धुळे लोकसभा मतदारसंघासाठी (Dhule loksabha Constituency) भाजपच्या अनेक उमेदवारांची एकच भाऊ गर्दी झाली होती. मात्र, या भाऊगर्दीत दोन वेळा खासदार असलेले सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉ. सुभाष भामरे (Candidate of BJP Dr Subhash Bhamre), महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव (Candidate of Congress Dr. Shobha Bachhav) आणि वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहमान (Candidate of Vanchit Aghadi Abdul Rehman) यांच्यात तिरंगी लढत झाली. या लढतीमध्ये कॉंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांचा विजय झाला.
2009 मध्ये भाजपने प्रताप सोनवणे यांना धुळ्यातून उमेदवारी दिली होती. त्यांनी अंबरीश पटेल यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये सुभाष भामरे यांना संधी मिळाली. त्यांनीही अंबरीश पटेल यांच्या विरोधात सव्वालाखांपेक्षा अधिक फरकाने विजय मिळवला. 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने कुणाल रोहिदास पाटील यांना उमदेवारी दिली होती. पण, त्यांचाही भामरे यांनी पराभव केला. या निवडणुकीत भामरे यांचे मतदान वाढले होते. त्यांनी तब्बल सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पाटील यांचा पराभव केला.
धुळे या मतदारसंघासाठी 20 मे रोजी निवडणूक झाली. यंदा 56.61 टक्के मतदान झाले. धुळे अल्पसंख्याक समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाची मते येथे निर्णायक ठरली. येथे भाजपची अनेक वर्ष सत्ता होती. पण, कांदा आणि कापूस निर्यातबंदीवरुन येथील शेतकरी वर्गाची केंद्र सरकारने नाराजी ओढवून घेतली होती.
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स
लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज
लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर