पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मोदी यांच्या पंतप्रधान पदावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज संसदेच्या कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये एनडीएची बैठक पार पडली. यावेळी मोदींनी खासदारांना आणि देशवासियांना संबोधित केलं. यावेळी मोदींनी देशाच्या विकासाचा रोडमॅप मांडला. देश कसा विकास करेल याची रुपरेखा मांडली. त्याचवेळी एनडीएच्या यशाची मिमांसा करतानाच एनडीएच्या गेल्या 30 वर्षातील सर्व नेत्यांचं स्मरण केलं. यावेळी मोदींनी शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंही स्मरण केलं.
एनडीए ही लोकांची भाऊ गर्दी नाही. आम्ही राष्ट्राशी समर्पित आहोत. राष्ट्राशी समर्पित असणाऱ्या लोकांचा हा समूह आहे. गेल्या 30 वर्षाचा हा कालखंड आहे. देशातील राजकीय व्यवस्थेतील ही सर्वात मोठी आणि जुनी ऑर्गेनिक अलायन्स आहे. मूल्य सांभाळणारी ही अलायन्स आहे. अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, प्रकाश सिंह बादल. शरद यादव अशी अगणित नावे आहेत. या लोकांनी जे बीज लावलं होतं. आज भारताच्या जनतेने विश्वासाचं सिंचन करून त्याचा वटवृक्ष केलं आहे. आपल्याकडे या महान नेत्यांचा वारसा आहे. आपल्याला त्याचा अभिमान आहे. आपण एनडीएच्या त्या मूल्यांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
गुड गव्हर्नन्स म्हणजे एनडीए
गुड गव्हर्नन्स ही आमच्यातील कॉमन गोष्ट आहे. आम्ही गुड गव्हर्नन्स दिलं आहे. एनडीए म्हटल्यावर गुड गुड गव्हर्नन्स हा पर्यायी शब्द होतो. मी गुजरातमधून आलो. नीतीश कुमार बिहारमधून आले. चंद्राबाबू आंध्रप्रदेशातून आले, आम्ही कुठूनही आलो असेल, पण आमच्या सर्वात गरीबांचे कल्याण हे सर्वोच्च राहिलं आहे. देशाने एनडीएच्या गरीब कल्याण्याच्या गुड गव्हर्न्सच्या दहा वर्षाला पाहिलं आहे. देश ही दहा वर्ष जगला आहे, असं मी सांगू शकतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
आपला, परका कोणी नाही
सभागृहात कोणत्याही पक्षाचा कोणीही लोकप्रतिनिधी असेल तर तो माझ्यासाठी सर्व समान आहे. लोकसभा असो की राज्यसभेचा सदस्य असो आमच्यासाठी सर्व समान आहेत. त्यामुळेच एनडीए 30 वर्षापासून मजबुतीने पुढे गेला आहे. आपला परका कोणी नाही. सर्वांना आम्ही जवळ घेतलं आहे. आम्ही 2024मध्ये या टीम भावनेने काम केलं आणि ग्रासरुट लेव्हलपर्यंत काम केलं, त्यामध्येच आपल्याला आर्गेनिक अलायन्सचं सामर्थ्य दिलं आहे. एक दुसऱ्यांची मदत केली आहे. जिथे कमी तिथे आम्ही हाच विचार आम्ही केला. काही कमी असेल तर मी येईल, काही कमी पडू देणार नाही. जिथे कमी तिथे आम्ही असं कार्यकर्ते जगले. त्यामुळे तर विजय मिळाला, असं मोदी म्हणाले.