सिद्धू आणि मजिठियासारख्या मातब्बरांना धूळ चारणारी आपची पॅड वूमन नेमकी कोण? वाचा सविस्तर

| Updated on: Mar 10, 2022 | 3:48 PM

नवज्योत सिद्धू आणि ब्रिकम मजिठिया यांच्या विरोधात आम आदमी पार्टीने जीवन ज्योत कौर यांना महिला उमेदवारी देण्यात आली. नवज्योत सिद्धू आणि बिक्रम मजिठिया ही यांच्यामुळे ही उमेदवारी लक्षवेधी ठरली होती, आणि आता पुन्हा आप यासाठी चर्चेत आले आहे

सिद्धू आणि मजिठियासारख्या मातब्बरांना धूळ चारणारी आपची पॅड वूमन नेमकी कोण? वाचा सविस्तर
Jeevan jyoat kaur panjab Eelction
Image Credit source: TV9
Follow us on

चंदीगडः देशात पाच निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येक्ष पक्षांनी राजकीयदृष्ट्या कंबर कसली असली तरी या सगळ्यांमध्ये लक्ष होते ते काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांकडे. दिल्लीत अरविंद केजरीवाल्यांच्या (Arvind Kejriwal) पक्षाने सत्ता स्थापन केल्यानंतर आप (AAP) पक्षही हम किससे कम नही म्हणज देशाच्या राजधानीत आपले बस्तान त्यांनी बसवले. पाच राज्यांच्या निवडणूकीत ‘आप’कडे लक्ष वेधून घेतले ते पंजाबमधील जीवन ज्योत कौर (jeevan jyot kaur) यांच्याकडे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आपल्या पक्षाची कामगिरी दाखवल्यानंतर आता पंजाबमध्येही जीवन ज्योत कौरच्या आश्चर्यकारक कामगिरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवज्योत सिद्धू आणि ब्रिकम मजिठिया यांच्या विरोधात आम आदमी पार्टीने जीवन ज्योत कौर यांना महिला उमेदवारी देण्यात आली. नवज्योत सिद्धू आणि बिक्रम मजिठिया ही यांच्यामुळे ही उमेदवारी लक्षवेधी ठरली होती, आणि आता पुन्हा आप यासाठी चर्चेत आले आहे ते, जीवन ज्योत कौर यांच्या आश्चर्यकारक कामगिरीमुळे.

काँग्रेसच्या नवज्योत सिद्धूमुळे पंजाब विधानसभेची निवडणुकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. ही निवडणूक नवज्योत सिद्धूने केलेल्या आव्हानांमुळेही अकाली दलाचे दिग्गज नेते जनरल विक्रम मजिठिया यांनी निवडणूक लढविणार असल्याचे घोषित केल्यानंतर या जागेचा पारा आणखी तापला होता.

नवज्योत सिद्धू यांनी आपला पराभव मान्य केला असून त्यांना मतदारांचे आभार मानत मतदार करणाऱ्यांचा कौल मला मान्य असल्याचे सांगत त्यांनी आप पक्षाचे अभिनंदनही केले आहे.


आम आदमी पक्षाने महिला उमेदवार जीवन ज्योत यांना दोन्ही दिग्गजांच्या समोर उभे केले. मात्र, संपूर्ण लक्ष सिद्धू मजिठियाच्या लढाईवर होते. पण सर्व अडचणींमध्येही जीवन ज्योतने आश्चर्यकारक कामगिरी केली. माझाच्या दोन दिग्गजांना पराभूत करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या जीवन ज्योत कौर यांना अमृतसरमध्ये पॅड वुमन म्हणून ओळखले जाते. ही ओळखल मिळाली कारण त्या पंजाबमधील तुरुंगातील महिला कैद्यांना सॅनिटरी नॅपकिन पुरवतात.

उमेदवारांचा सुंदर विजय

आपउच्या उमेदवारांना मिळालेल्या यशामुळे अरविंद केजरीवाल यांनी ट्विविट करुन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. देशातील नव्या राजकीय इमानदारीतील नव्या उमेदवारांचा हा सुंदर विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


सॅनिटरी पॅड महिलांना मोफत

गुरुनगरीतील ‘पॅड वुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीवन ज्योतने प्लास्टिक सॅनिटरी पॅड्सच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल गोरगरीब महिलांना जागरूक केले आहे. यासाठी जीवन ज्योत यांनी एका परदेशी कंपनीशीही करार केला आहे, आणि ही कंपनी आता पुन्हा वापरता येणारे सॅनिटरी पॅड महिलांना मोफत पुरवण्यात येते. त्या जीवन ज्योत शी समाजाच्या संस्थापकही आहेत. त्यांची संस्था समाजातील गरीब लोकांच्या कल्याणासाठी मोठे काम करत आहे.

संबंधित बातम्या

Punjav Assembly Election Result LIVE 2022 : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभव

2024 मोदींना कसं रोखणार? शरद पवारांनी ‘राष्ट्रीय फॉर्म्युला’ पत्रकारांसमोर मांडला, कधी अंमल होणार?

Election Results 2022: पंजाबमधील काँग्रेसच्या पराभवाला सिद्धू जबाबदार? KRKची राहुल गांधींकडे ‘ही’ तक्रार