चेन्नई : प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल नीधि मय्यम पक्षाचे प्रमुख कमल हसन यांचा तामिळनाडू विधानसभेतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. कोईंबतुर मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच कमल हसन यांनी आपल्या विरोधी उमेदवारांच्या तुलनेत काहीशी आघाडी कायम ठेवलीय. हाच ट्रेंड राहिला तर कलम हसन मक्कल नीधि मय्यम पक्षाचे पहिल आमदार ठरणार आहेत. एकिकडे कमल हसन विजयाकडे घोडदौड करत असले तरी तामिळनाडूच्या राजकारणात पर्याय देऊन पाहणाऱ्या त्यांच्या पक्षाचे बहुतांश उमेदवार पिछाडीवर दिसत आहेत (Makkal Needhi Maiam chief Kamal Haasan leading from Coimbatore in Tamil Nadu Assembly Election)
कोईंबतुर मतदारसंघात सुरुवातीपासून कमल हसन यांचाच दबदबा
कोईंबतुर मतदारसंघातील मतमोजणीच्या 14 व्या फेरीतही कमल हसन आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत 27589 मतं मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील भाजप उमेदवारापेक्षा त्यांना 1189 मतं अधिक आहेत. भाजपच्या वनथी श्रीनिवासन भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे तामिळनाडू कार्याध्यक्ष मयुरा जयकुमार आहेत. त्या डीएमकेच्या नेतृत्वातील आघाडीकडून लढत आहेत. त्यांना आतापर्यंत 22 हजार 536 मतं मिळाली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात नवघ्या मक्कल नीधि मय्यम पक्षाच्या कमल हसन यांचाच दबदबा असल्याचं दिसत आहे.
अभिनेते कमल हसन मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (2 मे) चेन्नईहून कोईंबतुर येथे आले. यावेळी त्यांनी येथील मतमोजणीची व्यवस्थेचीही पाहणी केली. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून कमल हसन आघाडीवर आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर भाजप आणि काँग्रेस उमदेवारांमध्ये चुरस सुरु आहे.
ममतादीदी- स्टॅलिन यांची सत्ता आणली; ‘चाणक्य’ प्रशांत किशोर यांनी केली ‘ही’ घोषणाhttps://t.co/CCNYs4qH0b#prashantkishor | #WestBengalElections2021 | #WestBengal | #BJP | #tmc | #MamataBanerjee | #NarendraModi
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 2, 2021
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Makkal Needhi Maiam chief Kamal Haasan leading from Coimbatore in Tamil Nadu Assembly Election