Marathi News Elections Manipur Assembly Election 2022 Live Result 10 point of manipur assembly election
Manipur Assembly Election 2022 Live Result : मणिपूर विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य
जादुई आकडा गाठण्याचं नियोजन करण्याऐवजी भाजपाने कठीण असलेल्या जागांवर अधिक भर देणारी निवडणुकीच्या प्रचाराची व्यूहरचना आखण्याली होती
मणिपूरमध्ये ३१ जागांवर आघाडी घेत भाजप एक नंबरचा पक्ष बनला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on
मणिपूरमध्ये ३१ जागांवर आघाडी घेत भाजप एक नंबरचा पक्ष बनला
जादुई आकडा गाठण्याचं नियोजन करण्याऐवजी भाजपाने कठीण असलेल्या जागांवर अधिक भर देणारी निवडणुकीच्या प्रचाराची व्यूहरचना आखण्याली होती.
सर्वसामान्य आणि वंचित घटकांतील मुलींना शिक्षणात आर्थिक पाठबळ, AIIMS आणि कौशल्य विद्यापीठ सारख्या तरतुदी , शेतकरी आणि मच्छीमारांसाठीच्या भरगोस आर्थिक मदत देणाऱ्या योजनांचा मणिपूरमध्ये भाजपाला फायदा झाला
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योजना आणि तरतुदींची आश्वासने देत भाजपने पुन्हा एकदा मणिपूरच्या मतदारांचा विश्वास जिंकला आहे.
मणिपूरमध्ये २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च अशा दोन टप्प्यात एकूण ६० जागांसाठी विधानसभा निवडणूका पार पडल्या.
मणिपूरमध्ये सत्तेत असूनही भाजपच्या व्होटिंग टक्केवारीत वाढ झाली आहे.
भाजपने राज्यात सर्व 60 जागांवर निवडणूक लढवली. सध्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी हिंगांग मतदारसंघातून निवडणूक लढवली.
मणिपूरमध्ये काँग्रेसने 54 जागी निवडणूक लढवली.
बहुमत मिळण्यासाठी 31 किंवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकण्याची आवश्यकता होती. भाजपाने ३१ हा जादुई आकडा गाठल्याने भाजपा पुन्हा मणिपूरमध्ये सत्ता स्थापण करेल.
विधानसभेच्या दुस-या टप्प्यात 22 विधानसभेच्या जागांसाठी मतदान झालं. 92 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.