पंजाब : आगामी विधानसभा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर (Punjab Assembly Election 2022) या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा सिलसिला यंदाही कायम असल्याचं पंजाबमध्येदेखील पाहायला मिळतंय. दरम्यान, नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार पंजाबमध्ये काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे पाच मोठे नेते हे भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता काही राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे. अमृतसह जिल्ह्यातील काँग्रेस समितीच्या ग्रामिण विभागाचे अध्यक्ष भगवंतपाल सिंह यांच्यासह काँग्रेसच्या पाच ज्येष्ठ नेत्यांनी भाजपात (BJP) प्रवेश केल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणाऱ्या नेत्यांमध्ये प्रदीप सिंह भुल्लर, रतन सिंह सोहल, परमजीत सिंह रंधावा आणि तंजिंदरपाल सिंह यांचा समावेश आहे.
नुकताच काँग्रेसला एक मोठा धक्का बसला. काँग्रेस आमदार हरजोत कमल यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशानंही काँग्रेसच्या गटात खळबळ उडाली होती. पंजाबात सोनू सूद यांच्या बहिणीला मोगा येथून उमेदवार देण्यात आल्यानं त्यांनी भाजपात प्रवेश केला असल्याची चर्चा रंगली आहे.
ਪੰਜਾਬ ਵਿੱਚ ਮਜਬੂਤ ਹੁੰਦੀ ਭਾਜਪਾ
ਸ਼੍ਰੀਮਤੀ ਨਮੀਸ਼ਾ ਮਹਿਤਾ ਜੀ ਸਮੇਤ ਕਈ ਕਾਂਗਰਸੀ ਆਗੂ ਕਾਂਗਰਸ ਨੂੰ ਛੱਡ ਕੇ ਭਾਜਪਾ ਚ ਹੋਏ ਸ਼ਾਮਲ।#NawaPunjabBhajpaDeNaal #PunjabWithBJP pic.twitter.com/cV97JLbL7O— BJP PUNJAB (@BJP4Punjab) January 16, 2022
दुसरीकडे काँग्रेसनं आपल्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात मालविका सूद यांनाही मोगातून उमेदवारी देण्यात येत असल्याचं स्पष्ट झालंय. चमकौर साहिब येथून मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे निवडणूक लढवणार आहेत. तर अमृतसर पूर्वेतील नवज्योत सिंह सिंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर डेरा बाबा नानक इथून उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा हे निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री चन्नी यांचे धाकडे भाऊही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून चन्नी यांचे धाकडे भाऊन डॉ. मनोहर सिंह हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसनं उमेदवारी देण्यासाठी नकार दिल्यानं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलंय.
पंजाब – एकूण जागा 117
भाजप 3
काँग्रेस 77
आप 20
अकाली दल 15