नरेंद्र मोदी 3.0 रालोआ सरकरच्या मंत्र्यांचा शपथविधी समारंभ काल झाला आहे. यंदा नरेंद्र मोदी यांना आपल्या सरकारच्या स्थिरतेसाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे कॉंग्रेसप्रणित इंडिया आघाडीला देखील यावेळी चांगल्या जागा मिळालेल्या आहेत. 18 व्या लोकसभा विरोधी पक्षाची एकजूठ देखील कायम असल्याने दहा वर्षांनंतर खालच्या कनिष्ट सभागृहात 10 वर्षांनंतर सभागृहातील विरोधी पक्ष नेते पद मिळणार आहे. विरोधी पक्षांना आशा आहे की लवकरच लोकसभा उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल. हे पद देखील गेल्या पाच वर्षांपासून रिकामे आहे.
17 व्या लोकसभेतील संपूर्ण कालावधीत उपाध्यक्ष पद मिळाले नव्हते. या शिवाय कनिष्ट सभागृहाला लागोपाठ दुसऱ्या टर्ममध्ये विरोधी पक्ष नेते पदापासून वंचित रहावे लागले होते. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा खालच्या सभागृहात विरोधी पक्ष नेता कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षाला एक विरोधी पक्ष नेते पद आणि एक डेप्युटी स्पीकर ही दोन पदे लवकरच मिळतील अशी आशा लागून राहीली आहे. निकालानंतर कॉंग्रेस वर्कींग कमिटीची बैठक नुकतीच झाली आहे. या बैठकीत सभागृहातील विरोधी पक्ष नेते पद राहूल गांधी यांनी स्विकारावे असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. परंतू याप्रस्तावावर आपण विचारांती निर्णय घेऊ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान सोनिया गांधी यांना संसदीय दलाचे अध्यक्ष म्हणून सार्वनुमते निवडण्यात आले आहे.
सर्वसाधारणपणे लोकसभेचे उपाध्यक्ष ( डेप्युटी स्पीकर ) पद हे विरोधी पक्षाला दिले जात असते. परंतू कॉंग्रेसप्रणित इंडिया आघाडीने आतापर्यंत या संदर्भातील कोणतीही समन्वय बैठक आतापर्यंत घेतलेली नाही. आम्ही यावेळी हे पद रिकामे राहू नये यासाठी सरकारवर दबाव आणू असे एका विरोधी पक्ष नेत्याने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.
भाजपा सरकारने गेल्या पाच वर्षांत कोणताही डेप्युटी स्पीकर निवडला नसल्याचे तृणमूल कॉंग्रेसच्या एका नेत्याने म्हटले आहे. यंदा आशा आहे की या लोकसभा उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल अशी आशा असल्याचे या नेत्याने म्हटले आहे.
लोकसभेत गेली दहा वर्षे विरोधी पक्ष नेते पद रिकामे आहे. साल 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीत कॉंग्रेसला 44 जागा आणि 2019 मध्ये 52 जागा मिळाल्या होत्या. भाजपानंतर सर्वात जादा जागा आता कॉंग्रेसला मिळाल्या होत्या तरी देखील कॉंग्रेसला लोकसभेतील विरोधी पक्ष नेते पद देण्यात आले नव्हते.
विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी कोणत्याही पार्टीजवळ लोकसभेच्या एकूण जागांपैकी दहा टक्के जागा निवडून येण्याची गरज असते. म्हणजे लोकसभेच्या 543 जागा सध्या आहेत. तर 54 खासदार निवडून येण्याची आवश्यकता आहे.
17 व्या लोकसभेत कॉंग्रेसचे 52 खासदार निवडून आल्याने दोन जागा कमी पडल्याने कॉंग्रेसकडून विरोधी पक्ष नेते पदाचे खूर्ची गेली होती. यंदा कॉंग्रेसने चांगली कामगिरी करीत आपल्या ताकदीवर 99 खासदार निवडून आणले आहेत. त्यामुळे यंदा कॉंग्रेसला लोकसभेतील विरोधी पक्ष नेते पदाची मानाची खूर्ची मिळण्याची संधी मिळाली आहे.
विरोधी पक्ष नेते पद लोकशाहीत खूपच महत्वाचे असते. या पदाला लोकसभेत खूप मान असतो. या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असतो. सरकारच्या योजनांवर बोलणे सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम चांगला विरोधी पक्ष नेता करीत असतो. या पदासाठी लाल दिव्याची गाडी देखील असते. विरोधी पक्ष नेता सीबीआय-ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचे संचालक निवडप्रक्रीयेत सहभागी असतात.पंतप्रधानांबरोबर या निवड समितीत विरोधी पक्ष नेते पदाचा सल्ला घेतला जातो. यंदा या पदासाठी कॉंग्रेस वर्कींग कमिटीने राहुल गांधी यांचे नाव सुचविले आहे.