Up Elections 2022 : उत्तर प्रदेशच्या सातव्या टप्प्यासाठी दिग्गजांकडून प्रचार, मोदी-योगींची जोडी गड राखणार?

| Updated on: Mar 03, 2022 | 5:28 PM

उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी पंतप्रधानांसह दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते निवडणूक प्रचारात उतरले आहेत. रोज भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री उत्तर प्रदेशातील विविध मतदारसंघात सभा घेताना दिसतायेत.

Up Elections 2022 : उत्तर प्रदेशच्या सातव्या टप्प्यासाठी दिग्गजांकडून प्रचार, मोदी-योगींची जोडी गड राखणार?
भाजपच्या दिग्गज नेत्यांची रॅली
Image Credit source: tv9
Follow us on

लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभेची (Uttar Pradesh Election) रणधुमाळी सुरु असून अखेरच्या आणि सातव्या टप्प्याचं मतदान (Up Elections Voting)होणार आहे. उत्तर प्रदेश राखण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरु असले तरी विरोधकांनी देखील भाजपाला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी पंतप्रधानांसह दिग्गज नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Nrendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, (Amit Shah) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते निवडणूक प्रचारात उतरले आहेत. रोज भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री उत्तर प्रदेशातील विविध मतदारसंघात सभा घेताना दिसतायेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजप सत्ता कायम राखणार की परिवर्तण होणार, याकडे उत्तर प्रदेशसह अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे.

सातव्या टप्प्याचं मतदान
उत्तर प्रदेशच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याच मतदान महत्वाचं आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात भाजपानं राज्यातील या 54 जागांवर लक्ष केंद्रीय केलं आहे. सातव्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ देखील आहे. यासह समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी देखील सातव्या टप्प्यात विशेष लक्ष दिलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खुद्द प्रचारात उतरले आहेत.

अमित शहांकडून जोरदार प्रचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार करताना दिसून येतायेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गज नेते उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत. असं म्हणतात ज्यांची उत्तर प्रदेशात सत्ता त्यांची देशात सत्ता. आता उत्तर प्रदेशातील निकालावरुन 2024मधल्या भविष्याकडे बघितलं जात असल्याची देखील चर्चा आहे.

भाजपकडून आश्वासनांचा पाऊस

उत्तर प्रदेश निवडणूक भाजपसह समाजवादी पक्ष आणि काँग्रेसकडून देखील आश्वासनांचा पाऊस पाडला जातोय. तर सत्ता कायम ठेवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार केलाय. यामुळे उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता कायम राहते की विरोधी बागावर बसणारे सत्तेत येतात. हे पाहणं महत्वाचं ठरेल. यापूर्वी देखील पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं आश्वासनांचा पाऊस पाडला होता. पण पश्चिम बंगालच्या वाघिणीला रोखणं भाजपला शक्य झालं नाही. आता उत्तर प्रदेशात काय होतं ते निवडणुकीच्या निकालावरुनच कळेल.

इतर बातम्या

मोठी बातमीः औरंगाबाद महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टात सुनावणी, प्रभाग रचनेसंदर्भात काय आदेश?

रोमानियाच्या बॉर्डरवर हिमवृष्टीचा सामना! अमरावतीच्या वृषभचा रोमानियात तर स्नेहा लांडगेचा पोलंडमध्ये प्रवेश

Russia Ukraine War Video : युक्रेनमधील इरपिन शहर बेचिराख, काळजाचा थरकाप उडवणारा Video