साल 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या उर्मिला मातोंडकर, अनिल कपूर आणि श्रीदेवी या त्रिकूटाची ब्लॉकबस्टर फिल्म ‘जुदाई’ जर पाहीला असेल तर या चित्रपटातील श्रीदेवी आणि अनिल कपूरचा ऑनस्क्रीन मुलगा बाल कलाकार आपल्याला आठवत असेलच…आता आता हा मुलगा तरुण झाला असून तो ‘छोटा बच्चा’ राहीलेला नाही. या बालकलाकाराचे आताचे रुप पाहून तुम्हाला धक्का बसेल. आता या बालकलाकाराचे देखणं रुप पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. हा मुलगा आता चित्रपटात आपले नशीब आजमावित आहे. त्याचे दोन तीन चित्रपट देखील केले आहेत. तर पाहूया कोण आहे हा कलाकार ..?
येथे पाहा इंस्टाग्राम अकाऊंट –
अनिल कपूर आणि श्रीदेवी अभिनित चित्रपट ‘जुदाई’ मध्ये त्यांच्या मुलाचे काम बालकलाकार ओमकार कपूर याने साकारले होते. आता ओमकार कपूर 37 वर्षांचा झाला आहे. आणि खूपच हॅंडसम आणि स्टायलिश दिसत आहेत. सोशल मिडीयावर ओमकार कपूर नेहमीच सक्रीय असून आपले फोटो शेअर करीत असतात. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही कूल लूक असलेले फोटो शेअर केले आहेत. ओमकार कपूर याचे इंस्टाग्रामवर 72 हजार फॉलोअर आहेत.
आता इंस्टाग्राम खाते पाहा –
ओमकार कपूर याचा जन्म 31 ऑक्टोबर 1986 रोजी झाला. 1996 मध्ये रिलीज झालेल्या ‘मासूम’ या चित्रपटात त्याचा अभिनय नावाजला गेला. त्यात त्याचे छोटा बच्चा समजके हमको ना टकराना रे…हे गाणे खूपच गाजले होते. यानंतर ओमकार कपूर याने मागे वळून पाहीलेच नाही. जुदाई, सलमान खानचा ‘जुडवा’ चित्रपट, गोविंदाचा ‘हिरो नं.1’ आणि आमिर खानच्या मेला चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. वयात आल्यानंतर देखील ओमकारने अनेक चित्रपटात काम केले, प्यार का पंचनामा, झूटा कही का, फोरबिडन लव्ह सारख्या चित्रपटात काम केले आहे.