आम्हाला राजकारण करावे लागेल जागा लढवाव्या लागेल राजकीय पार्टीचा हा गुणधर्म असतो.या जागा संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही लढणार आहोत. पहिले आम्ही कसं लढणार काय लढणार हे ठरवू आणि आमचा अजेंडा सामान्य माणसाचा राहील. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मला तर देणार नाही आणि दिलं तरी मी घेणार नाही आलच वाट्याला तर आमचे राजकुमार पटेल यांना देऊ. आदिवासी आमदार आहे. आम्ही दोनच आमदार असताना मजबुतीने सोबत राहून काम केलं. राजकुमारने आमचा पक्ष मजबूत ठेवला त्यांना देऊ, फुटीचे कारण काय ते दोन दिवस वेळ द्यावा लागेलमी सगळ सांगेल, असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
विधान सभा लढविण्या संदर्भात उद्या आमची मुंबईला मिटींग आहे वीस ठिकाणच्या लोकांना आम्ही बोलावलेलं आहे सगळ्यांसोबत चर्चा करून विव्ह रचना आखली जाणार आहे. युतीसोबत किंवा आघाडी सोबत कसं जाता येईल किंवा व्यक्तिगत रित्या कस लढता येईल यावर आम्ही चर्चा करणार आहोत. महायुतीसोबत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही लढू नये युतीसोबत असलो तरी आम्हाला लढणं गरजेचं आहे. आमची पार्टी आहे, आम्हाला हातपाय हलवणे गरजेचे असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.
मुस्लिम धर्मावर आरक्षण कोणी कबूल करणार नाही त्याच्यातल्या जातीवर आरक्षण द्यायला हवं. सगळ्यांना समान कायदा असल्याने कोणत्याही धर्माचा असला तरीही गरीबासोबत सरकारचा न्याय समान असला पाहिजे. संघाची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे त्यांनी नैतिकता सोडली नाही आणि त्याचेच फटके राष्ट्रीय सोयसेवक संघाने दाखविले आहे अमरावतीमध्ये तर पत्र काढले आणि त्याचा परिणाम ही भोगल्याचं बच्चू कडू म्हणाले.
मनोज जरांगे यांनी आता आंदोलन करू नये, उपोषण मागे घ्यावे. त्यांची प्रकृती वाईट होत असून त्यांची समाजाला गरज आहे. त्यानी जास्तीत जास्त आमदार निवडून आणावे आणि त्यांनीच कायदा करावा त्यानी विधानसभेच्या तयारीला लागावं असा सल्ला कडू यांनी जरांगे यांना दिला आहे.