Lok Sabha Election 2024 : देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीचे म्हणजेच लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या म्हणजेच 4 जून रोजी येणार आहेत. भाजप प्रणीत एनडीए आणि इंडिया आघाडी असा थेट सामना या निवडणुकीत होत आहे. 7 टप्प्यात झालेल्या या निवडणुकीनंतर देशातील जनतेचे लक्ष स्थापन होणाऱ्या नव्या सरकारकडे लागले आहे. 1 जून रोजी आलेल्या एक्झिट पोलने हे चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट केले असले तरी तो अंतिम निकाल नाही. त्यामुळे मंगळवारी येणार निकाल हा महत्वाचा ठरणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. आधी पोस्टल बॅलेटची मोजणी केली गेली.
पोस्टल मतपत्रिकेची दोन गटात मतमोजणी झाली. पहिल्या गटात लष्कर, निमलष्करी दलाचे जवान आणि अधिकारी यांच्या मतांची तर दुसऱ्या गटात निवडणूक कर्तव्य बजावणारे कर्मचारी, अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची पोस्टल मतमोजणी झाली. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणीला सुरवात होईल.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबरोबरच आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकांची मतमोजणीचे निकालही 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. EVM चे VVPAT सह जुळल्यानंतर VVPAT स्लिप मोजणी आणि पोस्टल मतपत्रिका जोडल्यानंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व जागांवर निकाल घोषित होतील असा अंदाज आहे.
मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. निवडणूक निकाल पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या eci.gov.in या वेबसाइटवर जाऊन जनरल इलेक्शन 2024 वर क्लिक करावे लागेल. यासोबतच निवडणूक आयोगाशी लिंक असलेल्या व्होटर हेल्पलाइन ॲप, iOS आणि अँड्रॉइड मोबाइल ॲप्सवरही निकाल दिसतील. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर राज्यनिहाय, जागानिहाय आणि पक्षनिहाय निकाल जाहीर करण्याची तयारी करण्यात आली आहे.
मतमोजणीबरोबरच क्षणोक्षणी अपडेट्स कुठे आणि कसे पाहायला मिळणार, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण, काळजी करण्याची गरज नाही. tv9 मराठी तुम्हाला प्रत्येक गोष्ट तपशीलवार सांगणार आहे. तुमच्या स्मार्ट टीव्ही किंवा टेलिव्हिजनवर घरी बसून लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहू शकता. स्मार्टफोनवर tv9 मराठी मीडिया चॅनेलद्वारे दिलेले अपडेट्सही पाहू शकता. स्मार्टफोन वापरकर्ते थेट tv9 मराठीच्या YouTube चॅनेलवर जाऊन निकालाची प्रत्येक अपडेट मिळवू शकतात.
tv9 मराठी लोकसभा निवडणूक लाईव्ह टीव्ही लिंक :