एनडीएला तीन दशकं झाली आहेत. या अलायन्सने ३० वर्षातील पाच पाच वर्षाचे तीन टर्म पूर्ण केले आहेत. आणि चौथ्या टर्ममध्ये मुक्त मनाने प्रवेश करत आहोत. मुक्त मन महत्त्वाचं आहे. विश्लेषक विचार करतील तर त्यांना दिसेल की एनडीए सरकार चालवणारा जमावडा नाही, गर्दी नाही. ही राष्ट्रप्रथमच्या मूळ भावनेशी कमिटेड आहे. हा तसा समूह आहे. एनडीए हे भारताच्या राजकीय व्यवस्थेथील ऑर्गेनिक अलायन्स आहे, असा दावा एनडीएचे नेते नरेंद्र मोदी यांनी केला. या लोकांनी जे बीज लावलं होतं. आज भारताच्या जनतेने विश्वासाचं सिंचन करून त्याचा वटवृक्ष केलं आहे. आपल्याकडे या महान नेत्यांचा वारसा आहे. आपल्याला त्याचा अभिमान आहे. आपण एनडीएच्या त्या मूल्यांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे, असं ते म्हणाले. आज नरेंद्र मोदी यांची NDA चे नेते म्हणून निवड करण्यात आली.
एनडीए म्हटल्यावर गुड गव्हर्न्स हा पर्यायी शब्द
गुड गव्हर्न्स ही आमच्यातील कॉमन गोष्ट आहे. आम्ही गुड गव्हर्न्स दिलं आहे. एनडीए म्हटल्यावर गुड गव्हर्न्स हा पर्यायी शब्द होतो. आम्ही कुठेही राहिलो असेल, गरीबांचे कल्याण हे आमच्यात सर्वोच्च राहिलं आहे. देशाने एनडीएच्या गरीब कल्याण्याच्या गुड गव्हर्न्सच्या दहा वर्षाला पाहिलं आहे. देश जगला आहे, असं मी सांगू शकतो.
तेव्हाच लोकशाही मजबूत होईल
मध्यम वर्ग आणि उच्च मध्यमवर्गाच्या जीवानातील सरकारचा हस्तक्षेप जेवढा कमी होईल, तेवढी लोकशाही मजबूत होईल असं माझं मत आहे. आज तंत्रज्ञानाच्या युगात आपण सहजपणे ते करू शकतो. आपल्याला बदल हवा आहे. गुड गव्हर्न्सचा हा महत्त्वाचा भाग आहे. विकासाचा नवा अध्याय लिहू. जनतेच्या भागिदारीचा अध्याय लिहू. विकसित भारताचं स्वप्न साकार करू, असे आवाहन मोदी यांनी केलं.
सभागृहात कोणत्याही पक्षाचा कोणीही लोकप्रतिनिधी असेल तर तो माझ्यासाठी सर्व समान आहे. सभागृहातही लोकसभा असो की राज्यसभा असो आमच्यासाठी सर्व समान आहे. त्यामुळेच एनडीए ३० वर्षापासून मजबुतीने पुढे गेला आहे. आपला परका कोणी नाही. सर्वांना आम्ही जवळ घेतलं आहे. आम्ही २०२४मध्ये या टीम भावनेने काम केलं आणि ग्रासरुट लेव्हलपर्यंत काम केलं, त्यामध्येच आपल्याला आर्गेनिक अलायन्सचं सामर्थ्य दिलं आहे. एक दुसऱ्यांची मदत केली आहे. जिथे कमी तिथे आम्ही हाच विचार आम्ही केला. काही कमी असेल तर मी येईल, काही कमी पडू देणार नाही. जिथे कमी तिथे आम्ही असं कार्यकर्ते जगले. त्यामुळे तर विजय मिळाला.