Loksabha Election : हा तर फक्त ट्रेलर … वाराणसीत मोदी पिछाडीवर, जयराम रमेश यांनी डिवचलं

| Updated on: Jun 04, 2024 | 10:20 AM

उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी पिछाडीवर आहेत. पहिल्या फेरीत मोदी 6,300 मतांनी पिछाडीवर होते. काँग्रेसचे अजय राय आघाडीवर आहेत. याचदरम्यान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत मोदींना डिवचलं आहे.

Loksabha Election : हा तर फक्त ट्रेलर ... वाराणसीत मोदी पिछाडीवर,  जयराम रमेश यांनी डिवचलं
Follow us on

लोकसभा निवडणुकीचे कलकल हळहळू समोर येताना दिसत आहेत. आत्तापर्यंतच्या आकड्यांनुसार भाजपा प्रणीत एनडीएकडे 275 जागा आहेत. तर काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने 200 जागांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र या दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी पिछाडीवर आहेत. पहिल्या फेरीत मोदी 6,300 मतांनी पिछाडीवर होते. काँग्रेसचे अजय राय आघाडीवर आहेत. याचदरम्यान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत मोदींना डिवचलं आहे.

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जयराम रमेश यांनी यांनी एक पोस्ट टाकली. त्यांनी वाराणसी लोकसभा मतदासंघाबाबात फोटो टाकत काँग्रेस उमेदवार आणि मोदींना मिळालेल्या मतांचा फोटो टाकला. ‘हा तर फक्त ट्रेलर आहे’ अशी कॅप्शन लिहीत त्यांनी हे ट्विट केलं.

 

भाजपला मोठा धक्का

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमध्ये पिछाडीवर गेल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने दोनददा लोकसभा निवडणूक लढवली. मोदींच्या लाटेमुळे दोनदा पूर्ण बहुमत मिळून सत्ताही मिळाली. मात्र आता तिसऱ्या निवडणुकीत मोदी पिछाडीवर गेल्याने भाजपसाठी ही धक्कादायक गोष्ट मानली जात आहे.

राहुल गांधी आघाडीवर

एकीकडे मोदी हे वाराणसीमधून पिछाडीवर असताना काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी हे वायनाडमधून आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळच्या वायनाड येथून राहुल गांधी हे आघाडीलर आहेत.  काँग्रेस नेते राहुल गांधी दोन्ही लोकसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत.