दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ( South Mumbai loksabha Constituency ) ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत ( Arvind Sawant candidate of Shivsena Thackeray Group ) यांच्याविरोधात भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी जाधव ( Yamnini Jadhav candidate of Shivsena Shinde Group ) यांच्यात लढत झाली. दक्षिण मुंबईमध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झाले होते. या लढतीमध्ये अरविंद सावंत यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली.
2014 च्या आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे मिलिंद मुरली देवरा यांचा पराभव केला होता. 2019 च्या निवडणूक जिंकल्यानंतर अरविंद सावंत यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत मतभेद झाले. त्यामुळे अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेनेचे 13 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. परंतु, अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली.
2024 च्या निवडणुकीत अरविंद सावंत यांच्याविरोधात शिंदे गटात प्रवेश केलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, त्यांना राज्यसभेची संधी देण्यात आल्याने शिंदे गटाने येथून भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली. दक्षिण मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीकडे 3 आणि महाविकास आघाडीकडे 3 असे समसमान संख्याबळ आहे.
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स