नवी दिल्ली : देशात सध्या एकच मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Five State Election result) पाचही राज्यात निवडणुकांचे मतदान पार पडले आहे. एक्झिट पोलही आले (Election Exit Poll) आहेत. आता प्रतीक्षा आहे फक्त निवडणूक निकालाची. उद्या म्हणजेच बुधवार 10 मार्चला सकाळी 10 वाजल्यापासून (10 March Election result) या निवडणुकांच्या निकालाला सुरूवात होणार आहे. याच्या वेगवान अपडेट आम्ही तुम्हाला टीव्ही 9 मराठी वर दाखवणार आहोत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा यात समावेश आहे. पाच पैकी चार राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र समोर आलेल्या एक्झिट बोलमधून भाजपला मोठा झटका बसणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या निकालाची उत्सुकता आणखी वाढली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये पुन्हा सत्ता मिळताना दिसतेय. तर गोवा आणि उत्तराखंड ही राज्यं भाजप गमावण्याची शक्यता एक्झिट पोलने वर्तवली आहे. त्यामुळे या निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. या पाच राज्यांना मिनी लोकसभा म्हटले जाते. त्यामुळे निकालाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
निवडणूक आयोगाने आतापर्यंत 39 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानुसार बसपा 1, भाजप 27 आणि 11 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी निवडणूक निकालांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
यूपीच्या जनतेने भाजपला सत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचा निर्णय मला मान्य आहे. AIMIM चे प्रदेशाध्यक्ष, कार्यकर्ते, सदस्य आणि ज्या लोकांनी आम्हाला मतदान केले त्यांचे मी आभार मानतो. आम्ही खूप प्रयत्न केले पण आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही. आगामी काळात आम्ही पक्षवाढीसाठी काम करू-ओवैसी
UP public has decided to give power to BJP; I respect the decision of public. I thank AIMIM’s state pres, workers, members, &the public who voted for us. Our efforts were quite a lot, but the results didn’t come as per our expectations. We’ll work hard again: AIMIM chief A Owaisi pic.twitter.com/hgcu5N9Gj5
— ANI (@ANI) March 10, 2022
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार पंजाबमधील 117 जागांपैकी 103 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. घोषित 103 जागांमध्ये आम आदमी पार्टीने 82 जागा जिंकल्या आहेत तर 10 वर आघाडीवर आहे. सत्ताधारी काँग्रेसने 14 तर भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत. बहुजन समाज पक्षाने 1 जागा जिंकली. 3 जागा अकाली दलाच्या खात्यात गेल्या.
उत्तरखंडमध्ये भाजपला मोठा विजय प्राप्त झाला आहे. त्यामुळे भाजपच्या मुख्यालयात भाजप नेते जल्लोष साजरा करत आहेत.
उत्तराखंड के मुख्यमंत्री और भाजपा नेता पुष्कर सिंह धामी देहरादून में पार्टी के मुख्यालय पहुंचे। वह खटीमा विधानसभा क्षेत्र में 6,900 से अधिक मतों से पीछे चल रहे हैं। #UttarakhandElections2022 pic.twitter.com/wtMuWL8rI1
— ANI_HindiNews (@AHindinews) March 10, 2022
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी निवडणुकीतील पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लवकरच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावून या सर्व पराभवाची कारणे आणि सर्वसमावेशक विचारमंथन करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे, तसेच आम आदमी पार्टीचेही अभिनंदन केले आहे.
आज लागलेल्या निवडणूक निकालात काँग्रेसच्या बड्या नेत्यांना झटका बसला आहे. कारण यात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचाही पराभव झाला आहे. त्यांनी हार स्वीकारल्याचे ट्विट केले आहे.
I humbly accept the verdict of the people of Punjab and Congratulate @AamAadmiParty and their elected CM @BhagwantMann Ji for the victory. I hope they will deliver on the expections of people.
— Charanjit S Channi (@CHARANJITCHANNI) March 10, 2022
पंजाबमध्ये आपने काँग्रेसला धोबीपछाड दिला आहे. पंजाबमध्ये आपची एकहाती सत्ता आलीये. आनंदपूर साहिब विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या हरजोत सिंह बैंस विजयी झाल्या आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे. धामी यांचा खटीमा विधानसभा मतदार संघातून पराभव झाला, एकीकडे उत्तराखंडमध्ये भाजपाला बहुमत मिळताना दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे धामी यांच्या पराभवाचा धक्का देखील बसला आहे.
आम्ही असा भारत बनवू की इथल्या विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये जाण्याची गरजच पडणार नाही – केजरीवाल
सफाई कामगार, शेतमजून, नोकरदार वर्गानं चन्नी यांचा पराभव केला आहे.
सिंद्धू यांचा पराभव करणारा आपचा एक साधा स्वयंसेवक होता.
पंजाबमध्ये 75 वर्ष फक्त काँग्रेसनं नुकसान केलंय.
इन्कलाबचं नाव आम आदमी पार्टी आहे.
भगतसिंहांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यांचं नाव आम आदमी पार्टी आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी दोन जागी निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू याचा देखील पराभव झाला. तर, शिरोमणी अकाली दलाचे पंजाबच्या सुखबीर सिंह बादल यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला आहे. तर, प्रकाश बादल यांचा देखील पराभव झाला आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या हरिश रावत यांना पराभवाचा फटका बसलाय.
सुखबीर सिंग बादल यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुखबीर सिंग बादल हे जलालाबाद मतदारसंघातून उभे होते, हा मतदारसंघ त्यांच्यासाठी अत्यंत सुरक्षित माणण्यात येत होता. मात्र तरी देखील आम आदमी पार्टीच्या उमेदवाराकडून सुखबीर सिंग बादल यांचा पराभाव झाला आहे.
माजी मुख्यमंत्री आणि कॉग्रेसचे उमेदवार हरिश रावत हे उत्तराखंडच्या लालकुआ मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. हरिश रावत यांचा हा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. या मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होती. अखेर या लढतीमध्ये हरिश रावत यांचा पराभव झाला आहे.
पंजाबमध्ये आपचा विजय मोठा विजय झाला आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. दरम्यान इथून पुढे आता सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांची प्रतिमा लावण्यात येणार नसल्याचे मान यांनी सांगितले आहे. मान हे आपचे पंजाबमधील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. मान यांचे मुख्यमंत्रीपद आता जवळपास निश्चित माणण्यात येत आहे.
पंजाबच्या पाठानकोटमधून भाजपाचे अश्वीनी कुमार शर्मा यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अमित विज यांचा 7759 मतांनी पराभव केला.
पंजाबमधून मोठी बातमी समोर येत आहे. पटियालामधून माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा पराभव झाला आहे. आपचे उमेदवार अजित कोहली यांनी अमरिंदर सिंग याचा पराभव केला.
मणिपूरमध्ये भाजप सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे. हाती आलेल्या निकालानुसार सध्या भाजप 19 जागांवर आघाडीवर असून, त्यांचा एक उमेदवार विजयी झाला आहे. मणिपूरच्या वाबगई मतदारसंघातून भाजपाचे डॉ. उसम देबेन सिंह यांचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे तिपइमुख मतदारसंघातून जेडीयूचे नंगुसंगलुर सानाटे यांचा विजय झाला आहे.
पंजाबचा निकला जवळपास स्पष्ट झाला आहे. काँग्रेसला नाकारून जनतेने आपत्या मताचे दान ‘आप’च्या पारड्यात टाकले आहे. पंजाबमध्ये आपने स्पष्ट बहुमतानाकडे वाटचाल केली आहे. याचदरम्यान काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक ट्विट केले आहे. लोकांचा आवाज हा देवाचा आवाज असतो. जनता ही आमच्यासाठी देव आहे. आम्ही पंजाबचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो. आपचे अभिनंदन असे ट्विट सिद्धू यांनी केले आहे.
The voice of the people is the voice of God …. Humbly accept the mandate of the people of Punjab …. Congratulations to Aap !!!
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) March 10, 2022
मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक
उद्या सकाळी 11 वाजता होणार बैठक
चन्नी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ उद्या राजीनामा देणार
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला संपूर्ण बहुमत
उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपाचेच सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. उत्तराखंडमध्ये भाजपाने 42 तर काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर आहे.
अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले असून, ते आज दुपारी दोन वाजता संवाद साधणार आहेत.
इस इंक़लाब के लिए पंजाब के लोगों को बहुत-बहुत बधाई। pic.twitter.com/BIJqv8OnGa
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 10, 2022
उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड पाठोपाठ मणिपूरमध्ये देखील भाजपाची सरशी होताना दिसून येत आहे. तब्बल 24 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमदेवार 11 जाग्यांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे यावेळी अपक्ष उमेदवारा देखील मोठ्या संख्येने आघाडीवर आहे. राज्यात तब्बल 9 अपक्ष उमदेवारांनी आघाडी घेतली आहे.
हाती आलेले निवडणुकीच्या निकालानुसार शिरोमणी अकाली दलाचे प्रकाश सिंग बादल हे पंजाबमधून पिछाडीवर आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक जिंकायची आणि मानाने राजकारणातून निवृत्त व्हायचे अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र सध्या तर प्रकाश सिंग बादल हे पिछाडीवर असल्याचे समोर येत आहे.
पंजाबमध्ये दिगज्जांना धक्का बसला असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री चन्नी हे दोनही जागेवरून पिछाडीवर आहेत. तर नवज्योत सिंग सिद्धू हे अमृतसहमधून पिछाडीवर आहेत.
उत्तराखंडमध्ये भाजपाने बाजी मारलीये, काँग्रेसच्या जवळपास दुप्पट म्हणजे 44 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे 22 जागांवर उमेदवार आघाडीवर आहे. बसवाच्या एकाही उमेदवाराला आघाडी मिळवता आलेली नाही. तर दुरसरीकडे दोन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.
पंजाबमधील जनतेने यावेळी काँग्रेसला नाकारले आहे. पंजाबमध्ये केजरीवाल आणि आपच्या स्थानिक नेतृत्वाची जादू चालली असल्याचे दिसून येत आहे. पंजाबमध्ये तब्बल 87 जागांवर आपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर अवघ्या 14 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.
उत्तराखंडमधून महत्त्वाची बातमी हाती येत आहे. उत्तराखंडमधून हरिश रावत पिछाडीवर आहेत. हरिश रावत तब्बल आठ हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मणिपूरमध्ये भाजपाने 19 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसची पिछेहाट झाली असून, काँग्रेसचे उमेदवार अवघ्या तीन जागांवर आघाडीवर आहेत.
|
पक्ष | विजयी | आघाडी | एकूण |
---|---|---|---|
बहुजन समाज पार्टी | 0 | 2 | 2 |
भारतीय जनता पार्टी | 0 | 39 | 39 |
अपक्ष | 0 | 2 | 2 |
काँग्रेस | 0 | 17 | 17 |
एकूण | 0 | 60 | 60 |
|
|
निवडणूक आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार उत्तराखंडमध्ये भाजप 30 जागांवर, बसप 2, कँग्रेस 19, अपक्ष 1 तर उत्तराखण्ड जन एकता पार्टी 1 जागेवर अघाडीवर आहे.
पंजाबमध्ये आपची बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. तब्बल 87 जागांवर आपने आघाडी घेतली आहे. काँग्रेसची पिछेहाट झाली असून, आपच्या कार्यकर्यांमध्ये जल्लोषाचे , उत्साहाचे वातावरण आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा भाजप सत्ते येणार असल्याचे संकेत मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यात
भाजपाचे उमेदवार 22, काँग्रेस 14, एनपीपीचे 10 तर अपक्ष उमेदवार 10 जागांवर आघाडीवर आहेत.
पंजाबमधील जनतेने आपला कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल 88 जागांवर आपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे, तर काँग्रेसची पिछेहाट झाली असून, अवघ्या 18 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहे. अकाली दलाने सात जागांवर आघाडी घेतली आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपाने निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे दिसत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपा उमेदवारांनी तब्बल 39 जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची पिछेहाट झाली असून काँग्रेस 25 जागांवर आघाडीवर आहे. आपच्या उमेदवाराला अद्याप आघाडी घेता आलेली नाही. अपक्ष दोन जागांवर आघाडीवर आहेत.
मणिपूरमध्ये भाजपाची सरशी होताना दिसून येत आहे. मणिपूरमध्ये भाजपाने तब्बल 25 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 14 आणि अपक्ष उमेदवार 10 जागांवर आघाडीवर आहेत.
पंजाबमध्ये आपची निर्णायक आघाडीकडे वाटचाल सुरू असून, तब्बल 74 जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार 30 जागांवर आघाडीवर आहेत. अकाली दर 10 तर बीजेपीने तीन जागांवर आघाडी घेतली आहे.
उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. उत्तराखंडमध्ये 37 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत, तर काँग्रेस दोन नंबरचा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने 30 जागांवर आघाडी घेतली आहे. आपला राज्यात अद्यापपर्यंत एकाही जागेवर आघाडी घेता आलेली नाही.
पंजाबमध्ये आपने निर्णायक आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे, हाती येत असलेल्या निकालानुसार आप 66 जागा, काँग्रेस 35, अकाली दल 10 तर भाजप 3 ठिकाणी आघाडीवर आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पिछाडीवर गेल्याचे पहायला मिळत आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी अजीत पाल सिंग यांनी आघाडी घेतली आहे. अमरिंदर सिंग हे तीन हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
पंजाबमध्ये आपची निर्णायक बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. आपचे उमेदवार 62 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार 37 जागांवर आघाडीवर आहेत. भाजपाचे उमेदवार केवळ तीन जागांवर आघाडीवर आहेत.
उत्तराखंडमध्ये काही काळ काँग्रेस पिछाडीवर पडल्याचे दिसून येत होते, मात्र पुन्हा एकदा काँग्रेसने जोरदार कमबॅक केले आहे. उत्तराखंडमध्ये भाजपाचे उमेदवार 32 जागांवर आघाडीवर आहेत, तर काँग्रेसच्या उमेदवारांनी 30 जागांवर आघाडी मिळवली आहे.
मणिपूरमध्ये भाजपाची दणदणीत आघाडी, तर काँग्रेसपेक्षा अपक्षांची संख्या अधिक
पंजाबमध्ये आपने मोठी आघाडी घेतली असून, आपचे उमेदवार 60 जागांवर आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पिछाडीवर गेले असून, काँग्रेसचे उमेदवार 38 जागांवर आघाडीवर आहेत.
पंजाबमधील निवडणुकीच्या निकालात मोठी चुसर पहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री बादल यांनी आघाडी घेतली असून, काँग्रेसचे उमेदवार सिद्धू तीसऱ्या नंबरवर गेले आहेत.
उत्तराखंडमध्ये भाजप 34 जागांवर तर काँग्रेसची 28 जागांवर आघाडी
पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आघाडी घेताना दिसत असून, तब्बल 44 जागांवर आपचे उमेदवार आघाडीर आहेत.
मणिपूरमध्ये भाजप उमेदवारांची 19 तर काँग्रेस उमेदवारांची 13 जागांवर आघाडी
मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार मणिपूरमध्ये भाजप 20 तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपाने आघाडी घेतली असून, काँग्रेस पिछाडीवर गेले आहे. उत्तराखंडमध्ये भाजप 36 जागांवर अघाडीवर आहे. तर काँग्रेसच्या उमेदवारांनी 25 जागांवर आघाडी घेतली आहे.
उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरस दिसत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप 30 जागांवर तर काँग्रेस 29 जागांवर आघाडीवर आहे.
मणिपूरमध्ये भाजप उमेदवारांची 13 तर काँग्रेस उमेदवारांची 10 जागांवर आघाडी
उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस पहायला मिळत आहे. भाजप 28 तर काँग्रेस 22 जागांवर आघाडीवर आहे.
पंजाबमध्ये 18 जागांवर आपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून, कँग्रेस 13 जागांवर आघाडीवर आहे.
उत्तराखंडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तराखंडमध्ये भाजप दहा जागांवर पुढे आहे, तर काँग्रेसने देखील नऊ जागांवर आघाडी घेतली आहे.
पंजाबमध्ये मतमोजणीच्या सुरुवातीलाच काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे उमेदवार सहा जागांवर आघाडीवर आहेत, तर आपचे उमेदवार तीन जागांवर आघाडीवर आहेत.
पंजाब विधानसभेच्या निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच काँग्रेसने आघाडी घेतली असून, चार जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर आपचे उमेदवार तीन जागांवर आघाडीवर आहेत.
आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यासाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या पाच राज्यांमध्ये पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे.
पंजाबमधील ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी संगरूर गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना केली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आम्हाला पूर्ण विश्वास आहे, पंजाबमध्ये आम्हीच सत्तेत येऊ. लोकांना बदल हवा होता, त्यासाठी लोकांनी आम आदमी पक्षाची निवड केली आहे.
उत्तराखंडमध्ये आज विधानसभेच्या 70 जागांसाठी मतमोजणी होत आहे. मतमोजणीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सहपरिवार मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी त्यांनी आपले काही फोटो ट्विट केले आहेत. निवडणुकीमध्ये पक्षाला भरघोस यश मिळावे यासाठी प्रार्थना केल्याचे त्यांनी म्हटले.
#ॐ_श्री_गणेशाय_नमो_नमः#ॐ_नमो_भगवते_वासुदेवाय
ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
मैं अपने ईष्ट देवता, कुलदेवता व सभी देवी-देवताओं को प्रणाम करता हूंँ।
भगवान विष्णु हम सब पर अपना आशीर्वाद बनाए रखें। #ॐनमःशिवाय #जय_मां_भगवती #जय_साईं_बाबा pic.twitter.com/KRQdHWUBJG— Harish Rawat (@harishrawatcmuk) March 10, 2022
अवघ्या काही वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीपूर्वी उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा एकदा आम्हीच सत्तेत येऊ, असा दावा उत्तरप्रदेशमधील भाजपाचे मंत्री आणि नेते ब्रजेश पाठक यांनी केला आहे.
नोयडामध्ये सपाचे कार्यकर्ते ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आले आहे, त्या रूमच्या बाहेरच ठाण मांडून बसले आहेत. यातील एका कार्यकर्त्यांनी तर मतमोजणीपूर्वी गाणे देखील गायले आहे. सपाकडून प्रत्येक मतदार संघामध्ये अशाच पद्धतीने ईव्हीएमवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
#WATCH | Uttar Pradesh | Samajwadi Party workers sing outside a strong room in Noida where they are sitting to keep a vigil on the EVMs ahead of the counting tomorrow#UttarPradeshElections2022 pic.twitter.com/EXNFcyJLWS
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 9, 2022
थोड्याचवेळात पाचही राज्यांच्या मतमोजणीला सुरुवात होणरा आहे. मतमोजणीसाठी एकूण पाच राज्य मिळून 1200 मतमोजणी केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आज पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल आहे. यामध्ये पंजाब, उत्तरप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या गोरखपूर मतदारसंघात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पंजाबमध्ये आपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पंजाबमध्ये यावेळी आप सत्तेत येणार असल्याचा अंदाज बांधला जातोय. कार्यकर्त्यांनी आतापासून जल्लोष सुरू केला आहे. राज्यातील पक्षाचे मुख्यलय सुशोभित करण्यात आले आहे. तसेच विजयानंतर वाटण्यासाठी जिलेबी देखील तयार करण्यात येत आहे.
Punjab | Jalebis being prepared, flower decoration being done at the residence of Aam Aadmi Party CM candidate Bhagwant Mann, at Sangrur pic.twitter.com/xTlEzV1a9u
— ANI (@ANI) March 10, 2022
आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. यामध्ये पंजाबचा देखील समावेश आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी चमकौर साहिबच्या गुरुद्वाराला भेट दिली. त्यांनी चमकौर साहिबच्या गुरुद्वारा श्री कटलगढ साहिब येथे नतमस्तक होत पक्षाच्या विजयासाठी प्रार्थना केली.
यूपीमधील एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की 10 मार्च रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी सुमारे 70,000 नागरी पोलीस कर्मचारी, 245 कंपन्या, निमलष्करी दल आणि 69 कंपनी पीएसी तैनात करण्यात आले आहेत. यादरम्यान कोणीही गोंधळ घालण्याचा किंवा दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाची डेहराडूनमधील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत मतमोजणीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातील 13 जिल्ह्यांतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील, असा निर्णय घेण्यात आला.
Uttarakhand | Congress Party had a meeting at a hotel in Dehradun in the presence of former CM Harish Rawat &other leaders. It was decided that during the counting, senior Congress leaders would be present to keep an eye on counting of votes in all thirteen districts of the state pic.twitter.com/UeEYQZhPPT
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 9, 2022
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव म्हणाले की, आजपासून पुढचे तीन दिवस प्रत्येक तरुणाने, प्रत्येक मतदाराने मतमोजणी केंद्रावर रक्षण करावे आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वातंत्र्याचे भजन करावे. राजकीय शक्तीपुढे जनशक्ती झुकणार नाही, असा एल्गार अखिलेश यादव यांनी केला
पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वी राजकीय पक्षांकडून लाडवांच्या ऑर्डर्स दिल्या जात असून, त्यासाठी दुकानांमध्ये लाडू तयार केले जात आहेत.
10 मार्च रोजी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीपूर्वी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी मंगळवारी पक्षाच्या नेत्यांना सांगितले की निवडणुकांचे सकारात्मक निकाल पाहायला मिळतील. मध्य प्रदेशच्या एक दिवसीय दौऱ्यावर असताना नड्डा हे इंदौरमध्ये भाजपचे प्रदेश पदाधिकारी आणि मोर्चा अध्यक्षांसोबत आयोजित बैठकीत बोलत होते.