लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर निकाल समोर आले आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा गड राखण्यात यश मिळाल्याचं चित्र दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांचा खास माणूस म्हणून ओळख असलेल्या नरेश म्हस्के यांनी ठाण्यात दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा म्हस्के यांनी दारूण पराभव केला. नरेश म्हस्के 6,54,895 मतांनी विजयी झाले. तर राजन विचारे यांना 4,69,298 मते मिळाली. शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जास्त महत्त्वाची ठरली. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. हा गड राखण्यात शिंदेच्या शिवसेनेला यश मिळाल्याचं चित्र दिसत आहे.
शिवसेना फुटली तेव्हा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा राजन विचारे यांना संधी दिली. तर दुसरीकडे हायुतीकडून ठाण्याची जागा ही शिंदे गटासाठी सुटली. शिंदे गटाने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी लढत ठाण्यात बघायला मिळाली. या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज समोर आला आणि शिंदेंचा खास माणूस नरेश म्हस्के यांनी विजय मिळवत पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.
ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. असं असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा राजन विचारे यांना संधी दिली. तर दुसरीकडे महायुतीकडून ठाण्याची जागा ही शिंदे गटासाठी सुटली. शिंदे गटाने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी लढत ठाण्यात बघायला मिळाली. या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार सध्या ठाण्यात ठाकरे गटाचे राजन विचारे आघाडीवर आहेत.
ठाण्यात यावेळी मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला, त्याची परिणती घटलेल्या मतदानात झाली. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के इतकं मतदान झालं.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय ?
1984 मध्ये काँग्रेसचे शांताराम घोलप येथून खासदार झाले. भाजपचे राम कापसे 1989 आणि 1991 मध्ये दोनदा निवडून आले. 1996 नंतर ही जागा सलग 4 वेळा शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांच्या ताब्यात राहिली. त्यांच्या निधनानंतर 2008 मध्ये येथे पोटनिवडणूक झाली ज्यात त्यांचे पुत्र आनंद परांजपे विजयी झाले. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नायक विजयी झाले होते. मोदी लाटेत ही जागा भाजप-शिवसेना युतीकडे गेली. शिवसेनेचे राजन विचारे 2014 आणि 2019 मध्ये येथून खासदार म्हणून निवडून आले.