Punjab Election Live: पंजाबात आपची विजयी घोडदौड, दिल्लीच्या कार्यालयात फुलांचा घमघमाट

| Updated on: Mar 10, 2022 | 5:39 PM

Punjab Assembly Elections: पंजाबमधील एकूण 117 जागांसाठी निवडणूक लढवली जात असून 59 हा जादुई आकडा आपने पार केल्याचे चित्र आहे. त्यामुळे अरविंद केजरीलांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचे चित्र दिसत आहे. त्यानुसार दिल्लीच्या आपच्या कार्यालयातही मोठ्या प्रमाणावर फुलांची आणि फुग्यांची सजावट करण्यात आली आहे. 

Punjab Election Live: पंजाबात आपची विजयी घोडदौड, दिल्लीच्या कार्यालयात फुलांचा घमघमाट
आपच्या दिल्लीच्या कार्यालयात फुलांची सजावट
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

चंदीगडः एक्झिट पोलने दिलेल्या कौलानुसार पंजाब निवडणूकीच्या (Punjab Election Result) मतदानाची घोडदौड सुरु असल्याचे चित्र आज पहायला मिळत आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी पंजाबची सूत्रे आम आदमी पार्टीच्या हाती जाणार असल्याचं सांगितलं असून सुरुवातीच्या मतमोजणीचा कौलदेखील तसाच येत आहे. पंजाबमध्ये काँग्रसने (Punjab Elections) आपला तगडं आव्हान दिलं असलं तरीही यंदा पंजाबमध्ये सत्ता स्थापन करणारच असा चंग बांधलेली आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) विजयी घोडदौड करताना दिसत आहे. पंजाबमधील एकूण 117 जागांसाठी निवडणूक लढवली जात असून 59 हा जादुई आकडा आपने पार केल्याचे चित्र आहे. त्यानुसार दिल्लीच्या आम आदमी पार्टीच्या कार्यालयातही मोठ्या प्रमाणावर रंगीबेरंगी फुलांची आणि फुग्यांची सजावट करण्यात आली आहे.

पंजाब निवडणूक निकालांचे दहा महत्त्वाचे मुद्दे-

  1.  पंजाबमध्ये सुरुवातीच्या मतमोजणीत आम आदमी पार्टी 88 जागांवर आघाडीवर आहे.
  2. सध्याचे साडे दहा वाजताचे चित्र पाहता काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर आहे.
  3. काँग्रेसनंतर शिरोमणी अकाली दलाच्या हाती 8 जागांची आघाडी आहे, असे चित्र दिसतेय.
  4.  तर भाजप पंजाबमध्ये केवळ पाच जागांवर आघाडीवर आहे.
  5. -पंजाबमध्ये 117 जागांपैकी भाजपने 71 जागा लढवल्या. तर मित्र पक्ष पंजाब लोक काँग्रेसने 27 आणि शिरोमणी अकाली दलाने 15 जागा लढवल्या. तर आम आदमी पार्टीने 117 जागा, काँग्रेसने 117 जागा लढवल्या आहेत.
  6. 2017 मधील राजकीय स्थिती पाहता, पंजाबमध्ये एकूम 117 जागांपैकी भाजपला 3, काँग्रेसला 77, आपला 20 आणि अकाली दलाकडे 15 जागा होत्या.
  7.  पंजाबचे विद्यमान मंत्री चरणजीत सिंग चन्नी आहेत.
  8.  पंजाबमध्ये मागील तीन निवडणुकांच्या तुलनेत यंदा अत्यंत कमी मतदान झालं.

इतर बातम्या-

Election Result 2022 Live: उत्तर प्रदेशमध्ये भाजपने गाठली मॅजिक फिगर, सपाची शतकी खेळी

Manipur Election Result: मणिपूरमध्ये भाजपची दणदणीत आघाडी, काँग्रेसपेक्षा अपक्षांची संख्या जास्त? धाकधूक वाढली