Maharashtra Political News live : सांगली जिल्ह्यातील पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

| Updated on: Jun 09, 2024 | 6:07 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 9 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : सांगली जिल्ह्यातील पावसाने शेतकऱ्यांना दिलासा
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.या शपथविधी समारंभापूर्वी नरेंद्र मोदी यांनी सकाळी राजघाटावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी वॉर मेमोरियलवर जाऊन शहिदांना अभिवादन केले. मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा देखील आज शपथविधी होणार असून जगभरातील विविध राष्ट्रांचे प्रमुख या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 1400 रुपयांनी घसरले तर चांदीच्या भावातही 600 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर 71 हजार 500 रुपये प्रतितोळ्यावर आले तर चांदी 92 हजार 200 रुपये प्रतिकिलोवर आली. जळगावच्या सराफ बाजारात दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत घसरण सुरू आहे. पुण्यात काल झालेल्या पावसामुळे शहरात विविध भागात पाणी साचलं असून पुणे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात अजूनही पाणी साचलेलं आहे. भुयारी मार्गात असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे दुकानातील सामानाचे नुकसान झालं आहे. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये आज भारत वि. पाकिस्तान सामना रंगणार असून सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सामन्यावर लागले आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Jun 2024 04:52 PM (IST)

    व्ही के पांडियन यांनी सक्रिय राजकारण सोडले

    माजी आयएएस अधिकारी आणि बिजू जनता दल (बीजेडी) नेते व्हीके पांडियन यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. ओडिशा निवडणुकीत व्हीके पांडियन हे केंद्रबिंदू ठरले होते, मात्र आता त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 09 Jun 2024 04:45 PM (IST)

    श्रीपाद नाईक तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार

    उत्तर गोव्यातून सलग सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले श्रीपाद नाईक आज तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अटलजींच्या दोन्ही सरकारांमध्ये ते राज्यमंत्री राहिले आहेत. श्रीपाद नाईक म्हणाले की, गोवा हे छोटे राज्य आहे, पण मोदीजी जेव्हा गोव्याला त्यांच्या मंत्रिमंडळात संधी देतात तेव्हा त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.


  • 09 Jun 2024 04:35 PM (IST)

    शपथविधी सोहळ्यापूर्वी ड्युटी मार्गावर मोदींचे पोस्टर्स झळकले

    दिल्ली: राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी 7.15 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यापूर्वी पंतप्रधानपदी नियुक्त नरेंद्र मोदी यांचे पोस्टर्स कर्तव्य पथावर लावण्यात आले आहेत.

  • 09 Jun 2024 04:15 PM (IST)

    मंत्रिपदावरून अजित पवार गटात असंतोष!

    मंत्रिपदावरून अजित पवार गोटात नाराजी आहे. त्यासाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांची दिल्लीतील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. भाजपाने अजित पवार यांना मतभेद मिटवण्यास सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस काहीही न बोलता निघून गेल्याचं सांगितलं जात आहे.

  • 09 Jun 2024 04:05 PM (IST)

    महाराष्ट्रातील भाजपा खासदारांसोबत फडणवीस यांची बैठक

    दिल्लीतील महाराष्ट्र सदनात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपच्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक सुरू आहे. मंत्रिपद मिळाले आहे तेही खासदार फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुंबई सेंट्रल मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांच्याकडून निवडणूक पराभूत झालेले उज्ज्वल निकम यांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे.

  • 09 Jun 2024 02:53 PM (IST)

    सांगली जिल्ह्यातील पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

    सांगली जिल्ह्यात गेले चार दिवस झाले पाऊस पडत आहे. जिल्ह्यात ठीक ठिकाणी ओडे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर दुसरीकडे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ही वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कृष्णा नदी पाणी पातळी वाढल्याने सांगलीकर सुखावले आहेत. सांगलीवाडी बंधाऱ्यावरून पाणी पडू लागले आहे. तर या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

  • 09 Jun 2024 01:56 PM (IST)

    रोहित पवार यांची जोरदार टीका

    जे नेते साहेबांना सोडून गेले त्यांना व्यक्तिगत खूप काही मिळालं आहे. प्रफुल पटेल यांना व्यक्तिगत गिफ्ट दिलंय, ईडीने त्यांची प्रॉपर्टी सोडवली. त्यामुळे मंत्रिपद मिळाले नाही तरी व्यक्तिगत गिफ्ट मिळाले आहे, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

  • 09 Jun 2024 01:21 PM (IST)

    खडसे कुटुंबिय दिल्लीकडे रवाना

    खासदार रक्षा खडसे यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी एकनाथ खडसे व कुटुंबीय जळगाव विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

  • 09 Jun 2024 01:02 PM (IST)

    सुधीर मुनगंटीवार यांचे मोठे विधान

    अजित पवारांच्या पक्षाच्या मंत्री पदाबाबत काय चर्चा झाली मला माहीत नाही. संतुलित मंत्रिमंडळ पाहायला मिळतंय. या मंत्र्यांचा फायदा हा महाराष्ट्रात होईल. उद्धव ठाकरे काय स्वतःच्या पायावर मुख्यमंत्री होते का? त्यांनी कोणाच्या कुबड्या घेतल्या, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

  • 09 Jun 2024 12:57 PM (IST)

    समरजित घाटगे यांच्या पत्नीला वीस लाखाचा गंडा

    भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांना दोन अज्ञातांकडून वीस लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. कस्टम अधिकारी आणि सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत पैसे उकळले आहेत. मलेशिया मध्ये पाठवलेल्या पार्सलमध्ये एमडी ड्रग्स आणि बनावट पासपोर्ट असल्याच सांगत फसवणूक केली आहे. कारवाई टाळण्यासाठी 20 लाखांची मागणी करत बँक खात्यातून पैसे काढले आहेत. नवोदिता घाटगे यांची शाहूपुरी पोलिसात तक्रार केली आहे.

  • 09 Jun 2024 12:50 PM (IST)

    राहुल गांधी रायबरेलीला जाणार

    काँग्रेस नेते राहुल गांधी 11 जूनला रायबरेलीला जाणार आहेत. सोनिया गांधी प्रियंका गांधी यांच्यासोबत राहुल गांधी मतदारसंघात जाणार आहेत. 12 जूनला राहुल गांधी वायनाडमध्ये जाणार आहेत. दोन्ही दौऱ्यानंतर वायनाड मधील खासदारकीचा राहुल गांधी राजीनामा देणार आहेत.

  • 09 Jun 2024 12:45 PM (IST)

    दसऱ्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर विमानतळावरून कार्गो सेवा सुरू होणार

    कोल्हापूर विमानतळावरून दसऱ्याच्या मुहूर्तावर कार्गो सेवा सुरू होणार आहे.  कार्गो सेवा सुरू करण्या साठी च्या आवश्यक अहवाल आणि प्राथमिक बाबींची पूर्तता पूर्ण झाली आहे. अग्नि प्रतिबंधक आणि सुरक्षा संदर्भातील अहवालाला मंजुरी मिळतात कार्गोसेवा सुरू होणार आहे. कोल्हापूर विमानतळाची जुनी इमारत कार्गो सेवेसाठी वापरली जाणार आहे. कार्गो सेवेमुळे चांदी व्यापाऱ्यांसह फुले आणि भाजी फळ उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे.

  • 09 Jun 2024 12:32 PM (IST)

    अजित पवार गटाला अद्यापही मंत्रिपदासाठी फोन नाही

    अजित पवार गटाला अद्यापही मंत्रिपदासाठी फोन आलेला नाहीये. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी घडीमोडींना वेग आलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तटकरेंच्या घरी आहेत. मागच्या एक तासापासून या ठिकाणी बैठक सुरु आहे.

  • 09 Jun 2024 12:30 PM (IST)

    रक्षा खडसेंचं मंत्रिपद फिक्स होताच मुक्ताईनगरमध्ये जल्लोष

    रक्षा खडसे मंत्रिमंडळाची शपथ घेणार आहेत. रक्षा खडसे समर्थकांकडून मुक्ताईनगर फटाक्याची आतिषबाजी करण्यात येत आहे. परिवर्तन चौकात मोठ्या प्रमाणात फटाके फोडत आतिषबाजी करण्यात आली.

  • 09 Jun 2024 12:15 PM (IST)

    प्रतापराव जाधवांचे कुटुंब दिल्लीत दाखल

    प्रतापराव जाधवांचे कुटुंब दिल्लीत दाखल झालं आहे. जाधव परिवारासाठी आज आनंदांचा दिवस असल्याची प्रतिक्रिया यावेळी कुटुंबियांनी दिली. श्रीकांत शिंदे यांच्या नवाला पसंती देवून पण शिंदे साहेबांनी मेरिटवर मंत्रिपद दिलं. कोणताही लॉबिंग नाही मागचा अनुभव आपण पाहिला, अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांच्या मुलाने दिली आहे.

  • 09 Jun 2024 12:01 PM (IST)

    गोंदिया शहर पुन्हा हादरला

    पंधरा दिवसातच दुसरी घटना. गुन्हेगारी वाढल्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण…..

  • 09 Jun 2024 10:47 AM (IST)

    Live Update | उकाड्याने हैराण ठाणेकर पावसामुळे सुखावले

    ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर वनशेत्र या ठिकाणी डोंगर भागात धुक्याची चादर… मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा… आज रविवार सुट्टीच्या दिवशी येऊर पर्यटन स्थळीं ठाणेकर लावत असतात हजेरी… मात्र धबधबे असलेल्या ठिकाणी प्रवेश बंदी

  • 09 Jun 2024 10:30 AM (IST)

    Live Update | पुण्यातील धानोरी परिसरात रस्त्यावर पावसाचे पाणी साचलं

    पुण्यातील धानोरी परिसरात रस्त्यावर पावसाचे पाणी साचलं… गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद… पाण्यातून वाट काढत स्थानिकांना रस्ता ओलांडावा लागत आहे… सचलेल्या पाण्यात वाहनं बंद पडलीत… रस्त्याला लागून असणाऱ्या घरांमध्ये पाणी

  • 09 Jun 2024 10:14 AM (IST)

    Live Update | मराठा समाजाने शांत राहावं असं आवाहन करतो – जरांगे पाटील

    मराठा समाजाने शांत राहावं असं आवाहन करतो… मला फक्त आरक्षण हवं आहे… मी माझ्या सगळ्या मागण्यांवर ठाम आहे… असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत.

  • 09 Jun 2024 10:10 AM (IST)

    Live Update | मराठा समाजाने अंतरवलीत येऊ नये – जरांगे पाटील

    मराठा समाजाने अंतरवलीत येऊ नये… आंदोलन स्थळी येऊ नका, कामाला प्राधन्य द्या… मराठा समाजाने शेतीचं काम करावीत, मी लढायला खंबीर… असं जरांगे पाटील म्हणाले असून त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे…

  • 09 Jun 2024 10:07 AM (IST)

    Live Update | रावेरच्या खासदार रक्षा खडसे मंत्रिमंडळात फायनल

    रावेरच्या खासदार रक्षा खडसे मंत्रिमंडळात फायनल… रक्षा खडसे आज घेणार मोदींसोबत मंत्रिमंडळात शपथ…

  • 09 Jun 2024 09:54 AM (IST)

    Marathi News: दिल्लीत महाराष्ट्र सदनात आज भाजपची बैठक

    दिल्लीत महाराष्ट्र सदनात आज भाजपची बैठक होत आहे. आज मोदी ३ सरकारचा शपथविधी सोहळ्यासाठी भाजप आमदार, खासदार दिल्लीत दाखल झाले आहे. भाजपच्या बैठकीत शपथ विधी सोहळ्याची माहिती दिली जाणार आहे.

  • 09 Jun 2024 09:39 AM (IST)

    Marathi News: मालवणमध्ये होळी उलटली

    मालवण तळाशील खाडीत होडी बुडाली आहे. होडीतील एकजण बचावला तर दोघेजण बेपत्ता आहे. बेपत्ता मच्छीमारांचा शोध सुरू केला आहे. शनिवारी रात्री ९ वाजता ही घटना घडली आहे.

  • 09 Jun 2024 09:21 AM (IST)

    Marathi News: पुण्यात अनेक भागांत अजूनही पाणी

    पुण्यात काल झालेल्या पावसाचे पाणी अजूनही शहरातील विविध भागात साचलेलं आहे. शहरातील कलवड वस्ती रोड पाणी साचल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. सचलेल्या पाण्यात गाड्या बंद पडल्या आहेत.

  • 09 Jun 2024 09:06 AM (IST)

    Marathi News: मनोज जरांगे यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी सुरुच

    मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांचे उपोषण आज दुसरा दिवशीही सुरु आहे. सगे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे परत घ्यावे, यासाठी हे उपोषण सुरु आहे.

  • 09 Jun 2024 09:01 AM (IST)

    नवी दिल्ली – महाराष्ट्र सदनात आज भाजपची बैठक

    दिल्लीत महाराष्ट्र सदनात आज भाजपची बैठक होणार आहे. आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजप आमदार , खासदार दिल्लीत दाखल झाले असून सकाळी भाजपची बैठक होत आहे. या बैठकीत शपथ विधी सोहळ्याची माहिती दिली जाणार आहे.

  • 09 Jun 2024 08:54 AM (IST)

    जालना – जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस

    मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे परत घ्यावे.  मराठा आणि कुणबी एकच आहेत हा कायदा पारित करावा. हैदराबाद गॅझेट, मुबई गॅझेट आणि मुबई गॅझेट लागू करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशा त्यांच्या मागण्या आहेत.

  • 09 Jun 2024 08:46 AM (IST)

    नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन घेतले दर्शन

    नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत.  शपथविधी समारंभापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी सकाळी राजघाटावर जाऊन दर्शन घेतले.

     

  • 09 Jun 2024 08:34 AM (IST)

    पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेवर परिणाम, लोकल वाहतूक उशिराने

    पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेवर परिणाम झाला असून लोकल 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरू आहे. पावसामुळे भाईंदर आणि नायगावमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे.

  • 09 Jun 2024 08:29 AM (IST)

    राज्यात पुढील तीन-चार दिवस मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज

    राज्यात पुढील तीन-चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता, सोबतच सरासरी ५०-६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. तर रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट, ज्यात १०० मिमीहून अधिक पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो. सिंधुदुर्गासाठी आज रेड अलर्ट, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

     

  • 09 Jun 2024 08:21 AM (IST)

    पहिल्याच पावसात मुंबई-अहमदाबाद महामार्ग खचला

    पहिल्याच पावसात मुंबई-अहमदाबाद महामार्ग खचला आहे. वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरात महामार्ग खचला. पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्ग पोलिसांकडून वाहन बाजूला काडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.