लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज 1 जून रोजी पार पडणार आहे. हा टप्पा पार पडताच लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपेल. आज मतदान पार पडल्यावर संध्याकाळी 5 नंतर एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. या पोलमधून देशाचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचं चित्र काय असेल याचा साधारण अंदाज येणार आहे. दरम्यान पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी क्राईम ब्रांचने ही कारवाई केली असून आज 11.30 वाजता शिवानी अग्रवालच्या समोर अल्पवयीन आरोपीची चौकशी होणार आहे. मुंबईत आज दुसऱ्या दिवशीही मेगा ब्लॉग कायम असून मध्य रेल्वेच्या जवळपास 534 लोकल फेऱ्या रद्द. ठाण्यात फलाट क्रमांक 5 चं काम अंतिम टप्यात असून आज संध्याकाळी पर्यत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे मात्र परवा शेवटच्या टप्यातील काम पूर्ण करून फलाट प्रवाशासाठी खुला केला जाईल. या ब्लॉकमुळे मध्ये रेल्वेच्या विविध स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. नियंत्रणसाठी 250 हून अधिक रेल्वे पोलीस आणि टीससी तैनात करण्यात आले आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. मतमोजणीच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली आहे.
प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा सरकार बनणार आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार हे स्पष्ट झालेले आहे. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे अधिवेशन झाले होते त्यावेळी आम्ही नारा दिला होता, अबकी बार मोदी सरकार आणि चारशे पार, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटले.
भाजपा आणि मोदी यांचाकडून चारशे पारचां नारा दिला जात असला तरी त्याला महाराष्ट्रामध्ये
ब्रेक मिळेल याचा आम्हाला विश्वास होता.
परभणीची जागा शिवसेना जिंकेल याबाबत कोणाच्या मनात शंका नाही, परभणी जिल्हा आजही शिवसेनेच्या पाठीमागे आहे. शिवसेनेला मान्यता मिळून देणारा परभणी जिल्हा आहे, असे संजय जाधव यांनी म्हटले आहे.
१९ तारखेला अपघात झाल्यानंतर घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. सीसीटिव्ही सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलिसांना सरेंडर केले आहे. तपास अधिकाऱ्यांना कधी ही गरज लागली तर आरोपी हजर राहतील म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, असे प्रशांत पाटील, आरोपींचे वकील यांनी म्हटले.
नाशिक – यंदा रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी नाशिकला विशेष मान मिळाला आहे. रायगडावर असलेल्या होळीची माळ सजावटीचा मान नाशिककडे देण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला 351 वाहनांचा ताफा नाशिकच्या शिवभक्तांचा जाणारा आहे. नाशिकच्या गोदावरी नदीचे पाणी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी वाजत गाजत घेऊन जाण्यात येणार आहे. अजिंक्य राहिलेल्या रामशेज किल्ल्यावरील आणि धोडप किल्ल्यावरील ध्वज रायगडावर घेऊन जाणार आहेत.
कोल्हापूर- कळंबा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याची हत्या झाल्याची घटना समोर येत आहे. कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत ही हत्येची घटना घडली. जुना राजवाडा पोलिसांकडून कारागृहात झालेल्या हत्येच्या घटनेचा पंचनामा सुरू आहे.
पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी आज शिवानी अगरवाल आणि विशाल अगरवाल या दोघांना पुणे पोलीस कोर्टात हजर करणार आहेत. थोड्याच वेळात पुणे पोलीस दोघांना घेऊन कोर्टात येतील. ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी दोघांना काल अटक करण्यात आली होती.
नाशिकमध्ये ठाकरे गटाची कार्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. उमेदवार प्रतिनिधींना मतमोजणीसंदर्भात मार्गदर्शन करतील. मतमोजणी दरम्यान गैरप्रकार आढळल्यास त्वरित अक्षेप घ्यावा अशा सूचना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेचं काम वेळेआधीच पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगा ब्लॉक नियोजित होता. मात्र त्या आधीच ठाण्यातील फलाट रुंदीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरील पाच नंबरचा प्लॅटफॉर्म रुंद करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. रुंदीकरणाचं काम पूर्ण झाल्याने पाच नंबर फलाटावरून रेल्वे चालवून चाचणी केली. या नवीन बांधलेल्या फलाटाच्या बाजूने लोकल धावली आहे. लवकरच अंतिम परवानगी देऊन नवीन फलाट वापरासाठी खुला केला जाणार आहे.
1 जून रोजी लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं. त्यानंतर विविध वृत्त वाहिनी आणि पोल्सचे सर्वे जाहीर झाले. प्रत्येक पोलनुसार इंडिया आघाडीला- एनडीएला किती जागा मिळणार, याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यावरुन सत्ताधारी विरोधी गटातून विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. सर्व्हे खरे असतात असा काही भाग नाही. जनतेचा पोल घेतला तर सर्व्हे खोटे पडतील पंतप्रधान प्रचारात घसरले.हे सर्व्हे फोल ठरतील, असं म्हणत इंडिया आघाडीला 295 आसपास जागा मिळतील, असा विश्वास विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे.जवळपास तालुक्यातल्या 40 पैकी 40 तलाव हे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे सुमारे 96 टँकरनी पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र टँकरच्या खेपा पडत असल्याने पाणीटंचाईला दुष्काळग्रस्त सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे,जत तालुक्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून ओळख असणाऱ्या संख मध्यम प्रकल्प सध्या कोरडाठाक पडला आहे,त्यामुळे येथील पाण्याची परिस्थिती गंभीर बनली आहे.
मी 4 जूनच्या एक्झॅट पोलच्या प्रतिक्षेत असल्याची प्रतिक्रिया नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांनी दिली आहे. एक्झिट पोल देणारे मतदारांपर्यंत पोहचत नाहीत, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात ते उभे होते.
राज्यात महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सुप्रिया सुळे या दीड लाख मताधिक्याने निवडूण येतील. शिवसेनेचा 18 हा आकडा कायम असेल. तर काँग्रेसची जोरदार कामगिरी दिसेल, असे ते म्हणाले.
दक्षिणेतील अनेक ठिकाणी सुरुंग लावण्यात भाजप यशस्वी होईल, असा अंदाज एक्झिट पोलने लावला आहे. एनडीएला केवळ उत्तर भारतातूनच नाही तर दक्षिण भारत पण आघाडी देईल. तामिळनाडूतील 39 लोकसभा जागांपैकी 35 जागा इंडिया आघाडीच्या खात्यात जातील. तर इतर चार ठिकाणी एनडीए विजय होईल असा अंदाज आहे.
दुष्काळग्रस्त येवला तालुक्यातील राजापूरसह पूर्व भागातील 42 गावे लवकरच टँकर मुक्त होणार आहे. जल जीवन मिशन हर घर जल योजनेतून 184 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.नांदूर मधमेश्वर धरणात ते येवला तालुक्यातील राजापूरपर्यंत 65 किलोमीटर योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु आहे. आमगाव नगर परिषदेतद्वारे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी आहे.
लोकांचा जो अंदाज होता आणि आमचा जो अंदाज आहे तो एक्झिट पोलवरून खरा होताना दिसतो आहे.महाराष्ट्र मध्ये जागा कमी होण्याचं यात दिसत आहे.. इतर राज्यात बीजेपी मागच्यावेळी मागे होती मात्र यावेळी आगे कूच करताना दिसत आहे.. राज्यात जरी कमी जागा असल्या तरी इतर राज्यांमध्ये मात्र त्याची भर निघालेली आहे त्यामुळे 405 चा जो मोदींनी नारा दिला होता त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सफल होताना दिसत असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीचा निकाल माझ्या बाजुने असेल असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला. सासरे एकनाथ खडसे यांचा देखील माझ्या विजयासाठी वाटा असेल, असे त्या म्हणाल्या. सर्वच महायुतीच्या घटकांनी माझ्या या निवडणुकीत मोठ्या शक्तीने काम केले.भाजपमध्ये येण्याची इच्छा नाथाभाऊंनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात महायुतीला 38 ते 41 दरम्यान जागा मिळतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. मविआला राज्यात 35 च्या आसपास जागा मिळतील असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. 4 तारखेला आमचाच विजय होईल असं देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत.
गडचिरोली विविध गुन्ह्यात सहभागी असलेला एक कट्टर जनमिशियास नक्षलवादीला अटक… सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानावर हल्ला करणे व विकास कामात अडथळा निर्माण करणे असे अनेक नक्षलवाद्यावर गुन्हे दाखल… अहेरी उपविभागातील पेरमिली जंगल परिसरातून या नक्षलवाद्याला अटक करण्यात आली
एक्झिट पोलच्या अंदाजावर विश्वास नाही… असं वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलं आहे. निकाल आमच्या बाजूने लागणार… असं देखील तुपकर म्हणाले. तुपकरांनी बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती.
अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या ६० पैकी ४० जागांचे ट्रेंड आले असून भाजप बहुमताच्या जवळ पोहोचला आहे. ताज्या ट्रेंडमध्ये, भाजपा 19 जागांवर पुढे आहे आणि त्याने आधीच 10 बिनविरोध जिंकले आहेत, अशा प्रकारे भाजपा 29 जागांवर पुढे आहे. एनपीपी ४ जागांवर, काँग्रेस १ आणि इतर पक्ष ६ जागांवर आघाडीवर आहेत.
सिक्कीममधील 32 पैकी 30 जागांचे ट्रेंड आले असून सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) 29 जागांवर तर SDF एका जागेवर पुढे आहे.
सिक्कीममधील 32 पैकी 24 जागांसाठी कल दिसून आला आहे, त्यापैकी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) बहुमताच्या पुढे गेला आहे आणि 22 जागांवर पुढे आहे तर SDF 2 जागांवर पुढे आहे.
अरुणाचल प्रदेशात भाजप एकतर्फी विजयाकडे वाटचाल करत आहे. 60 जागांपैकी 31 जागांसाठी कल आलेला आहे, त्यापैकी भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे, तर 10 जागांवर बिनविरोध विजयी झाला आहे. याशिवाय एनपीपी 3 जागांवर तर इतर पक्ष 2 जागांवर आघाडीवर आहेत.
मध्य प्रदेशात भाजपाला क्लीन स्वीप मिळाली आहे. सर्वच्या सर्व 24 जागा भाजपाला मिळतील असा अंदाज टीव्ही 9 पोल स्ट्राटने वर्तविला आहे. Madhya Pradesh Exit Poll 2024 : NDA – 24 And INDIA – 0
रिपल्बिकन टीव्ही PMARQ एक्झिट पोलने भाजपाप्रणित एनडीएला सर्वाधिक 359 जागा येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तर इंडिया आघाडीला 154 जागा येतील असे म्हटले आहे. Republic tv PMARQ Exit poll 2024 : NDA – 359 And INDIA – 154
टीव्ही 9 पोल स्ट्राटच्या निवडणूक अंदाजानूसार एनडीएला 44 तर इंडियाला 70 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. TV 9 Poll strat Exit poll 2024 : NDA 44 And INDIA – 70
Exit poll 2024 : NDA – 353- 368 and INDIA – 118-133 other 43-48
चिरनेर गावातील भंगाराच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीवर अग्निशमन दलाला नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत भंगाराच्या गोदामाला आग लागली होती. आगीची तीव्रता एवढी होती की आगीचे लोट हवेत उडाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता आग नियंत्रणात आल्याने आसपासच्या ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही मिनिटांनी संपन्न होणार आहे. त्यानंतर एक्झिट पोलला सुरुवात होणार आहे. देशात कुणाला बहुमत मिळणार? महाराष्ट्रात मोदी की मविआची हवा? देशात कुणाचं पारडं जड? याचा अंदाज हा एक्झिट पोलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याआधी इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील, असा विश्वास काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डिंगोरे गावच्या परिसरातील माळशेज ऍग्रो टुरिझम-फार्म या रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या अश्लील नृत्यांच्या कार्यक्रमावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी रिसॉर्ट मॅनेजरसह 17 तरुण आणि 11 तरुणींना ताब्यात घेतलंय. ओतूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला आहे. गुडगावहून उज्जैनला जाणारी कार आणि ट्रक यांच्यात भीषण टक्कर झाली असून, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. राजेश अवस्थी पत्नी फरहा अवस्थी आणि मुलासोबत गुडगावहून उज्जैनला जात असताना दौसा जिल्ह्यातील बांदिकुई पोलीस स्टेशन परिसरात कारला ट्रकने धडक दिली. या अपघातात राजेश अवस्थी आणि पत्नी फरहा अवस्थी यांचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाच्या मागणीवरील राऊस ॲव्हेन्यू कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने अंतरिम जामिनावरील निर्णय ५ जूनपर्यंत राखून ठेवला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उद्या शरण जावे लागणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभेच्या सातव्या टप्प्यात आठ राज्यात मतदान होत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत 49.68 टक्के मतदान झालं आहे. बिहार 42.95%, चंडीगढ 52.61%, हिमाचल प्रदेश 58.41%, झारखंड 60.14%, ओडिशा 49.77%, पंजाब 46.38%, उत्तर प्रदेश 46.83%, पश्चिम बंगाल 58.46% मतदान झालं आहे.
#LokSabhaElections2024 | चुनाव के सातवें चरण में दोपहर 3 बजे तक 49.68% मतदान हुआ।
बिहार 42.95%
चंडीगढ़ 52.61%
हिमाचल प्रदेश 58.41%
झारखंड 60.14%
ओडिशा 49.77%
पंजाब 46.38%
उत्तर प्रदेश 46.83%
पश्चिम बंगाल 58.46% pic.twitter.com/vVlcr0O00w— ANI_HindiNews (@AHindinews) June 1, 2024
ज्येष्ठ अभिनेते आणि आसनसोल लोकसभा मतदारसंघातील टीएमसी उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की, इंडिया आघाडी जिंकणार आहे. आता ‘मुद्दा’ विरुद्ध ‘मोदी’ असा आहे. पंतप्रधान मोदींची कोणतीही हमी प्रत्यक्षात आलेली नाही. पीएम मोदींची विश्वासार्हता संपली आहे. माझ्या अनुभवावरून मी असे म्हणू शकतो की भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष 150-200 जागांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत.
दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल (काँग्रेस), अखिलेश यादव (सपा), शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस), अरविंद केजरीवाल, भगवंत मान, संजय सिंह आणि राघव चढ्ढा (आप) या बैठकीला उपस्थित आहेत.टीआर बालू (डीएमके), तेजस्वी यादव आणि संजय यादव (आरजेडी), चंपाई सोरेन आणि कल्पना सोरेन (जेएमएम), फारूक अब्दुल्ला (जम्मू आणि काश्मीर एनसी), डी. राजा (सीपीआय), सीताराम येचुरी (सीपीआयएम), अनिल देसाई (शिवसेना UBT), दीपंकर भट्टाचार्य (CPI(ML), मुकेश सहानी (VIP) उपस्थित आहेत.
INDIA alliance meeting underway at the residence of Congress President Mallikarjun Kharge, in Delhi.
Leaders attending the meeting are Mallikarjun Kharge, Sonia Gandhi, Rahul Gandhi, and KC Venugopal (INC), Akhilesh Yadav (SP), Sharad Pawar and Jitendra Awhad (NCP), Arvind… pic.twitter.com/ryNSHxqeBc
— ANI (@ANI) June 1, 2024
कन्याकुमारीमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यान साधना पूर्ण झाली आहे. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल हॉलमध्ये त्यांनी 45 तास ध्यानधारणा केली.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून संदीप गुळवे यांचे नाव समोर येत आहे.
शिरुर तालुक्यातील अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांच्या अल्पवयीन मुलीने पिकअप चालवत दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला. अपघातावेळी तिचे वडील हे शेजारीच बसले होते. शिक्रापुर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिची पोलीस चौकशी सुरू आहे.पुणे पोलीस अधिकारी ही चौकशी करत आहेत. ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात आज पुणे पोलिसांनी तिला अटक केली आहे.
नाशिकमध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे.नाशिकच्या म्हसरूळ परिसरात दुचाकी चोरीची घटना घडली आहे. दुचाकी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पार्किंगमध्ये पार्क केलेली होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी चोरट्यांने लांबवली आहे. दुचाकी चोरी प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मला उद्याच्या निकालाची काळजी आहे, निकाल लावताना दबाव आला तर प्रशासन निकाल लावण्याच्या वेळेत काही बदल करेल, असा आरोप धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे.
निकालाची धाकधूक नाही. माझ्या आयुष्यात मला कशाचीच धाकधूक वाटली नाही. मी विजयी होणार आहे. ज्या पद्धतीने माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलं लोकांनी प्रतिसाद दिला. भाजपा, आरएसएसने जे योगदान दिलं आहे. त्यामुळे यश 100 टक्के आहे.
सलमान खानवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या ४ आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. पुन्हा एकदा नव्याने सलमान खानच्या पनवेल मधील फार्म हाऊस वरती हल्ला करण्याचा प्लॅन होता. त्यांनी सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी देखील केली होती. चार जणांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. लॉरेन्स बिशनोईशी त्यांचा संबंध होता असे देखील माहिती समोर येत आहे.
एकीकडे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे निकालानंतर भाजपात जातील असा दावा केला जात असतानाच आता भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील कॉंग्रेस किंवा भाजपात जातील असे म्हटले आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन india आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत.
आज दुपारी 2 वाजल्यापासून इंडिया आघाडीची बैठक आहे. आमची युती आणि निवडणुकांच्या निकालाबाबत या बैठकीत चर्चा होईल, इंडिया आघाडीला चांगल्या जागा मिळतील असे झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी म्हटले आहे.
लोकसभेचा निकाल 4 जूनला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अखिल भारतीय मोदी परिवाराकडून शनिवारी चेंबूर वाशी नाका येथील शनी मंदिरामध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पदी यावेत यासाठी शनीमंदिरात दिवे लाऊन पूजा आणि आरती करण्यात आली.
गोंदिया शहरातील रामनगर परिसरात हिंदू – मुस्लिम अशा दोन्ही समाजातील नागरिकांनी अनधिकृत फलक आणि बॅनर हटविले आणि त्याजागी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. लोकसहभागातून काम होणार आहे.
धुळे लोकसभा मतदार संघातील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून पाहणी करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिनय गोयल आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी केली नगाव वारी परिसरातील शासकीय गोडाऊनमधील मतदान केंद्राची पाहणी केली. दिनांक 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे. 120 टेबलावर मतमोजणी होणार आहे.
4 जूनला कळेल की इंडिया आघाडी जिंकतीये. संपूर्ण देश राहुल गांधी यांच्यासोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोईनुसार तारखा ठरवल्या. चारही बाजूने कॅमेरा लावून मोदी ध्यानधारणा करत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विक्रोळी परिसरात सुरू असलेल्या अवैध काॅलसेंटरचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींकडून ४ हार्डडिक्स, ३ मोबाइल, १ राऊटर, आणि काही कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. कैलास इंडस्ट्रिअल येथे काही लोक अवैध काॅलसेंटर चालवत असल्याची बातमी पोलिसांना कळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या पत्यानुसार त्या ठिकाणी तपासणी केली असता. आरोपी हे व्हिसी डायलरद्वारे व्हिओआयपी काॅल द्वारे अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क करत होते.
पुणे पोलीस शिवानी अगरवालला घेऊन बाल न्याय मंडळात दाखल झाले आहेत. शिवानी अग्रवालसोबत अल्पवयीन आरोपीची चौकशी केली जाणार आहे. मायलेकाची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी ही चौकशी केली जाणार आहे.
काँग्रेसचे नेते संदीप गुळवे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी गुळवे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. संदीप गुळवे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव आहेत. आज दुपारी दोन वाजता शिवसेना भवन येथे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. गुळवे ठाकरे गटात केल्याने शिक्षक मतदार संघाचे समीकरण बदलणार आहे. किशोर दराडे ठाकरे गटातून शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळे पुन्हा दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 5 महिन्यात 28 जणांना स्वाईन फ्लू ची लागण तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूसोबत स्वाईन फ्लूचे देखील रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलं आहे… मृतांमध्ये एका महिलेचा आणि 50 वर्षीय पुरुषाचा समावेश
पुण्यातील शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळली आहे. ज्यामुळे बॉम्बशोध पथक शनिवार वाड्यात दाखल झाले आहेत. पुणे पोलिसांनी शनिवार वाडा रिकामा केला आहे. बेवारस बॅगेची पथकाकडून तपासणी सुरू…
पुण्यात कर्वे रोडवर अपघात… क्रेनच्या चाका खाली आल्याने एकाचा मृत्यू… सायकलस्वार मुलाचा मृत्यू… वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल अधिक तपास सुरू
मेगा ब्लॉकच्या दुसऱ्या दिवशी ही प्रवाशांचे हाल… भायखळा पुढचा प्रवास आम्ही करायचा कसा? ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा संतप्त सवाल… मेगा ब्लॉकचा दुसरा दिवस असून मुंबईहून कल्याणकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असल्याने कल्याण स्टेशन वरती मोठ्या प्रमाणात गर्दी…
पुणे बेंगलोर महामार्गावर स्पीड गणची संख्या वाढवली. किणी टोलनाक्यापासून कागलपर्यंत नव्या सहा स्पीड गण लावल्या. पुणे कार अपघात प्रकरणानंतर प्रशासनाची खबरदारी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकाला आधीच इंदापूरात सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जनतेच्या मनातील उमेदवार सुप्रिया सुळे प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा बॅनरवर उल्लेख आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षणार्थी कार्यकर्त्यांचे भर पावसात पथसंचलन झाले. पारंपारिक वाद्यांच्या सुरेख, लयबद्ध तालात शहरातील विविध भागातून हे संचलन पार पडले.संचलनादरम्यान विविध चौकात संचलनावर नागरिकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज राजधानी नवी दिल्लीत बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दुपारी ३ वाजता बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यासह इतर पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगतीवर बोरघाटात वाहतूक कासवगतीने सुरू आहे. वाहनांची संख्या वाढल्याने बोरघाटातील अमृतांजन ब्रिज दरम्यान वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. शनिवार आणि रविवारी सुट्ट्या आल्यामुळे मुंबईकर नागरिक घराबाहेर पडले आहे.
मध्य रेल्वे वरील मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर बेस्ट मार्फत मध्य रेल्वेच्या विविध स्थानकावरती अतिरिक्त बेस्ट बसेस चालवण्यात येत आहेत. 450 हुन जादा फेऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर, प्लाझा, भायखळा, वडाळा, सायन या मार्गांवर चालवण्यात येत आहेत.
धारशिव – निकालाआधीच महायुती राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विनापरवाना सभा घेतल्याने आचारसंहिता भंग. अर्चना पाटील यांच्यावर 43 दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना रॅली काढून जाहीर सभा घेतल्याने गुन्हा दाखल, या सभेसाठी परवानगी घेण्यात आली नव्हती.
लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा आज, 1 जून रोजी पार पडणार आहे. आज मतदान झाल्यावर संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर होतील. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार असला तरी एक्झिट पोल आधीच जाहीर होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचं चित्र काय असेल याचा साधारण अंदाज येणार आहे. त्यामुळेच एक्झिट पोलकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक अगरवाल यांच्या घरी आलं आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याचा आरोप तिच्यावर आहे. दरम्यान आज सकाळी 11.30 वाजता शिवानी अग्रवालच्या समोर पुणे पोलिस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहेत.