अमरावतीत भाजपाचा चर्चेतील चेहरा नवनीत राणा यांचा पराभव करुन निवडून आलेले कॉंग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे हे त्यांच्या विजयानंतर भावूक झाले आहेत. आपल्या आईबद्दल बोलताना त्यांचे अश्रु अनावर झाले. त्यांनी आपल्या राजकारणाचा प्रवास अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून सुरु केला ते आज थेट खासदार म्हणून समस्या मांडण्यासाठी ते दिल्लीतील संसदेत पोहचले आहे. या मतदार संघातील निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती.
बळवंत बनसोडे यांनी विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे. आपल्या आईबद्दल बोलताना त्यांना भावना अनावर झाल्या. त्यांची मातेने माझ्या मुलावर जिल्ह्यातील लोकांनी विश्वास टाकला त्याबद्दल मी जनतेचे आभार मानते असे म्हटले तेव्हा ते सद्गदीत झाले. लहानपणापासून त्याला समाजसेवेची आवड होती अशी प्रतिक्रीया त्यांच्या मातेने व्यक्त केली आहे. माझा मुलगा ग्रामपंचायत सदस्यपासून ते आज खासदार झाला याचा मला आनंद होत आहे. माझा मुलगा लोकांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देईल असाही विश्वास बळवंत वानखडे यांच्या मातेने व्यक्त केला. तर जिल्ह्यातील लोकांची सेवा आणि विकासाची काम ते करतील असा विश्वास त्यांच्या पत्नीने व्यक्त केला आहे.
मी अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी लोकांची इच्छा होती. लोकांना नवनीत राणा यांचे नृत्य, गाणे आणि नाटक आवडत नव्हते. मी नवनीत राणा यांना सल्ला देऊ शकत नाही, असा सल्ला जनतेने त्यांना दिला आहे. त्याने माझ्या 50 कामा पैकी पाचही कामे केली नाहीत. मला अमरावतीतून निवडणूक लढवायची होती. परंतू पण अमित शहा आणि ज्येष्ठ नेत्यांनी आपल्याला सल्ला दिला येथून लढू नये. वरिष्ठ नेत्यांनी मला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिले आहे असे आनंदराव अडसुळ यांनी म्हटले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात झालेले नुकसान आणि पक्ष फोडणे आणि घर फोडणे यामुळे लोक संतप्त झाल्याने झाले आहे असेही आनंदराव अडसुळ यांनी म्हटले आहे. आनंदराव अडसुळ महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत.