उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात भाजपनं (UP elections result 2022) पुन्हा मैदान राखलं, पुन्हा उत्तर प्रदेशात आम्हीच बाहुबली म्हणत, पुन्हा उत्तर प्रदेश काबीज केलं. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला भरभररून यश मिळालं. त्यामुळेच आज योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत (yogi adityanath oath ceremony) आहेत. मात्र या निवडणुकीत एक वेगळा फॅक्टर समोर आलाय. नवनिर्वाचित आमदारांपैकी जवळपास निम्मे आमदार पहिल्यांदाच निवडून आलले आहेत. अलिकडेच एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे यूपीत भाजपचं (Bjp) यंतिस्तान म्हणजेच तरुण उमेदवारांचं कार्ड चांगलचं चालल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीतल आकडेवारीचा अभ्यास केल्यास जातीयवादालाही जास्त थारा मिळाला नसल्याची आकडेवारी समोर आलीय. तसेच महिलांनाही उत्तर प्रदेशातील ही निवडणूक फार मानवलेली नाहीये. आता या निवडणुकीत भाजपचं यंग कार्ड कसं चाललंय हेही पाहुयात…
भाजपने या निवडणुकीत 200 नव्या उमेगवारांना संधी दिली, त्यापैकी 126 जणांचा विजय झाला तर जिंकण्याचा स्ट्राईक रेट तब्बल 63 टक्के आहे. समाजवादी पार्टीकडून 199 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली, त्यापैकी 56 जणांचा विजय तर उमेदवार जिंकून येण्याचा सपाचा स्ट्राईक रेट 28.1 टक्के आहे. बसपानं तब्बल 346 नव्या उमेदवारांना संधी दिली, पण जिंकून आला फक्त एकच उमेदवार आला, बसपाचा स्ट्राईक रेट 0.3 टक्के फक्त आहे. काँग्रेसनं 335 नव्या उमेदवारांना संधी दिली, पण एकालाही विजय मिळवता आलं नाही.
भाजपने 149 आमदारांना पुन्हा संधी दिली, त्यापैकी 116 जणांचा विजय झाला, जिंकण्याचा स्ट्राईक रेट 77.9 टक्के आहे. सपाने 39 जुने चेहरे पुन्हा रिंगणात उतरवले, त्यापैकी 25 विजय तर विजयाचा स्ट्राईक रेट 64.8 टक्के आहे. बसपाने तिघांना संधी दिली, पण सगळेच पराभूत झाले. तर काँग्रेसे चौघांना संधी, पण विजय फक्त एकाचाच झाला, जिंकण्याचा स्ट्राईक रेट 25 टक्के आहे.
भाजपकडून 48 महिलांना या निवडणुकीत तिकीट देण्यात आले. त्यातल्या 32 महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर विजयाचा स्ट्राईक रेट हा 66 टक्के आहे. सपाने 45 महिलांना संधी दिली होती त्यात 14 महिला विजयी झाल्या आहेत, तर जिंकून येण्याचा स्ट्राईक रेट 31 टक्के आहे. बसपाने 36 महिलांना संधी दिली त्यातल्याली एकही महिला निवडूण आली नाही.काँग्रेसने तर तब्बल 155 महिलांना उमेदवारी दिली मात्र फक्त 1 महिला जिंकून आली.
उत्तर प्रदेशात मुस्लिम उमेदावरांच्या पारड्यात फार काही पडलं नाही, हे आकडेवारीवरून दिसून येत. क्वचित एखादा दुसरा उमेदवार निवडणून आल्याचे दिसून येते.
परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणांचा तपास CBI कडे जाणार! खासदार Sanjay Raut म्हणतात…