मोदी 3.0 एनडीए सरकारच्या मंत्र्यांचे खाते वाटप शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी पार पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची रचना करताना आपल्या विश्वासार्ह कोअर टीमची खाती तिच कायम ठेवली आहेत. इतर खात्यांमध्ये भाकरी फिरविली आहेत. या खात्याच्या वाटपात महत्वाची खाती स्वत:कडे राखून ठेवली आहेत. सर्वात महत्वाचे गृहमंत्रालय हे खाते मोदी यांनी स्वत: मित्र आणि साथीदार अमित शाह यांच्याकडेच कायम ठेवले आहे. या लोकसभा 2024 च्या भाजपाला एकट्याच्या जीवावर बहुमताचा जादुई आकडा गाठता आलेला नाही. एनडीएला मात्र बहुतम मिळाल्याने हे सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण आलेली नाही. 9 जून रोजी राष्ट्रपती भवनातील प्रांगणात झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात मोदी 3.0 एनडीए सरकारच्या 72 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: जवळ अंतराळ मंत्रालय, अणू ऊर्जा मंत्रालय, कार्मिक, पब्लिक ग्रीव्हन्स आणि पेन्शन तसेच सर्व महत्वाचे पॉलिसी इश्यू आणि इतर मंत्र्यांना न दिलेली सर्व खाती स्वत: कडे ठेवली आहेत. राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खाते, अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रालय, नितिन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, जे.पी.नड्डा यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रासायनिक आणि खते मंत्रालय सोपवले आहे. तर शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषि आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण मंत्रालय, निर्माला सितारामन यांच्याकडे अर्थ आणि कॉर्पोरेट अफेअर, डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय, मनोहर लाल यांच्याकडे गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालाय तसेच ऊर्जा मंत्रालय, एच.डी. कुमारस्वामी यांना अवजड उद्योग स्टील मंत्रालय, पियुष गोयल यांना व्यापार आणि वाणिज्य मंत्रालय, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण मंत्रालय, जितनराम मांझी यांच्याकडे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि राजीव रंजन सिंह ऊर्फ लालन सिंह यांच्याकडे पंचायत राज आणि मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालय सोपविण्यात आली आहेत.
पंतप्रधान पदानंतर सर्वात महत्वाचे मंत्रालय जर देशात कोणते असेल तर ते गृहमंत्रालय असते. गृह मंत्रालय भारतीय राज्य विभागाच्या रूपात काम करत असते. हे मुख्य रूपाने देशाच्या सुरक्षेशी संबंधित असते. देशाची अंतरिक सुरक्षा आणि देशाची घरेलु आणि अंतरिक सुरक्षा यांचा जबाबदारी या खात्याकडे असते. या शिवाय गृह मंत्रालयात राज्याच्या घटनात्मक अधिकारात दखल केल्या शिवाय सुरक्षा, शांती आणि सौहार्द बनविण्यासाठी कार्य करणे ही जबाबदारी गृहमंत्रालयाची असते.
राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयए देखील गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असते. एनआयएची स्थापना 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर करण्यात आली होती, गृह मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या या तपास यंत्रणेत सुमारे 600 कर्मचारी काम करीत असतात.
एनआयएकडे मानव तस्करी, बनावट नोटांशी संबंधित गुन्हे, सायबर दहशतवाद, विस्फोटक पदार्थांशी संबंधित प्रकरणे, प्रतिबंधित हत्यारांचा व्यापार आणि त्यांची विक्री संबंधित गुन्ह्यांचा तपास ही एनआयए एजन्सी करते. याशिवाय NIA च्या जवळ परदेशात घडललेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याची सुद्धा अधिकार आहे. NIA च्या तपास अधिकाऱ्यांना भारतीय पोलिस सेवा, भारतीय महसूल सेवा, राज्य पोलिस, आयकर शिवाय CRPF, ITBP, BSF अशा केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांतून निवडले जाते. तसेच परीक्षांच्या माध्यमातून देखील NIA मध्ये नवीन अधिकाऱ्यांची भरती केली जाते.