चंदीगडः पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. 20 फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. अरविंद केजरीवाल फुटिरतावाद्यांचे समर्थक आहेत. एक तर पंजाबचा मुख्यमंत्री बनेन किंवा एक स्वतंत्र राष्ट्र (खलिस्तान) चा (Khalistan) पंतप्रधान बनेन, असे अरविंद केजरीवाल आपल्याला एकदा बोलले होते, असे कुमार विश्वास म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानं पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. अरविंद केजरीवाल आणि कुमार विश्वास हे एकेकाळी मित्र होते. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात त्यांनी एकत्रितपणे साथ दिली होती. मात्र अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कुमार विश्वास आणि त्यांच्यात मतभेद होऊ लागले. त्यानंतर कुमार विश्वास यांनी अनेकवेळा आम आदमी पार्टीच्या धोरणांवर जाहीर टीका केली आहे.
कुमार विश्वास म्हणाले, ‘पंजाब केवळ एक राज्य नाही तर एक भावना, हे अरविंद केजरीवाल यांनी समजून घेतलं पाहिजे. मी आधीही त्यांना म्हटलो होते. फुटिरतावादी आणि खलिस्तानवादी संघटनांसोबत असलेल्या लोकांना सोबत घेऊ नका. तेव्हा केजरीवाल मला म्हणाले होते की, असं काही होणार नाही, तू चिंता करू नको.. ‘ मुख्यमंत्री कसे बनणार, याचा फॉर्म्युलाही अरविंद केजरीवाल यांनी सांगितल्याचे कुमार विश्वास म्हणाले. भगवंत कौर यांना निवडणूक लढवायला लावणार आणि मी तिथे पोहोचेन, असा फॉर्म्युला त्यांनी सांगितला होता. आजही अरविंद केजरीवाल त्याच मार्गावर आहेत. कुणी मान्य करो अथवा न करो, ते एखादा बाहुला बसवतील आणि काहीही करतील… त्यांनी माझ्याशी एवढ्या भयंकर गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या पंजाबमधल्या बहुतांश जनतेला माहिती आहेत.”
कुमार विश्वास म्हणाले, ‘ एक दिवस अरविंद केजरीवाल मला म्हणाले, तू चिंता नको करू. मी एक तर पंजाब सुभ्याचा मुख्यमंत्री बनेन. मी म्हणालो, हा अलगाव वाद 2020 चा रेफरंडम येतोय, सगळं आयएसआयपासून सगळे फुटिरतावादी याला फंडिंग करत आहेत. तर ते मला म्हणाले तर मग काय होईल, मी स्वतंत्र देशाचा पहिला पंतप्रधान बनेन. या माणसाच्या विचार प्रक्रियेतच खूप फुटिरतावाद भरला आहे. मला सत्ता मिळाली पाहिजे, अशीच त्यांची इच्छा आहे,’ असे आरोप कुमार विश्वास यांनी केले.
#WATCH | Poet & former AAP leader Kumar Vishwas alleges AAP chief Arvind Kejriwal was supportive of separatists in Punjab
“One day, he told me he would either become CM (of Punjab) or first PM of an independent nation (Khalistan),” Vishwas says. pic.twitter.com/5ccGs9jNn3
— ANI (@ANI) February 16, 2022
यापूर्वी काँग्रेस नेता राहुल गांधी यांनीही केजरीवाल यांच्यावर असेच आरोप केले होते. पंजाबामधील एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते, पंजाबमध्ये एक स्थिर सरकार आले पाहिजे. एक लक्षात घ्या. कोणत्याही दहशतवाद्याच्या घरी काँग्रेस नेता सापडणार नाहीत. मात्र झाडूचे सर्वात मोठे नेते (अरविंद केजरीवाल) तेथे असतात. पंजाबला खूप मोठा धोका आहे. त्यासाठी इथं चरणजीत चन्नी यांसारख्या खंबीर मुख्यमंत्र्यांची गरज आहे.
इतर बातम्या-