नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसवर (Congress) तोफा डागत असतानाच आज मोदी पुन्हा माध्यमांसमोर आले आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तोडांवर पंतप्रधान मोदींनी (Pm Modi Interview) एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यात त्यांनी पाच राज्यातल्या निवडणुका (Five State Elections 2022) भाजपच जिंकेल असा विश्वास व्यक्त करत पुन्हा विरोधकांवर तोफा डाल्या आहेत. भारतीय जनता पार्टी एक कलेक्टिव्ह लिडरशीपवर विश्वास ठेवते. सामुहिकतेवर विश्वास ठेवते. बॅनरवरील फोटो पंतप्रधानांचा नाही तर तो नरेंद्र मोदीच्या रुपात भाजपच्या कार्यकर्त्याचा आहे. ही निवडणूक आमच्या कार्याची आहे, आमचे आचार विचार, आमची निती आणि नियतीचा आहे आणि मला वाटतं की हा जनतेचा विजय असेल. असे आवाहन मोदींनी मतदारांना केलं आहे. त्यामुळे मोदींच्या या आवाहनाला जनता किती प्रतिसाद देते? आणि पाच राज्याच्या निवडणुकांमध्ये भाजपचं काय होतं? हे काही दिवसांत निवडणुकांनंतर स्पष्ट होईलच. मात्र मोदींनी आज पुन्हा काँग्रेससह दिल्लीतली केजरीवाल सरकारलाही टार्गेट केलं आहे.
आम्ही केवळ घोषणा केल्या नाहीत
या निवडणुका सर्व राज्यात पाहतो आहे की भाजप मोठा विजय प्राप्त करेल. भाजपला सर्व पाच राज्यात सेवा करण्याची संधी जनता देईल. ज्या राज्यात सेवा करण्याची संधी मिळाली तेथील जनतेलं आम्हाला जोखलं आहे. मी समजतो की आपल्या देशात वेळ बदलला पण टर्मिनॉलॉजी बदलली नाही. कारण यापूर्वीची सरकारनं फाईलवर स्वाक्षरी करणं, निवडणुका लक्षात ठेवून योजनांची घोषणा आणि भूमिपूजन करुन येणं. त्यांना असं वाटत होतं की घोषणा केली आता काय. लोकांना काम दिसत नाही आणि केवळ घोषणा दिसतात तेव्हा अॅन्टी इन्क्मबन्सी येते. पण सरकारचा प्रयत्न दिसत असेल, योजनांची अंमलबजावणी दिसते तिथे सरकार विरोधी वातावरण दिसत नाही. भाजपशासित राज्यात प्रो इन्क्मबन्सी पाहायला मिळते.
मोदींनी सांगितला जुना किस्सा
भाजप निवडणूक पराभूत होत विजयी ठरली आहे. आम्ही अनेक पराभव पाहिले. अनामत रक्कम जप्त झाली. एक वेळ असा होता की आमचे नेते मिठाई वाटत होते. तेव्हा मला वाटलं की हे तर पराभूत झाले आहेत आणि मिठाई का वाटत आहेत. तर तेव्हा कळालं की आमच्या तीन उमेदवारांची अनामत रक्कम वाचली होती. अशा काळ आम्ही पाहिला आहे. आम्ही प्रयत्नरत असतो की विजय आमच्या डोक्यात गेला नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही जमिनीवर राहतो. आम्ही पराभवातही आशा शोधतो. निराशेच्या गर्तेत अडकून पडत नाही. आम्ही समोरच्याची रणनिती समजून घेण्याचा आणि आमच्या चुकांचा अभ्यास करतो. त्यानुसार आम्ही पुढील रणनिती ठरवतो. आमच्यासाठी निवडणूक ही एकप्रकारे मुक्त विद्यापीठ आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीला आमच्या शिक्षणाचा भाग मानतो, असे म्हणत मोदींनी जुना किस्सा सांगितला आहे.