चंदीगड: ‘पहले दिल्ली में इन्कलाब हुआ, अब पंजाब में इन्कलाब हुआ है, अब पूरे देश में इन्कलाब होगा…।‘ पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेले हे यश किती मोठे आहे, हे अरविंद केजरीवाल यांच्या या शब्दांवरुन समजू शकते. या मिळालेल्या विजयामुळे अरविंद केजरीवाल आता दिल्ली आणि पंजाबच्या पुढचं राजकीय भवितव्य त्यांना आता दिसू लागलं आहे. मात्र हा पंजाबचा मोठा विजय आम आदमी पक्षासाठी जितकी मोठी संधी आहे, तितकीच एक आव्हानही असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने इतकी जोरदार मुसंडी मारली आहे की, इतर पक्षांचे दिग्गज नेतेही यामध्ये उद्धवस्त झाले आहेत. कॅप्टन अमरिंदर, सिद्धू, बादल, चन्नी, मजिठिया या नेत्यांना आपने घराचा रस्ता दाखवला आहे. 117 पैकी 91 जागांवर आपने निर्विवाद यश मिळवले आहे.
निवडणुकीतील या यशानंतर अरविंद केजरीवाल यांनी मतदारांना उद्देशून भाषण केले त्या भाषणाला उपस्थित नागरिकांनी इन्कालाब जिंदाबाद म्हणत उत्स्फूर्तपणे साथ देत भारत मातेचा जयघोषही घालण्यात आला.
आम आदमी पार्टी कार्यकर्ताओं की पार्टी है, हमारा कार्यकर्ता हमेशा देश की तरक़्क़ी के लिए काम करता है। इन चुनावों में भी उन्होंने ख़ूब मेहनत की, पार्टी के विज़न को घर-घर तक पहुँचाया। सभी कार्यकर्ताओं को बहुत-बहुत बधाई। देश के लिए ये जोश और जज़्बा हमेशा बनाए रखना। pic.twitter.com/F0vu2Apdp1
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 10, 2022
माझा लहान भाऊ भगवानसिंग मान जी यांना पंजाबचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि नागरिकांनी जल्लोष केला. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, या निकालवरुन हे स्पष्ट झाले की, पंजाबचा निकाल ही मोठी क्रांती असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी केलेल्या भाषणात लोकांना भावतील असे मुद्द उपस्थित करुन जनतेचे आभार मानले. काही पक्षांनी या निवडणूकीत कोणताही पक्ष आला तरी चालेल पण आम आदमी पार्टी इथे कशी येणार नाही यासाठी मोठ मोठी षडयंत्रे रचली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पंजाबमधील विजय हा पुढच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे असेही त्यांनी सांगितले. आम्ही ही व्यवस्था बदलली आहे, आणि देशात प्रामाणिक राजकारण केले आहे त्याला लोकांनी मत दिले आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
दिल्लीबाहेरील दणदणीत विजयाने तसेच केंद्रशासित प्रदेशाबाहेरील संपूर्ण राज्यात दणदणीत विजय मिळवून आनंदित झालेले आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना आता राजकीय भवितव्यासाठी राष्ट्रीय आखणी करणार असल्याचे सांगितले. हे त्यांच्या भाषणातही दिसून आले. या निवडणुकांमध्येही आम आदमी पक्षाने गोवा, उत्तराखंड आणि यूपीमध्ये ताकदीने लढा दिला होता, मात्र त्यांना फारसे यश मिळाले नाही. आता त्यांची नजर या वर्षअखेरीस होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीकडे आहे.
अब भारत को दुनिया का नंबर 1 देश बनने से कोई नहीं रोक सकता ❤️??
– श्री @ArvindKejriwal #AAPSweepsPunjab pic.twitter.com/dqKwbNBN5J
— AAP (@AamAadmiParty) March 10, 2022
पंजाबमध्ये ‘आप’ला मिळाले यश मोठे असल्याने त्यांना अरविंद केजरीवाल यांनी मतदारांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी ‘आप’ला रोखण्यासाठी पंजाबमध्ये मोठ मोठ्या पक्षानी काय कारस्थानं केली हे सांगत ‘आप’च्या विजयामुळे पंजाबमधील बडी बडी खुर्शियां हिल गई है म्हणत त्यांनी मतदारांना धन्यवाद दिले आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ पक्षाने पंजाबमध्ये बहुमत मिळवल्यानंतर त्यांनी मतदारांना उद्देशून केलेल्या भाषणात अनेक मुद्यांना हात घालत लोकांच्या भावनेलाही हात घातला. यावेळी शिक्षण आणि महिलांच्या सुरक्षिततेविषयी बोलून ते म्हणले की, पंजाबमधील राजकीय विजयामुळे “बाबासाब आंबेडकर और भगतसिंग का सपना पुरा हो रहा है” त्यामुळे गरीबांच्या मुलांनाही चांगले शिक्षण मिळत आहे असा विश्वास त्यांनी यावेळी सांगितला.
पंजाब निवडणुकीच्या प्रचारात आप पक्षाबद्दलच्या विरोधातील सगळेच मुद्दे ज्यावेळी राजकीय विरोधकांकडून संपले त्यावेळी त्यांनी केजरीवाल आतंकवादी है असा अपप्रचार चालू केला. पण येथील सामान्य जनतेला केजरीवाल माहिती आहे म्हणून त्यांनी ज्यांनी केजरीवाल आंतकवाजी है म्हटले आहे त्यांना मतदारांनी आपल्या मतातून उत्तर दिले आहे आणि हे सिद्ध करुन दाखवले आहे की, केजरीवाल आंतरवादी नहीं ओ सच्चा देशभक्त है.
पंजाबच्या निकालामुळे अनेक पारंपरिक नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. पंजाबमधील आपच्या भदौर मतदारसंघातून ज्या लाभ सिंग यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांची पार्श्वभूमी ही राजकीय तर बिलकूल नाही. लाभ सिंग हे एक आम आदमी पक्षाचे काम करण्यापूर्वी त्यांचे छोटे मोबाईल रिपेअरी करण्याचे दुकान होते. तर त्यांचे वडील ड्रायव्हर आणि आई एका सरकारी शाळेत सफाई कामगार म्हणून काम करते. त्यांच्या मुलाने म्हणजेच लाभ सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पराभव केला आहे म्हणून अरविदं केजरीवाल म्हणतात देशात बडे बडे इन्कालाब आ जाएंगे.
संबंधित बातम्या