मुंबई : पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Election 2022) रविवारी मतदान (Voting) पार पडलं. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रविवारी सकाळी 117 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी 6 वाजता मतदान पूर्ण झालं. हाती आलेल्या आकडेवारीनुसार संध्याकाळी 5 पर्यंत 63.44 टक्के मतदान झालं. या निवडणुकीत 1 हजार 304 मतदार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात 93 महिला तर दोन ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये कैद झालं. या निवडणुकीचा निकाल अन्य चार राज्यांसोबत 10 मार्च रोजी लागणार आहे. निवडणूक आयोगानुसार (Election Commission) पंजाबमध्ये 1 कोटी 2 लाख 996 महिलांसह एकूण 2 कोटी 14 लाख 99 हजार 804 मतदार आहेत.
पंजाबमध्ये आज मतदान केंद्रांबाहेर सकाळी रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. हजारो युवकांनी आज पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. काही लहान घटना वगळता आज पंजाबमध्ये शांततेत मतदान पार पडलं. दरम्यान, आम आदमी पक्षाने काही ठिकाणी ईव्हीएममध्ये खराबी असल्याची तक्रार केली, त्यामुळे काही काळ मतदान प्रभावित झालं. पंजाबमध्ये यावेळी काँग्रेस, आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल – बहुजन समाज पार्टी आघाडी, भारतीय जनता पार्टी – पंजाब लोक काँग्रेस आघाडी – शिरोमणी अकाली दल (संयुक्त) आणि विविध शेतकरी संघटनांची राजकीय आघाडी ‘संयुक्त समाज मोर्चा’ असा बहुरंगी सामना पाहायला मिळाला.
उत्तर प्रदेश विधानसभा सामान्य निर्वाचन-2022
तीसरे चरण के अंतर्गत जनपद कन्नौज में मतदान केंद्र पर पहुंचने वाले बुजुर्ग व दिव्यांग सम्मानित मतदाताओं की भरपूर सहायता की जा रही है।
आपका वोट, आपकी ताकत…@ECISVEEP @SpokespersonECI #ECI#AssemblyElections2022 #GoVoteUP_Phase3 pic.twitter.com/RCrLLkBNaV
— CEO UP #DeshKaMahaTyohar (@ceoup) February 20, 2022
शिरोमणी अकाली दलाने यावेळी बहुजन समाज पार्टीसोबत आघाडी करत निवडणूक लढवली. तर भाजपने पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि सुखदेव सिंह ढिंढसा यांच्या शिरोमणी अकाली दल (संयुक्त) यांच्यासोबत आघाडी केली. तर केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी पंजाबच्या अनेक शेतकरी संघटनांनी मिळून संयुक्त समाज मोर्चाची स्थापना करत निवडणुकीत उडी घेतली. या निवडणूक संयुक्त समाज मोर्चाने हरियाणा भारतीय किसान यूनियन (चढूनी) चे नेते गुरनाम सिंह चढूनी यांच्या संयुक्त संघर्ष पार्टीसोबत हातमिळवणी केली होती.
It’s their BIG DAY and they are here at the polling booths! Spotted Brides and Grooms casting their votes today. #GoVote #AssemblyElections2022 #ElectionCommissionOfIndia #ECI pic.twitter.com/hXCpsKJEwT
— Election Commission of India #SVEEP (@ECISVEEP) February 20, 2022
पंजाब विधानसभा निवडणुकीत यंदा मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, भगवंत मान, नवज्योत सिंह सिद्धू, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, प्रकाश सिंह बादल आणि सुखबीर सिंह बादल हे चर्चेतील चेहरे होते. माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्ठल, भाजपचे अश्विनी शर्मा आणि माजी केंद्रीय मंत्री विजय सांपला यांनीही या निवडणूक नशीब आजमावलं. यंदाच्या निवडणुकीसाठी राज्य पोलीस दलासह केंद्रीय सशस्त्र पोलीस बलाच्या (CRPF) च्या एकूण 700 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
इतर बातम्या :