नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग यांच्या मतदारसंघात ‘नोटा’ला अनेकांचा प्रेफरन्स, किती जणांनी दाबलं नोटाचं बटण ?

| Updated on: Jun 06, 2024 | 9:48 AM

Lok Sabha Elections Result 2024 : मतदात्यांना एखाद्या मतदारसंघात कोणताही उमेदवार योग्य वाटला नाही, आवडला नाही तर ते इव्हीएमवर 'नोटा'चं बटण दाबतात. नोटा चा अर्थ आहे none of the above, यापैकी कोणीच नाही. याचा अर्थ ती व्यक्ती कोणत्याच उमेदवाराला मत देऊ इच्छित नाही.

नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग यांच्या मतदारसंघात नोटाला अनेकांचा प्रेफरन्स, किती जणांनी दाबलं नोटाचं बटण  ?
Follow us on

लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल लागले असून राज्यात पुन्हा लवकरच भाजपाप्रणित एनडीएचं सरकार येणार असून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील. एनडीएच सरकार येणार असंल तरी भाजपला अपेक्षित यश मिळाल नाही, अनेक राज्यात त्यांची बरीच पिछेहाट झालीय या निवडणुकीत बऱ्याच लोकांनी ‘नोटा’चं बटण दाबलं. अनेक मतदारसंघात भाजपप्रणित एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये चुरशीची लढत दिसली तर बसपा बऱ्याच ठिकाणी तिसऱ्या स्थानावर दिसला. या निवडणुकीत अनेक लोकांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. अशा अनेक जागा आहेत ज्या मतदारसंघात अपक्ष उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ ला जास्त मतं मिळाली आणि ‘नोटा’चा पर्याय चौथ्या स्थानावर होता.

मतदात्यांना एखाद्या मतदारसंघात कोणताही उमेदवार योग्य वाटला नाही, आवडला नाही तर ते इव्हीएमवर ‘नोटा’चं बटण दाबतात. नोटा चा अर्थ आहे none of the above, यापैकी कोणीच नाही. याचा अर्थ ती व्यक्ती कोणत्याच उमेदवाराला मत देऊ इच्छित नाही. यावेळी उत्तर प्रदेशातील अनेक जागांवर भाजपा, इंडिया आघाडी आणि बसपा यांच्या उमेदवारांनतर नोटाला बरीच पसंती मिळालेली दिसली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली, तेथेही ‘नोटा’चं बटण दाबणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारणसी मतदारसंघात नोटा हा पर्याय चौथ्या स्थानी होता. वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण 7 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना 6 लाख 12 हजार 970 मिळाली तर दुसऱ्या स्थानी असलेले इंडिया आघाडीचे अजय राय यांना 4 लाख 60 हजार 457 मतं आणि तिसऱ्या स्थानी बसपाचे अतहर जमाल लारी यांना 33 हजार 766 मतं मिळाली. तर चौथ्या स्थानी नोटा होता. येथे 8 हजार 478 लोकांनी नोटाचं बटण दाबलं.

लोकसभा निवडणुकीत या जागांवर चौथ्या स्थानी होता ‘नोटा’

– राजनाथ सिंह यांच्या लखनऊ सीटवरही अनेक लोकांनी नोटाचं बटण दाबलं. येथे नोटाला 7 हजार 350 मतं मिळाली.

– गौतमबुद्ध नगर सीट वरही नोटा पर्याय चौथ्या स्थानी होता. तेथे 10 हजार 324 लोकांनी नोटाचं बट दाबलं.

– मेरठ सीट वरही 4 हजार 776 लोकांनी नोटा हा पर्याय निवडला. आणइ पाच अपक्ष उमेदवारांना मागे टाकलं.

– दहा अपक्ष उमेदवारांना मागे टाकून बरेली जागेवर NOTA चौथ्या स्थानावर राहिला. येथे 6हजार 260 लोकांनी नोटाचं बटण दाबलं.

– पिलीभीत सीटवरही सात उमेदवारांना नोटाने धूळ चारली. तेथे नोटाला 6 हजार 741 मते पडली.

– शिवपाल सिंह यादव यांचा मुलगा आदित्य यादव यांच्या बदाऊं जागेवर नोटाला 8562 मते मिळाली.

– युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरच्या मतदारसंघात गोरखपूरमध्ये 7881 लोकांनी NOTA बटण दाबले आणि दहा उमेदवारांना मागे टाकले.

– मैनपुरी, कन्नौज, आझमगड आणि गाझीपूर सारख्या जागांवर मतदारांची चौथी पसंती म्हणून NOTA ला होती. या जागांवर लोकांनी नोटा खूप दाबला.

– या व्यतिरिक्त, यूपीमध्ये अशा अनेक जागा होत्या जिथे NOTA ने चौथे किंवा पाचवे स्थान मिळवले आणि अपक्ष उमेदवारांना मागे टाकले.