्या रूपाने कॉंग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला होता. मात्र, त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. 2024 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपने मंत्री सुधीर सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभेच्या मतदानात जवळपास 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार याचा निर्णय अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी बल्लारपूर (सुधीर मुनगंटीवार), वणी (संजीवरेड्डी बोदकुरवार), आर्णी (संदीप धुर्वे) या तीन मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. तर, वरोरा (प्रतिभा धानोरकर) आणि राजुरा (सुभाष धोटे) या दोन मतदारसंघात काँग्रेस आमदार आहेत. तर, चंद्रपूर विधानसभा किशोर जोरगेवार या अपक्ष आमदारांच्या ताब्यात आहे.
2004, 2009 आणि 2014 अशी सलग तीन वेळा ही जागा भाजपच्या ताब्यात होती. हंसराज अहिर हे येथील खासदार होते. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश (बाळू) धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला.
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स