PM Modi Address Live : मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदी लाईव्ह, भाजपची जोरदार घोषणाबाजी

| Updated on: Mar 10, 2022 | 11:30 PM

PM Modi on Assembly Election Results Live Update

PM Modi Address Live : मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदी लाईव्ह, भाजपची जोरदार घोषणाबाजी
भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आज पाच राज्याच्या निवडणुकींचे (Five State Election results 2022) निकाल लागले आहेत. यात भाजपला मोठे यश प्राप्त झाले आहे. पाच पैकी चार राज्यात भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. या निकालानंतर देशभर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. याच पाश्वभूमिवर पंतप्रधान मोदोही (Pm Modi Live) कार्यरर्त्यंशी संवाद साधणार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकांचे निकाल (Punjab Election Results 2022) हाती आले आहेत. निवडणुकीत आम आदमी पक्षाला (Aam Aadmi Party) स्पष्ट बहुमत मिळालं असून तो पंजाबमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 2017 च्या निवडणुकीत सत्तेपासून दूर राहिलेला ‘आप’ प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता. या निकालानंतर मोदी काय बोलणार? याची उत्सुक्ता देशभरातील भाजप कार्यकर्त्यांना लागली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Mar 2022 08:27 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    कोर्टाचे निर्णयही धर्म आणि जातीला जोडले जातात

    अशा भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या, समाजातून, जातीतून दूर करा

    यातून समाज मजबूत होईल

    युपीत आमच्या विजयाचे कारण हेच आहे

     

  • 10 Mar 2022 08:24 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    जनतेची अपेक्षा आहे की मी देशाला भ्रष्टाचारमुक्त करावे

    केंद्रीय तपास यंत्रणेवर सवाल उपस्थित करणे चुकीचे

    हे लोकं घोटाळ्यांनी घेरले गेले आहे

    असे लोक एकत्र येऊन तपास यंत्रणांवर दबाव बनवतात

    त्यासाठी ते इकोसिस्टीमचा वापर करतात

    आधी हजारो कोटींचा घोटाळा करतात

    पुन्ह चौकशी न होण्यासाठी दबाव आणतात

    तेव्हा लगेज ते धर्माचाही आधार घेतात


  • 10 Mar 2022 08:23 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    काही लोक भ्रष्टाचारविरोधी कारवाई थाबवण्याचा प्रयत्न करत आहेत

    हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे

    काही लोक देशाला लुटून तिजोऱ्या भरत आहेत

    भारतीय जनता पक्ष इमानदार सरकार आहे

    आमची इमानदारी बघून आम्हीला पुन्हा निवडूण दिलं

     

  • 10 Mar 2022 08:22 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    भारतात परिवारवादाच्या राजकारणाच सुर्यास्त होणार

    मोदींचा काँग्रेसला इशारा

    या निवडणुकीत लोकांनी आपल्या कौशल्यातून संकेत दिले आहेत

  • 10 Mar 2022 08:20 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    प्रत्येक योजनेला जातीयवाद, प्रदेशवादाला जोडणे भारतासाठी चिंतेचा विषय

    परिवारवादही देशासाठी चिंतेचा विषय

    मी लोकशाहीची मुल्ये लोकांसमोर मांडली

    परिवारवादी राजकारणाचे नुकसान मी लोकांना पटवून दिले

  • 10 Mar 2022 08:18 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    युक्रेनमध्ये हजारो भारतीय अडकले होते

    तेव्हा देशातले पक्ष लोकांची चिंता वाढवत होते

    विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता वाढवत होते

    या लोकांनी ऑपरेशन गंगाला प्रदेशावादत बाधण्याचा प्रयत्न केला

  • 10 Mar 2022 08:15 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    देशा आत्मनिर्भर झाल्याचा विश्वास सध्याच्या परिस्थितीत वाटतो

    बजेटमधून अधिक बळ मिळाले

    उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी दूरदृष्टीचा परिचय दिला

    भारताच्या मतदारांनी स्थिर सरकारसाठी मत दिले

    लोकशाही भारतीयांच्या रक्तात आहे

  • 10 Mar 2022 08:13 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    जिथे डबल इंजिनची सरकारं राहिलं तिथं विकासाची गती दुप्पट

    युद्धाचा परिणाम जगावर होत आहे

    भारत शांततेच्या बाजून आहे

    चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आम्ही आग्रही

    जे देश युद्ध लढत आहेत त्यांच्यासी भारताची जवळीक

    भारताच्या गरजा या देशांशी जोडलेल्या

    भारत अनेक प्रकारचे तेल आयत करते

    त्याच्या किंमती वाढत आहेत

    सर्व जग युद्धामुळे महागाईचा सामना करतंय

  • 10 Mar 2022 08:11 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    कोरोनाकाळाच्या संकटात निवडणुका पार पडल्या

    हा काळ कठीण आहे

    शंभर वर्षात असा आजार पाहिला नाही

    हे कमी होतं म्हणून युद्धाने जगाची चिंता वाढवली

    जगाच्या सप्लाय चेनमध्ये मोठी मोडखळ आली आहे

     

  • 10 Mar 2022 08:10 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    पंजाबला दहशतवादापासून दूर ठेवणार

    पंजाब हे सीमाभागातील राज्य

    येणाऱ्या काळात पंजाबमध्ये जोमाने काम करणार

  • 10 Mar 2022 08:09 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    आधी 2017 ला लोक म्हणायचे आत्ताच पुढच्या निवडणुकीचा कल ठरला आहे

    अशीच परिस्थिती आता तयार होईल

    येणाऱ्या काळात पंजाबात भाजपची मजबुती वाढवणार

     

  • 10 Mar 2022 08:06 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    लोकांना जातीच्या बंधनात बांधून त्यांनी माणसांचा अपमान केला

    काही लोक इथे फक्त जात चालते बोलतात

    प्रत्येक वेळी उत्तर प्रदेशातील विकासाचे राजकारण निवडले

    युपीतल्या लोकांनी इतरांना धडा शिकवला

    जातीची गरिमा ही देशाला जोडण्यासाठी असावी

    हे लोकांनी चार निवडणुकांमधून दाखवून दिलंय

     

  • 10 Mar 2022 08:05 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    महिलांनी भाजपवर विश्वास दाखवला आहे

    सरकार त्यांच्या छोट्या गरजा लक्षात ठेवते

    युपीतल्या जनतेला इतरांनी जातीवादाच्या तराजूत मोजले

  • 10 Mar 2022 08:02 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    इमानदारी असेल तर असे निर्णय घ्यायला भिती वाटत नाही

    आम्ही प्रत्येक गरिबापर्यंत पोहोचू

    देशातील महिलांना माझे नमन

    निवडणुकीच्या निकालात महिलांचे योगदान मोठे

    स्त्रीशक्ती भाजपच्या विजयाची सारथी

  • 10 Mar 2022 08:01 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    सरकारमधील अडचणी मला ओळखता येतात

    माझ्यासारखी हिंम्मत कुणाचीही झाली नसती

    मी माझ्या भाषणातून ते सांगितलं आहे

    प्रत्येक योजन शंभर टक्के गरिबापर्यंत पोहोचवणार

     

  • 10 Mar 2022 07:59 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो

    मला तळागळातल्या व्यक्तीची व्यथा कळते

    भाजप गरिबांना विश्वास देते

    प्रत्येक गरिबापर्यंत सुविधा पोहोचतात

    मी गरिबांच्या घरापर्यंत त्याचा हक्क पोहोचवल्याशिवाय शांत बसत नाही

  • 10 Mar 2022 07:58 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    आधी जनतेला हक्कासाठी सरकारचे उबरे झिजवायला लागायचे

    तेव्हा श्रीमंत लोकांपर्यंत छुप्या मार्गाने सुविधा पोहोचायच्या

    मात्र योजनेवर ज्याचा हक्क आहे त्याला त्याचा लाभ मिळत नव्हता

    भाजपने या गोष्टी बदलून दाखवल्या

  • 10 Mar 2022 07:56 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    उत्तराखंडनेही इतिहास रचला आहे

    दुसऱ्यांदा आम्ही सत्तेत आलो होते

    भाजपला चारही दिशांनी आशीर्वाद मिळाला आहे

    या राज्यातल्या समस्या वेगळ्या आहेत

  • 10 Mar 2022 07:55 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    गोव्यातले सर्व एक्झिट पोल फोल ठरले

    जनतेने तिसऱ्यांदा सेवेची संधी दिली

    दोनवेळा सत्तेत राहून भाजपच्या जागा वाढल्या

  • 10 Mar 2022 07:53 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री त्याच पार्टीचा होणे हे पहिले उदाहरण आहे

    चार दशकांनंतर एक सरकार लागोपाठ सत्तेत आले आहे

    इतर राज्यात सरकारमध्ये असून मतांची टक्केवारी वाढली

  • 10 Mar 2022 07:53 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    जनतेचे मन जिंकण्यात आम्ही यशस्वी ठरले

    कार्यकर्त्यांनी महेतीने विजयचा चौकार लावला

    उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले आहेत

  • 10 Mar 2022 07:51 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    युकांनी भाजपला समर्थन दिले हा मोठा संदेश

    पहिल्यांदा मत करणाऱ्यांना भाजपचा विजय निश्चित केला

    कार्यकर्त्यांनी सत्ता आणण्याचे वचन दिले होते

    ते वचन कार्यकर्त्यांनी पूर्ण केले आहे

    त्याबद्दल सर्व भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन

  • 10 Mar 2022 07:50 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    आज आनंदी दिवस आहे

    या निवडणुकीत मतदान केलेल्या सर्वांचे अभिनंदन

     

  • 10 Mar 2022 07:48 PM (IST)

    जे. पी. नड्डा Live

    कार्यकर्त्यांची मेहनत कामाला आली

    असेच आपल्याला काम करायचे आहे

    येत्या लोकसभेतही असेच काम करावे लागेल

    तुमच्या राष्ट्रभक्तीला माझा सलाम

  • 10 Mar 2022 07:46 PM (IST)

    जे. पी. नड्डा Live

    मोदींनी नॉर्थ इस्टला संभाळण्यावर भर दिला

    इतर पक्षांनी याकडे दुर्लक्ष केले

    आणि मणिपूरला सशक्त बनवले

    मोदींची साद उत्तराखंडच्या जनतेने ओळखली आहे

  • 10 Mar 2022 07:43 PM (IST)

    जे. पी. नड्डा Live

    मोदींनी राजकारणाची संस्कृती बदलली आहे

    घराणेशाहीवरून नड्डांचा पुन्हा काँग्रेसवर पुन्हा निशाणा

    रिपोर्ट कार्डचे राजकारण मोदींनी सुरू केलं

    घराणेशाहीचे राजकारण बंद केलं

  • 10 Mar 2022 07:40 PM (IST)

    जे. पी. नड्डा Live

    नेता मिळाल्यास मतदानही मिळतं

    मतदाता त्याचे हीत जाणते

    निवडणूक ही एक केमिस्ट्री आहे

    जनतेची केमिस्ट्री मोदींसोबत

  • 10 Mar 2022 07:36 PM (IST)

    जे. पी. नड्डा Live

    2014, 2017, 2017, 2022  अशी चौथ्यांदा भापने बाजी मारली आहे.

    हे चार दशकांनंतर होत आहे

    आमची मत्तांची टक्केवारीही चांगली आहे

    उत्तराखंडमध्येही हीच स्थिती आहे

  • 10 Mar 2022 07:35 PM (IST)

    जे. पी. नड्डा Live

    आजचा निकाल राजकारणाची दिशा सांगतात

    देश मोदींच्या नेतृत्वात पुढे जात आहे

    चारवेळा मोदींना उत्तर प्रदेशच्या जनतेने आशीर्वाद दिला आहे

  • 10 Mar 2022 07:33 PM (IST)

    जे. पी. नड्डा Live

    जनतेने चार राज्यात आशीर्वाद दिला आहे

    यातून जनतेच्या मनातल्या भावना कळतात

    मोदींच्या कामावर जनतेने मोहोर लावली आहे

    मी त्याबद्दल जनतेचे आभार मानतो

  • 10 Mar 2022 07:33 PM (IST)

    जे. पी. नड्डा Live

    तुमच्या सर्वांचे आभार

    भारताच्या पंतप्रधानांचे स्वागत करतो, अभिनंदन करतो

  • 10 Mar 2022 07:27 PM (IST)

    पंतप्रधान मोदी Live

  • 10 Mar 2022 07:18 PM (IST)

    उत्तराखंड-39 जागांचे निकाल जाहीर झाले

    निवडणूक आयोगाने आतापर्यंत 39 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानुसार बसपा 1, भाजप 27 आणि 11 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

  • 10 Mar 2022 07:16 PM (IST)

    केशव मौर्य यांची मतमोजणी थांबली

    कौशांबीतील सिरथू विधानसभा मतदारसंघात अर्धा तास मतमोजणी थांबली. ईव्हीएम गडबडीमुळे मतदान थांबले, मतमोजणीची मागणी करणारे भाजप एजंट, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि एसपी घटनास्थळी पोहोचले. कौशांबीमध्ये मतमोजणी थांबल्यावर सपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सपा उमेदवार पल्लवी पटेल मतदान केंद्रावर पोहोचल्या. उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्यापेक्षा पल्लवी पटेल या मतमोजणीत आघाडीवर आहेत.

  • 10 Mar 2022 06:27 PM (IST)

    राष्ट्रीय नेते गोव्यात आल्याचा आम्हाला फायदा – प्रमोद सावंत

    ज्यावेळी राष्ट्रीय नेते गोव्यात आले त्यावेळी मिडीया गावापर्यंत पोहोचली

    विभक्त असताना देखील २० उमेदवार निवडून आले आहेत

    इतर पक्षांच्या उमेदवारांचं देखील अभिनंदन करत आहे

    आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी आमच्या विजयासाठी गोवा दौरा केला

     

  • 10 Mar 2022 06:14 PM (IST)

    योगी आदित्यनाथ Live

    पंतप्रधान मोदींच्या यशस्वी नेतृत्वात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपचं प्रचंड बहुमताचं सरकार बनत आहे. या सर्व राज्यात पंतप्रधान मोदींच्या विकास आणि सुशासनाला जनतेनं आशीर्वाद दिलाय. मी सर्वात प्रथम पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि सर्व नेत्यांचं हृदयपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात भाजप चार राज्यात पुन्हा आपली सत्ता आणण्यात यशस्वी ठरला.

    उत्तर प्रदेश सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. त्यामुळे संपर्ण देशाचं लक्ष लागून होतं. आज भाजप आणि मित्र पत्र उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमताने पंतप्रधान मोदींचं मार्गदर्शन आणि नेतृत्वात प्रचंड बहुमत मिळवलं आहे. या बहुमतासाठी उत्तर प्रदेशच्या जनतेचं अभिनंदन आणि आभार मानतो.

    या आनंदाच्या क्षणी मी भाजपच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. कारण त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळेच हे शक्य झालंय. सात टप्प्यात झालेली निवडणूक पहिल्यांदाच शांततेत पार पडली. त्यानंतर मतमोजणीबाबतही ज्या अफवा पसरवल्या जात होत्या, त्या सर्व अफवा जनतेनं बाजूला करत भाजपला विजयी केलंय. मी तुम्हा सर्वांचं याबाबत अभिनंदन करतो. तसंच निवडणूक आयोग, पोलिस आणि प्रशासनाचे आभार मानतो. कोरोना काळातही या सर्वांनी लोकशाहीचा हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महत्वाचं योगदान दिलं.

    पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशला पूर्ण वेळ दिला. प्रदेशच्या विकासासह सुशासनासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्णयासाठी त्यांची वेळ आणि विचार मिळत आले आहेत. हे प्रचंड बहुमत भाजपचा राष्ट्रवाद, विकास आणि सुशासनाच्या मॉडेलला उत्तर प्रदेशच्या २५ कोटी जनतेचा आशीर्वाद आहे. या स्वीकार करत सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास या मंत्राद्वारे हा विचार पुढे न्यावा लागेल.

    भाजपच्या डबल इंजिन सरकारनं सुरक्षा, सुशासनासाठी, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात विकासासाठी जे काम केलं त्याचा हा निकाल आहे. आजच्या निकालाने परिवारवादाला तिलांजली दिली आहे. कोरोना काळातही पंतप्रधान मोदींचं मार्गदर्शन आणि नेतृत्व भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सक्षम बनवत आहे. तुम्ही आश्चर्य कराल की उत्तर प्रदेश सारख्या राज्यात 2 कोटी पेक्षा अधिक लोकांच्या घरी शौचालय, १ कोटी ४५ लाख घरात वीज, १० कोटी पेक्षा अधिक लोकांना आरोग्य विमा, ४० लाखापेक्षा अधिक कुटुंबांना छत मिळालं.

    जेव्हा आम्ही कोरोना, भ्रष्टाचाराशी लढत होतो, तेव्हा हे लोक भाजपविरोधात षडयंत्र रचत होते. आजच्या निकालानं त्यांचे हे प्रयत्न उधळून लावलेत. राष्ट्रवाद, सुरक्षा, विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यावर भाजपला जनतेनं प्रचंड बहुमत दिलंय. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या सर्व मुद्द्यावर आपल्याला खरे उतरावे लागेल.