कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (West Bengal Elections 2021)आतापर्यंत सहा टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं आहे. सातव्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होत असून यामध्ये 36 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होईल. यामध्ये दक्षिण दिनाजपूर, मालदा (6), मुर्शिदाबाद (11), कोलकाता (4), पश्चिम बर्दवान (9) विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 36 जागासांठी 268 उमेदवार मैदानात आहेत. दरम्यान, खडदह विधानसभा मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा (Kajal Sinha) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 22 एप्रिलला कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं त्यांन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ( West Bengal Elections 2021 TMC candidate Kajal Sinha died due to corona Mamata Banerjee tweet for condolences)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी काजल सिन्हा यांच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त केलं आहे. काजल सिन्हा यांनी पक्षासाठी झोकून देऊन कामं केलं. त्यांनी लोकांच्या सेवेसाठी अविरत काम केलं होतं, आम्हाला त्यांची कमी जाणवेल. तृणमूल काँग्रेस त्यांच्या परिवारासोबत आहे, असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. काजल सिन्हा यांचं आज सकाळी 9.45 वाजता कोरोनामुळं निधन झालं.
Very, very sad. Shocked. Kajal Sinha, our candidate from Khardaha, succumbed to Covid.He dedicated his life to serving people & just fought a tireless campaign. He was a long-serving committed member of @AITCofficial. We will miss him. My condolences to his family & his admirers
— Mamata Banerjee (@MamataOfficial) April 25, 2021
पश्चिम बंगालमधील वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं प्रचारसभांवर नियंत्रण आणलं आहे. राजकीय दलांकडून कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याबाबत मार्गदर्शक सूचनांचं पालन होत नसल्यानं आयोगानं चिंता व्यक्त केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा वाढता आलेख
पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 14 हजार 281 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 28 हजार 61 वर पोहोचली आहे. तर, सध्या राज्यामध्ये 81 हजार 375 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या 10 हजार 884 वर पोहोचली आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी दूरध्वनीवरुन यासंदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर काँग्रेसने पश्चिम बंगालमधील प्रचार 22 एप्रिलपासून जवळपास थांबवल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यात 43 जागांसाठी मतदान झाले. तर, सातव्या आणि आठव्या टप्प्यांतील 69 जागांसाठी अद्याप मतदान व्हायचे बाकी आहे. मात्र, या दोन्ही टप्प्यात काँग्रेसकडून आता फारसा प्रचार होणार नसल्याचे दिसत आहे.
संबंधित बातम्या:
West Bengal Elections 2021 : शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक, बंगालमध्ये राडेबाजी सुरुच
(West Bengal Elections 2021 TMC candidate Kajal Sinha died due to corona Mamata Banerjee tweet for condolences)